हातामध्ये हात घेऊनी - मराठी कविता

हातामध्ये हात घेऊनी, मराठी कविता - [Hatamadhe Haat Gheuni, Marathi Kavita] जरा चालूया चार पाऊले, हातामध्ये हात घेऊनी.
हातामध्ये हात घेऊनी - मराठी कविता | Hatamadhe Haat Gheuni - Marathi Kavita

जरा चालूया चार पाऊले, हातामध्ये हात घेऊनी

जरा चालूया चार पाऊले
हातामध्ये हात घेऊनी
आनंदाने मोजू शलाका
क्षितिजवरती नजर ठेऊनी

क्षणात देऊ तिलांजली मग
मनातल्या साऱ्या दुःखांना
विहारत राहू स्वच्छंदाने
सुखास मग ती नूरते सीमा

गतकाळाच्या स्मृतीत रमुया
विसरुनी जाऊ सारे मीपण
काळ दावितो नव्याच वाटा
हर्षभरे मग उजळे जीवन

हिशेब करुनि जुन्या चुकांचा
झाले गेले सोडूनि देऊ
हातामध्ये हात घेऊनी
पुन्हा नव्याने चालत राहू


अजित पाटणकर | Ajit Patankar
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
बालपणापासून काव्यलेखनाची आवड असणारे बडोदा, गुजरात येथील अजित पाटणकर हे मराठीमाती डॉट कॉम येथे मराठी कविता या विभागात लेखन करतात.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.