Loading ...
/* Dont copy */

जीव सैरावैरा धावे - मराठी कविता

जीव सैरावैरा धावे, मराठी कविता - [Jiv Sairavaira Dhave, Marathi Kavita] जीव सैरावैरा धावे, आज पळत्याच्या पाठी.

जीव सैरावैरा धावे - मराठी कविता | Jiv Sairavaira Dhave - Marathi Kavita

जीव सैरावैरा धावे, आज पळत्याच्या पाठी

जीव सैरावैरा धावे
आज पळत्याच्या पाठी
कशी मायेच्या धुंदीने
विसरली नातीगोती

अरे माणसा, माणसा
नको माणुसकी सोडू
पिढ्या चालत आलेल्या
नको परंपरा मोडू

नको गाडी रे बंगला
नको जमीनजुमला
नको प्रेमाच्या नात्याला
भाऊबंदकीचा घाला

आयुष्याच्या दुकानात
गच्च भरले सामान
नको डावलु कधीच
थोरामोठ्यांचा रे मान

खांदा द्यावया असुदे
तुला कुणी मानकरी
नाहीतर सहा फूट
जागेसाठी तू भिकारी


अजित पाटणकर | Ajit Patankar
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
बालपणापासून काव्यलेखनाची आवड असणारे बडोदा, गुजरात येथील अजित पाटणकर हे मराठीमाती डॉट कॉम येथे मराठी कविता या विभागात लेखन करतात.

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची