Loading ...

मोलकरीण बाई मालिकेचा गणपती विशेष भाग

मोलकरीण बाई मालिकेचा गणपती विशेष भाग, टिव्ही - [Molkarin Bai Ganpati Special Episode, TV].

शांतीनगरवर येणारं विघ्न बाप्पा परतवून लावेल का?

गणरायाच्या आगमनासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. बाप्पाच्या आगमनासाठी सारा आसमंत आतूर आहे. सजावटीच्या वस्तूंनी बाजारपेठाही खुलल्या आहेत. दहा दिवसांचा हा उत्सव वर्षभराची ऊर्जा देऊन जातो. स्टार प्रवाहवरील ‘मोलकरीण बाई’ मालिकेतल्या शांती नगर वस्तीमध्येही गणरायाचं जल्लोषात स्वागत होणार आहे. साग्रसंगीत पूजा, आरती आणि गोडाधोडाच्या मेजवानीसोबतच जबरदस्त नृत्याची मैफल या सोहळ्यात अनोखे रंग भरणार आहे. एकीकडे अनिता आणि अनिल तर तिकडे गुंजन आणि हृतिकचा डान्स धमाका प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

‘मोलकरीण बाई’ मालिकेत गुंजनची भूमिका साकारणाऱ्या अश्विनी कासार आणि संपूर्ण टीमने या विशेष भागासाठी खास तयारी केली होती. अश्विनी नृत्य शिकली असली तरी मालिकेत नृत्य करणं हा वेगळा अनुभव असल्याचं तिने सांगितलं. जवळपास पाच दिवस सेटवर आम्ही सगळे सराव करत होतो. शूटिंगच्या वेळा सांभाळत महाएपिसोडसाठी जय्यत तयारी केली. ही सगळी धमाल प्रेक्षकांना गणपती विशेष महाएपिसोडमध्ये पाहायला मिळेल.

उत्साहाच्या या वातावरणात मात्र शांतीनगर वस्तीवर संघवी बिल्डरच्या रुपात संकट उभं ठाकणार आहे. शांतीनगरची जागा बळकावू पाहणारा संघवी बिल्डर ऐन गणेशोत्सवात शांतीनगर उध्वस्त करायला आलाय. विघ्नहर्ता गणेश शांतीनगरावरचं संकट परतावून लावेल का? संघवी बिल्डरचा मनसुबा उधळला जाईल का? याची उत्कंठावर्धक गोष्ट १ सप्टेंबरच्या गणपती विशेष भागात पाहायला मिळेल. त्यासाठी पाहायला विसरु नका ‘मोलकरीण बाई’ मालिकेचा गणपती विशेष भाग रविवार १ सप्टेंबरला दुपारी १ आणि रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.





मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरिल विविध विभागांत लेखन आणि संपादन.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची