हा धुंद पाऊस, मातीचा सुगंध
हा धुंद पाऊसमातीचा सुगंध
त्यात चिंब भिजलेली तू
नि तुझ्या देहाचा गंध
तुझ्या हलक्याशा स्पर्शाने
येतात शहारे अंगावर
गात्रे मात्र शिथिल
नजर तुझ्या रंगावर
मी स्तब्ध, पाऊस नि:शब्द
दोघेही जणू भांबावलेले
या सर्वाला तुझे डोळे
नेहमीसारखेच सरावलेले
समुद्रातही रोजच्यासारखी
लाटेमागून लाट
लख्ख उजेड असूनही
दिसत नाही वाट
झेलत रहातो पाऊस सारा
असाच मग अंगावर
पूर्वजन्मीची पापं माझी
घेऊन माझ्याच शिंगावर