Loading ...

बॉईज २ मराठी चित्रपटाचे पोस्टर

बॉईज २ मराठी चित्रपटाचे पोस्टर, मराठी चित्रपट - [Boyz 2 Marathi Movie Poster, Marathi Movie] बॉईज २ प्रेक्षकांसठी पुन्हा एकदा बॉइजगिरीचा डबल धमाका घेऊन येत आहेत.

बॉईज २ मराठी चित्रपटाचे पोस्टर - मराठी चित्रपट | Boyz 2 Marathi Movie Poster - Marathi Movie

धैर्या, ढुंग्या आणि कबीर 'बॉईज २' मध्येदेखील करणार दंगा

गावाकडची धैर्या, ढुंग्या आणि शहरातला साधा सरळ कबीर यांची धम्मालगिरी आगामी ‘बॉईज २’ मध्येदेखील दिसून येणार आहे.

‘इरॉस इंटरनॅशनल आणि एवरेस्ट इंटरटेंटमेन्ट’ प्रस्तुत, ‘अवधूत गुप्ते’ यांच्या सहयोगाने ‘सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शन’ अंतर्गत प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाचा नुकताच सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्टर लॉंच करण्यात आले.‘हाईट छोटी आहे, पण फाईट मोठी आहे’ अशी टॅगलाईन असलेल्या या पोस्टरवर ‘बॉईज’ सिनेमातील तीच अतरंगी पोरं आपल्याला दिसून येतायत.

शाळेतून आता महाविद्यालयात गेलेल्या या तिघांच्या चेहऱ्यावर बुक्क्यांचा मार जरी दिसत असला तरी, त्यांची मस्ती अजून काही कमी झाली नसल्याचे, त्यांच्या हास्यातून कळून येते. ‘विशाल देवरुखकर’ दिग्दर्शित या सिनेमातून ‘सुमंत शिंदे’, ‘पार्थ भालेराव’ आणि ‘प्रतिक लाड’, प्रेक्षकांसठी पुन्हा एकदा बॉइजगिरीचा डबल धमाका घेऊन येत आहेत.

येत्या ‘५ ऑक्टोबर’ रोजी प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाचे संवादलेखन ‘ऋषिकेश कोळी’ने लिहिले असून, ‘लालासाहेब शिंदे’, ‘राजेंद्र शिंदे’ आणि ‘संजय छाब्रिया’ यांनी ‘बॉईज २’ च्या निर्मात्याची धुरा सांभाळली आहे. तसेच ‘इरॉस इंटरनेशनल’द्वारे ‘बॉईज २’ चित्रपटाचे जागतिक स्तरावर वितरण देखिल केले जाणार आहे. किशोरवयीन मुलांच्या गंमतीनंतर महाविद्यालयीन जगात रमलेले हे बॉईज आता कोणती धम्माल घेऊन येत आहेत, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची