Loading ...

भाऊ आणि बहीण

भाऊ आणि बहीण, इसापनीती कथा - [Bhau Aani Bahin, Isapniti Katha] शारिरीक व्यंगावर सद्‍गुणांचे पांघरूण घालता येते, पण सद्‍गुण अंगी नसतील तर नुसत्या शरीरसौंदर्याने माणसाचे महत्त्व वाढणार नाही.

भाऊ आणि बहीण - इसापनीती कथा | Bhau Aani Bahin - Isapniti Katha

शारिरीक व्यंगावर सद्‍गुणांचे पांघरूण घालता येते

एका गृहस्थास एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले होती.

मुलगा रूपाने फार सुंदर होता, मुलगी साधारण होती. ती दोन्ही मुले एके दिवशी आरशात पाहात असता, मुलगा आपल्या बहिणीला म्हणाला, ‘ताई, मी किती सुंदर आहे. माझ्या सौंदर्यापुढे तुझे सौंदर्य काहीच नाही.’

हे शब्द ऐकून त्या मुलीस फार वाईट वाटले. ती आपल्या बाबाजवळ गेली आणि आपल्या भावाने आपणास हिणवल्याबद्दलचे गाऱ्हाणे तिने त्याला सांगितले.

ते ऐकताच, बाबाने दोन्ही मुलांस जवळ बोलावून म्हटले, ‘मुलांनो, तुम्ही दोघेही रोज आरशात पाहात जा; मुला, तुझ्या सौंदर्यास वाईट वर्तणुकीचा आणि असभ्यपणाचा कलंक लागू नये म्हणून तू आरशात पाहात जा आणि मुली, तुझ्या रूपात जी थोडीशी उणीव आहे, ती सदाचरणाने आणि गोड भाषणाने भरून काढावी, या हेतूने तू आरशात पाहात जा.’

तात्पर्य: शारिरीक व्यंगावर सद्‍गुणांचे पांघरूण घालता येते, पण सद्‍गुण अंगी नसतील तर नुसत्या शरीरसौंदर्याने माणसाचे महत्त्व वाढणार नाही.
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

अभिप्राय

  1. फार छान
    आयुष्य खरंच सुंदर आहे, फक्त मनात प्रेम असुद्या

    उत्तर द्याहटवा
तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषय सूची