राधाची गोड बातमी

राधाची गोड बातमी, मराठी टिव्ही - [Radhachi God Batami, Marathi TV] स्टार प्रवाहवरील गोठ मालिकेत नवा ट्विस्ट; राधाची गोड बातमी विलासला कशी कळणार.
राधाची गोड बातमी

स्टार प्रवाहवरील गोठ मालिकेत नवा ट्विस्ट; राधाची गोड बातमी विलासला कशी कळणार ?

स्टार प्रवाहवरील गोठ मालिकेत आता नवं वळण पाहायला मिळणार आहे. विलास आणि राधा यांच्या नात्यात नीलाच्या रुपानं अडथळा निर्माण झाला आहे.
नीलाची विचित्र अट मान्य केल्यानंतर आपली गोड बातमी राधा विलासला कशी सांगेल असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नात्यातले समज-गैरसमज दूर करून विलास आणि राधा जवळ आले आहेत.
मात्र, नीला सतत काही ना काही खेळी खेळून त्यांच्यात दरी निर्माण करू पहात आहे.
दोन वर्ष गर्भधारणा होऊ न देण्याची नीलाची अट राधानं मान्य केलीय. ही अट विचित्र असूनही राधा त्यासाठी तयारी दर्शवते.
मात्र गोड बातमी कळल्यानंतर तिच्या मनात त्याविषयी द्विधा मन:स्थिती निर्माण होते.
आता विलासला आणि कुटुंबीयांना राधा ही बातमी कधी आणि कशी सांगेल याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

अडचणीत आलेली राधा त्यावर मार्ग काढते का, त्यात तिला काही अडचणी येतात का ? या प्रश्नांची उत्तर पुढील भागांतून मिळणार आहेत.
त्यासाठी न चुकता पहा गोठ सोमवार ते शनिवार संध्याकाळी ९:३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर !

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.