१९७७ मध्ये इराणमधील तेहरान येथे जन्मलेल्या मार्याम मिर्झाखानी हे गणितातले गाढे विद्वान व्यक्तिमत्व होते. गणिताला
“नवीन युगाची सुरुवात” करून देणाऱ्या मरियम मिर्जाखानी यांचे निधन
१४ जुलै २०१७ ला झाले. गणितातले नोबेल पारितोषिक असलेले
‘फिल्डस मेडल’ मिळवणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत. हायपरबोलीक अवकाशात युक्लिडच्या भूमितीतले अनेक नियम कसे लागू होत नाहीत हे त्यांनी दाखवून दिले. स. प. महाविद्यालयातील विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आणि दि बेस्ट इनोव्हेटिव टीचर पुरस्काराने सन्मानीत
डॉक्टर वि. मा. सोलापूरकर -
‘मार्याम मिर्झाखानी’ यांच्या जीवन आणि कार्याबद्दल माहिती देणार आहेत.
मंगळवार, १७ जुलै संध्या. ६:१५ वा. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स, शिवाजीनगर, पुणे ५ येथे व्याख्यान होईल. विज्ञानप्रेमी आणि गणिताबद्दल उत्सुकता असणाऱ्या सर्वांना हा कार्यक्रम खुला आहे असे मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाचे अध्यक्ष
विनय र. र. यांनी सांगितले.
मार्यामसाठी एक हायकू:
चतुर गणिती प्रज्ञेने प्रकाश पाडला
बिंदू, रेषा आणि वक्रांच्या अथांगावर
आणि अचानक हरपला, गेला सुन्न करून
स्थानिक कार्यक्रम: मंगळवार दि. १७ जुलै २०१८ व्याख्यान
विषय: मार्याम मिर्झाखानी (थोर गणिती, कार्य आणि कर्तृत्व)
वक्ता: डॉ. वि. मा. सोलापूरकर
स्थळ: दि इंस्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स, जंगली महाराज रस्ता, शिवाजीनगर
वेळ: संध्याकाळी ६:१५ वा.
आयोजक: मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग व दि इंस्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स पुणे चॅप्टर