माणूस म्हणून - मराठी कविता

माणूस म्हणून, मराठी कविता - [Manus Mhanun, Marathi Kavita] चल माणसा भाकीत कर, मन तुझं उघड कर.
माणूस म्हणून
चल माणसा भाकीत कर
मन तुझं उघड कर
जगण्याचा प्रवाह शिथिल कर
सुकर कर सुजय कर

ज्ञान लेऊन सज्ज हो
शास्त्र घेउन कर्ता हो
जीव-जीवाशी हर्ष कर
धर्म होऊन शासन कर

साद देऊन प्रतिसाद हो
आवाज ऐकून भाषा हो
मना-मनाला साथ कर
प्रयत्न तुझे सुफळ कर

सुकर्म करून वंद्य हो
हात देऊन मित्र हो
क्षणा-क्षणाला लक्ष्य कर
कर्तृत्वाला तुझ्या अजिंक्य कर

वर्तमानातून भविष्य हो
सावली देऊन दिशा हो
कणा-कणाला स्पर्श कर
माणूस म्हणून राज्य कर

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.