दूर राहिला गाव - मराठी कविता

दूर राहिला गाव, मराठी कविता - [Dur Rahila Gaav, Marathi Kavita] एक अनामिक ओढ लागली दूरदूर जाताना, मिटुनी लोचने पाहताहे मनातल्या आठवांना.
दूर राहिला गाव - मराठी कविता | Dur Rahila Gaav - Marathi Kavita
एक अनामिक ओढ लागली दूरदूर जाताना
मिटुनी लोचने पाहताहे मनातल्या आठवांना
मी तुझ्यात गुंतलेला, ओठी तुझेच नाव
दूर राहिला गाव

सावळ्याची निळी निळाई पसरलेली अंबरी
वसुंधरेचे रुप देखणे हिरवा शालू भरजरी
बंध तोडूनी परत फिरूनी वाटते मज जावं
दूर राहिला गाव

धुसर धुक्याच्या श्रावणधारा कधी पहाटचा मोहकवारा
क्षितीजावरची रंगीत उधळण आठवते मज इंद्रधनुसम
चांदणे शिंपून निशेने खेळला होता डाव
दूर राहिला गाव

आता न कळे कधी व्हायची भेट नव्याने तुझी
शब्द देवूनी जातो आहे येईन मी परतुनी
दूर मनाच्या खोल दरीतून दाटुनी आले भाव
दूर राहिला गाव


उमेश कुंभार | Umesh Kumbhar
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता आणि मराठी गझल या विभागात लेखन.

४ टिप्पण्या

  1. खूपच अप्रतिम आणि विलोभनीय नवीन रूप आहे,,,,मराठी मातीच
    1. आपल्या अभिप्रायाबद्दल आभारी आहोत.
  2. खुपच छान
    1. अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.