आज मी पुन्हा प्रेमात पडलो - मराठी कविता

आज मी पुन्हा प्रेमात पडलो, मराठी कविता - [Aaj Mi Punha Premat Padalo, Marathi Kavita] आज मी पुन्हा प्रेमात पडलो, कसे ते माहित नाही.
आज मी पुन्हा प्रेमात पडलो - मराठी कविता | Aaj Mi Punha Premat Padalo - Marathi Kavita
आज मी पुन्हा प्रेमात पडलो
कसे ते माहित नाही
बघुन मी भारावून गेलो
किती ते माहित नाही

काळजाचे ठोके चुकले
कसे ते माहित नाही
बघुन तुझ्या प्रेमात पडलो
किती ते माहित नाही

दिसतेस तु रोजच
कितीदा ते माहित नाही
बघुन मात्र हरवून जातो
कसे ते माहित नाही

तुच तू दिसतेस तु
सगळीकडे असतेस तु
पुन्हा मात्र हरवून जातो
भान माझे हरपून जातो

तुझ्या सोबत वेळ कसा जातो
ते मला माहित नाही
तु नसताना मात्र जगतो
कसा ते मला माहित नाही

श्वास हि तु माझा
प्रेम हि तु माझे
आयुष्य हि माझे तु
तु माझा अन्‌ मी तुझा

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.