अस्वस्थ संध्याकाळ - मराठी कविता

अस्वस्थ संध्याकाळ, मराठी कविता - [Asvasth Sandhyakal, Marathi Kavita] ही संध्याकाळ अस्वस्थ मनाची, विरहाची, आठवांची, ही संध्याकाळ परतीच्या पाखरांची, डोळ्यातल्या आसवांची.
अस्वस्थ संध्याकाळ - मराठी कविता | Asvasth Sandhyakal - Marathi Kavita
ही संध्याकाळ अस्वस्थ मनाची, विरहाची, आठवांची
ही संध्याकाळ परतीच्या पाखरांची, डोळ्यातल्या आसवांची

तुझे बोल येता कानी
तुझ्यासाठी गातो गाणी
तुझ्यासाठी वेडापिसा
होऊनिया जातो राणी
अंतरात तगमग मग का नाही व्हायची?
ही संध्याकाळ परतीच्या पाखरांची, डोळ्यातल्या आसवांची

चाललो अवखळ आपण
या व्याकुळल्या संध्याकाळी
हातामध्ये हात होता
तुझा सखे अशावेळी
पापणीतली ओली माया सांग किती जपायची?
ही संध्याकाळ परतीच्या पाखरांची, डोळ्यातल्या आसवांची

क्षितीजात विलीन तर
होणारच होते सारे
का इतका लळा लावूनी
मज बिलगले होते वारे?
वाट तुझी दिनकराने सांग किती पहायची?
ही संध्याकाळ परतीच्या पाखरांची, डोळ्यातल्या आसवांची


उमेश कुंभार | Umesh Kumbhar
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता आणि मराठी गझल या विभागात लेखन.

३ टिप्पण्या

  1. Nice attempt...
    But a very long way to go.
    1. अनुप,
      आपल्या अभिप्रायाबदल धन्यवाद!
    2. धन्यवाद
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.