एक घर - मराठी कविता

एक घर, मराठी कविता - [Ek Ghar, Marathi Kavita] एकदा खरेदीला निघालो, पण मला जे हवं होतं, ते कुठेच सापडेना.

एकदा खरेदीला निघालो, पण मला जे हवं होतं, ते कुठेच सापडेना

एक घर दगडांचं
जुन्या कोरीव विटांचं
सोप्याचं अन्‌ पडवीचं
बहरलेल्या अंगणाचं
दारापुढल्या तुळशीचं
घडवंचीवरच्या कळशीचं
एक घर

एक घर माणसांचं
दादाच्या खट्याळ हसण्याचं
ताईच्या खोट्या रूसण्याचं
आजोबांच्या कडक शिस्तीचं
आजीच्या गोड गोष्टींचं
आईच्या अथांग मायेचं
बाबांच्या खंबीर छायेचं
एक घर


श्रद्धा नामजोशी | Shraddha Namjoshi
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.