Loading ...
/* Dont copy */

स्कुबा डायव्हिंग - मराठी भयकथा

स्कुबा डायव्हिंग, मराठी भयकथा - [Scuba Diving, Marathi Bhaykatha] साहसाची ओढ किशोर आणि सारिकाच्या काही भलतीच अंगलट येते आणि सुरु होतो त्यांचा मृत्युशी पाठशिवणीचा खेळ याचीच कहाणी म्हणजे स्कुबा डायव्हिंग.

साहसाची ओढ किशोर आणि सारिकाच्या काही भलतीच अंगलट येते आणि सुरु होतो त्यांचा मृत्युशी पाठशिवणीचा खेळ याचीच ही कहाणी

साहसाची आवड अनेकांना असते. खुप थ्रिल वाटते, अंगावर रोमांच येतात. जेवढा धोका जास्त तेवढीच मजा जास्त, असे साधे समीकरण असते. मग अजून जास्त धोका पत्करायचा. कारण साहसाची नशा काही औरच असते. अशीच साहसाची ओढ किशोर आणि सारिकाच्या काही भलतीच अंगलट येते आणि सुरु होतो त्यांचा मृत्युशी पाठशिवणीचा खेळ याचीच कहाणी म्हणजे स्कुबा डायव्हिंग.

मॉर्निंग शिफ्ट जशी संपत येत होती तशी किशोरची चलबिचल वाढत होती. एव्हाना सारिकाचे ३ कॉल्स येऊन गेले होते. नाईट शिफ्टच्या इंजीनियरला त्याने विनंती करून १ तास लवकर बोलावले होते, पण तो अजुन आला नव्हता. एखादा चहा घ्यावा असा विचार करून किशोर ऑफिस जवळच्या एका टपरीपाशी आला. तेवढ्यात त्याला घाई गडबडीत कंपनीच्या बिल्डींग मध्ये शिरणारा विशाल दिसला. चहाची तलफ टाळून विशालच्या पाठोपाठ किशोरही ऑफिस मध्ये गेला. शिफ्ट अपडेट दिल्यावर, विशालचे लवकर आल्याबद्दल आभार मनात किशोरने आपल्या बुलेटला किक मारली आणि त्याची बुलेट धडधडत घराकडे निघाली. २५ मिनिटातच किशोर घरी पोहोचला, सारिका त्याची वाटच पाहात होती. तो आलेला दिसताच तिच्या चेहऱ्यावरील टेन्शन गायब झाले आणि त्याची जागा एका मधुर स्मिताने घेतली. “काय रे, किती उशीर?” असे ती लटके रागावताच त्याने तिला घट्ट मिठीत घेतले आणि कानात हळूच पुटपुटला “हॅप्पी ऍनिव्हर्सरी डियर, लेट्स सेलिब्रेट”. किशोर मुड मध्ये येत आहे; हे लक्षात येताच सारिका त्याच्यापासुन दूर होत म्हणाली, “आपली ८ ची गाडी आहे साहेब! आणि इथेच ७:१५ झालेत. ऍनिव्हर्सरी इथेच साजरी करायच्या विचार आहे की काय?’’ सारिकाने वेळेचे भान करून देताच किशोर पटकन फ्रेश होऊन आला, तिने केलेला गरमागरम चहा घेऊन ते दोघे बस स्टँडकडे दोन दिवसाचे मोजकेच कपडे व जुजबी सामान घेऊन निघाले.

किशोर एका कंपनीत टेक सपोर्ट इंजिनिअर म्हणुन काम करायचा तर त्याची बायको सारिका, PWD मध्ये असिस्टंट सिव्हिल इंजिनिअर म्हणुन कार्यरत होती. किशोर आणि सारिकाच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांनी तारकर्ली जवळील देवबाग हे ठिकाण निवडले होते. पहिल्या दिवशी समुद्रात मस्त डुंबायचे. स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्केलिंग, फोटोग्राफी वगैरे करायची. डॉल्फिन सफारीचा आनंद लुटायचा, सोबत मालवणी माशाच्या जेवणावर ताव मारायचा आणि दुसऱ्या दिवशी मालवण आणि आसपासचा परिसर फिरून यथेच्छ कोंबडी वडे हाणायचे. आणि मालवणच्या PWD च्या रिसॉर्टवर मस्त आराम करायचा असा बेत किशोरने आखला होता. तारकर्लीला PWD चे रिसॉर्ट नसल्यामुळे, तिथे याआधी गेलेल्या त्याच्या मित्राकडून किशोरने सगळी माहिती करून घेतली आणि तो राहिलेल्या हॉटेल मध्येच त्यानेही आपले राहण्याचे बुकिंग करून ठेवले.

[next] निगडी-मालवण बसने, रात्री बरोबर ८ वाजता पुणे सोडले. सातारा, कराड, कोल्हापूर, तळेरे, कणकवली करत पहाटे बरोबर ६ वाजता गाडी मालवणला पोहोचली. बसस्टँडवर देवबागसाठी गाडी लागलेलीच होती, त्यामुळे वेळ न घालवता हॉटेल वर गेल्यावरच फ्रेश होऊया असे किशोरचे मत होते. पण फार वेळात टॉयलेटला न गेल्याने, “दोनच मिनिटात आले, फार अर्जंट आहे”, म्हणत सारिका टॉयलेटकडे धावली. गाडीला उशीर होत असल्याने महिला कंडक्टर घाई करू लागली होती. सारिका अजून न आल्याने किशोरही वैतागला होता. इतक्यात घामाघुम झालेली सारिका, धावत त्याच्या दिशेने येताना त्याला दिसली. धापा टाकत सारिका त्याला काही सांगू पाहात होती, पण आधी गाडीत बस! म्हणत किशोरने तिला गाडीत जवळ जवळ ढकललेच. दोघे त्या गाडीत चढले आणि लगेचच गाडीने मालवणचे बसस्टँड सोडले.

गाडी मध्ये ड्रायव्हर आणि महिला कंडक्टर व्यतिरिक्त ते दोघेच होते. जांभा दगडाच्या लाल धुळीने माखलेल्या एकेरी अरुंद रस्त्यावरून ड्रायव्हर शिताफीने गाडी हाकु लागला. “येळेत येऊक काय होता तुमकां? फुडे पोचुक अमका लेट होता मा! पॅसेंजर खोळांबतत आणि आमका गाळये (शिव्या) खाऊचे लागतत. खय जाऊचा तुमकां?” महिला कंडक्टर करवादली! २ श्रीकृष्ण मंदिर द्या! किशोर उद्गारला. ‘गाडी व्हाया मोबार जातली, तिकिटाचे ३ रुपये जास्त लागतले, नंतर म्हणा नको की सांगला नाय म्हणान”, त्या महिला कंडक्टरने अस्सल मालवणी भाषेत सुनावले. “हो, हो! जे काय तिकीटाचे पैसे होतात ते घ्या तुम्ही!” असे किशोर म्हणताच ती कंडक्टर समजावणीच्या सुरात म्हणाली, ‘तसा नाय ओ, पण तुमका सांगतंय, ३ रुपयांसाठी पण लोकं भांडाक येतत. आता मोबारवाल्यान्का मालवणाक आणूक आणि देवबाग किंवा मोबाराक परत सोडूक जाऊक व्हया की नको? अंतर वाढला म्हटल्यावर पैसे पण वाढतले की नाय? तुमीच माका सांगा! एवढोच जर पैसो जाता तुमचो! तर या गाडीयेन येवा नको ना! पण नाय, त्यांका हीच गाडी व्हयी. फुकटचो डोक्याक ताप”. तिने आपली व्यथा मांडली. बरोबर आहे तुमचे, म्हणत दोघांच्या तिकिटाचे ३२ रुपये देवून किशोर आणि सारिका सिटवर सेट झाले.

[next] सारिका अजुनही गुदरलेल्या प्रसंगातून सावरली नव्हती. काय बोलावे तेच तिला कळेना. किशोरला आत्ता काही सांगावे तर तो वैतागेल; आपल्यालाच वेडात काढेल, त्यापेक्षा नंतरच बोलूया असा विचार करून ती गप्प बसली आणि खिडकीतुन बाहेर शुंन्यात बघू लागली. खिडकीतुन येणाऱ्या थंड वाऱ्याच्या झुळुकीने सारिका हळू हळू पेंगू लागली. एवढ्या सकाळी गाडीत त्या दोघांव्यतिरिक्त इतर कोणीही प्रवासी नसल्यामुळे इकडे ड्रायव्हर आणि कंडक्टर गजाली (गप्पा) मारू लागले. वेडी वाकडी वळणे घेत गाडी देवबाग जवळ करू लागली. थोड्या वेळाने किशोरने सहज म्हणुन सारिकाकडे वळुन पाहिले, तिची मान गाडीच्या तालावर वर खाली हलत होती. तिची बट वारंवार तिच्या गालाला स्पर्श करत होती ते पाहुन किशोरला त्या बटीचा हेवा वाटला. खिडकीतून येणाऱ्या चंद्रप्रकाशात तिचा मुळचा सुंदर चेहरा आणखीनच सुंदर दिसत होता. किशोर भान हरपुन तिचे सौंदर्य डोळ्यांत साठवत होता. त्याच्या डोळ्यासमोरून सारिकाशी झालेल्या पाहिल्या भेटीपासून ते आत्तापर्यंतचा काळ एखाद्या चित्रपटासारखा निघून गेला. एका खड्डयातून गाडीचे चाक गेल्यावर बसलेल्या दणक्याने भानावर आलेल्या किशोरला अचानक सारिकाच्या बाजूला काही तरी हालचाल जाणवली. एखादी मानवसदृश्य आकृती तिच्या शेजारी असल्यासारखे त्याला जाणवले जणु एखादी सावलीच. क्षणभर त्या सावलीने त्याच्याकडे पाहिल्यासारखे त्याला वाटले. त्यांची नजरा नजर होताच क्षणात ती गायब झाली. आपण पाहिले ते सत्य की भास असा मनात आलेला प्रश्न, त्याने “भासच असेल,” असे म्हणत उडवून लावला. सारिकाला गाढ झोप लागली होती. रस्ता अरुंद असल्यामुळे समोरून तुरळक येणाऱ्या मोठ्या वाहनांमुळे गाडी मागे पुढे होऊन पुन्हा मार्गस्थ होत होती. शेवटी ६:५५ ला गाडी त्या दोघांना घेऊन इच्छित स्थळी पोहोचली.

मालवण बसस्टँड वरून फोन करून किशोरने आपण येत असल्याची कल्पना हॉटेलवाल्याला दिली होती. श्रीकृष्ण मंदिराजवळ अक्षय मालवणकर त्या दोघांची वाट पाहताच उभा होता. गाडी थांबताच त्याने त्या दोघांना हात दाखवला. टिशर्ट आणि बर्मुडावर आलेल्या अक्षयला पाहून किशोर आणि सारिकाने विस्मयाने एकमेकांकडे पहिले. “येवा, प्रवास कसो झालो? आज गाडी लवकर ईली, सकाळ असल्यामुळे ट्रॅफिक लागुक नाय वाटतां” वगैरे बोलत अक्षयने त्यांचे स्वागत केले. त्यांच्या बॅग्स वगैरे उचलण्याच्या भानगडीत न पडता, माझ्या वांगडा (सोबत) येवा म्हणत तो एका घराच्या दिशेने चालू लागला. किशोर आणि सारिका निमूटपणे त्याच्या मागे जाऊ लागले. जसा अक्षय घरात शिरू लागला तसे किशोरने त्याला थांबवले आणि म्हणाला की आम्हाला हॉटेल वर जायचय, तुम्ही इकडे कुठे घेऊन चाललात? तेव्हा, थोडो प्रोब्लेम झालो असा, आत येवा; सांगतंय! म्हणत अक्षय घरात शिरला, सारिकाने कपाळावर आठ्या आणल्या पण ती काही बोलण्या अगोदर किशोर घरात शिरल्यामुळे तिही त्याच्या मागे निमुटपणे आत गेली. ते कौलारू घर बऱ्यापैकी मोठे होते. समोरच एका गणपतीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केलेली होती. ह्यो आमचो गणपती, नवसाक पावता हो! तुमका काय नवस बोलुचो असतलो तर बोलान घेवा, नक्की पुरो होतलो, अक्षय अभिमानाने बोलला.

[next] शेवटी संय्यम संपल्यामुळे किशोरने अक्षयला विचारले हा काय प्रकार आहे? आम्हाला हॉटेल वर न्यायचे सोडुन तुम्ही या घरात आणुन नवस कसले बोलायला सांगताय? तसा अक्षय त्यांना म्हणाला, “दादानु भडकताव कशाक? तुमचा बुकिंग ज्या हॉटेलात झाला होता ना ता माज्या मावस भावाचा असा, पण थय रूम फुल असत म्हणान तुमची सोय माज्या घरात केलेली असा.” ते ऐकताच किशोर आनखीनच भडकला. अहो याला काय अर्थ आहे? बुकिंग केलेले असताना रूम फुल कश्या असु शकतात? आणि हॉटेल सोडून तुमच्या घरात आम्ही कसे राहायचे? तेव्हा अक्षय म्हणाला, “अवो! तुमका माझो भाव फोन लावी होतो पण तुमचो फोन लागाक नाय. तुमी चार दिवसापूर्वी बुकिंगचा नुसता फोनवर सांगलेला होता, आगाऊ पैशे पण देऊक नाय, येतलास की नाय ता पण कळुचो मार्ग नाय. म्हणान काल जे कस्टमर, रुम हा काय? इचारुक ईले होते; त्यांका त्याने रूम देऊन टाकल्यान. आता त्याचे सातही रूम फुल असत. उद्या खाली होतले. माझ्याकडे दोन रूम असत. त्याच्या एवढे पॉश नाय पण चांगले असत. आता तिथे कस्टमर असत, ते १०-१०:३० वाजता रूम सोडतले मग रूम साफ करून मी तुमका थय शिफ्ट करतय. तोवर तुम्ही फ्रेश व्हा, च्या घ्या आणि इथे या रूममधे वाईच पडा.” यावर चिडून किशोर म्हणाला, “अरे! पण सकाळी मी मालवणात पोहोचल्यावर त्यांना फोन लावला होता, तेव्हा त्यांनी हे का नाही सांगितले? आम्ही मालवणातच एखाद्या हॉटेलवर उतरलो असतो ना! उलट ते या म्हणाले, मग आधीच कशी काय रूम दिली?” किशोर आता चांगलाच चिडला होता. “अवो त्याने तुमका रूम नाय म्हणान सांगल्यान असता तर तुमी आणि चिडले असतत. आणि हय माझी रूम असा ना तुमच्यासाठी! म्हणान तर त्याने तुमका येऊक सांगल्यान. अहो तीन दिवस लागून सुट्टी ईली हा, म्हणान सगळेच रूम फुल असत. हयसर बऱ्याच जणांनी आपापल्या घरात एक दोन रूम उठवून न्याहारी-निवासचो धंदो सुरु केलो हा. पावण्यांका हॉटेलपेक्षा थोडा स्वस्त पडता आणि इथल्या लोकांका पण चार पैसे सुटतत. आता या टायमाला तुमका पुऱ्या देवबागात खय पण रूम मिळाची नाय. सगळा फुल हा! थोडावेळ हयसरच आराम करा नंतर रूम खाली झाली की थय शिफ्ट व्हा. टेन्शन घेवा नको, मी आसय मा?” आये, दोन कप च्या टाक ग पावण्यांका! म्हणत त्याने घरातील एक रूम उघडून दिली आणि अक्षय माजघरात गेला पण.

किशोर आणि सारिका एकमेकांकडे पाहतच राहिले. आलीया भोगाशी असावे सादर म्हणत दोघांनी प्रातर्विधी आवरले, दिलेला चहा निमुटपणे घेतला आणि त्या रूम मधे ताणून दिली. किशोरला झाला प्रकार सांगावा की नाही या विचारात सारिका असतानाच रात्रभर प्रवास आणि जागरण झाल्यामुळे किशोरला चटकन झोप लागली. तिच अवस्था सारिकाचीही असल्यामुळे तिही झोपेच्या अधीन झाली. साधारण १०:३० ला अक्षयची हाक ऐकून दोघांची झोप उघडली. सारिका तर दचकुनच उठली. तिला स्वप्न पडले होते आणि स्वप्नात तिला मगाशी घडलेला अतर्क्य प्रसंग पुन्हा जसाच्या तसा दिसल्यामुळे ती प्रचंड घाबरली होती. किशोरने तिला जवळ घेतले, “काय गं? स्वप्न पडले का भीतीदायक? जागी हो नीट. आणि चल ऊठ पाहु लवकर! रूम रिकामी झाली आहे. पटकन आवरून निघुया नाहीतर सगळा दिवस वेस्ट होईल.” असे म्हणत किशोर कपडे वगैरे गोळा करू लागला. सारिका त्याला हाक मारेपर्यंत तो रूमच्या बाहेर पडला पण. मग सारिकाने त्याला काहीच न सांगण्याचा निर्णय घेतला. तिला किशोरचा मुड आणि दिवस खराब करायचा नव्हता. तसेही आता काही भीती नाही असे तिने स्वतःला समजावले आणि किशोरच्या मागोमाग ती उरलेले समान घेऊन बाहेर पडली. सगळे सामान हातातच घेऊन रस्त्यातून चालत ते दोघे एक घर सोडून असलेल्या अक्षयच्या त्या हॉटेल वजा घराकडे निघाले. वातावरणात तितकासा उकाडा असल्यामुळे त्यांनी १००० रुपयात नॉन एसी रूम घेतली. १० बाय १२ ची रूम आणि तिलाच जोडून असलेले एक संडास बाथरूम, बस! एसीसाठी असलेल्या स्वीच जवळचा फ्युज काढून अक्षय ने एसी रूमला नॉन एसी केले व साबण आणि गरम पाणी आणण्यासाठी निघुन गेला. त्या रूममधे १ डबल बेड आणि एक टेबल होते त्यावर टाटा स्कायचा बॉक्स होता पण टीव्ही मात्र गायब होता. एकंदर आपला पुरता पचका झाला हे लक्षात येताच किशोरची जाम चिडचिड झाली. पण सारिकाने त्याला समजावले, ''अरे, तसेही दिवसभर आपण बाहेरच असणार आहोत, रात्री झोपण्यापुरतीच तर रूम पाहिजे आपल्याला. काय करायची आहे ३ हजाराची रूम? ही ठीक आहे! आणि आपले पैसे पण वाचलेत. ते खाण्या-पिण्यावर आणि एन्जॉयमेंटवर खर्च करू. चल आवरून घे पटकन” म्हणत ती बाथरूम मधे पळाली. सारिकाचा समजुतदारपणा पाहुन किशोरला नकळत तिचा अभिमान वाटला.

[next] सारिका आंघोळीला बाथरूम मध्ये गेली. गरम पाणी अंगावर पडताच तिला खुप रिलॅक्स वाटले, पटकन तिने आंघोळ उरकली आणि बादलीत उरलेले चार तांबे डोळे मिटुन अंगावर घेताना तिला आजूबाजूचे वातावरण अचानक खुप थंड झाल्यासारखे वाटले. चक्क तिच्या तोंडुन थंडीत जशी बाहेर पडते तशी वाफ बाहेर पडली. तिला एकदम हुडहुडी भरून आली. समुद्र किनारी इतकी थंडी वाजणे हे तिच्या बुद्धीच्या पलीकडले होते. तिने डोळे उघडले तसे तिला त्या बाथरूम मध्ये कोणाचे तरी अस्तित्व असल्याचे जाणवले. मालवणच्या स्टँडवर शौचालयात तिला जी सावलीसारखी काळी आकृती दिसली होती तिच बाथरूमच्या खिडकी जवळ तरंगताना दिसली. त्या आकृतीला निश्चित असा आकार नव्हता पण डोळ्यांसारखे दिसणारे दोन तेजस्वी गोळे तिच्याच रोखाने पाहत होते. भीतीने तिची बोबडीच वळली. ज्या गोष्टीला ती इतका वेळ भास म्हणुन उडवून लावायचा प्रयत्न करत होती तीच गोष्ट तिच्या समोर आपले अस्तित्व सिद्ध करत होती. तिने किशोरला हाक मारायचा केविलवाणा प्रयत्न केला पण तिच्या तोंडुन एक एक्षरही बाहेर पडले नाही. हळु हळु त्या आकृतीला एक मानवी आकार प्राप्त होऊ लागला. तो स्त्री सदृश्य आकार पाहुन आपले सगळे अवसान गोळा करून सारिकाने बाथरूमचा दरवाजा उघडला व बाहेर येऊन दरवाजा घट्ट लावला. तिने किशोरला हाक मारली. बाहेर अक्षयशी बोलत असलेल्या किशोरला तिच्या आवाजातील भय जाणवले. तो धावतच रुम मध्ये आला तेव्हा सारिका बेसिन खाली अंग चोरून बसलेली त्याला दिसली. तो तिच्या जवळ जाऊन तिला बाहेर बोलावू लागला पण त्याची हाक तिच्यापर्यंत पोहचलीच नाही. त्याने तिच्या खांद्याला स्पर्ष करताच ती कमालीची दचकली. त्याला पाहताच ती वेगाने बाहेर आली आणि त्याला घट्ट मिठी मारून ती ओक्साबोक्षी रडु लागली.

तिचा आवेग ओसरेपर्यंत किशोरने काहीही न बोलता तिला आपल्या छातीशी धरले. ती जशी शांत झाली तसे त्याने तिला प्रेमाने विचारले, “काय झाले सरू? मगाशी झोपून उठल्यावर पण तु केवढ्याने दचकलीस! काय होतंय तुला?” यावर सारिका मुसमुसत म्हणाली की आपण परत जाऊ, मला नाही राहायचे इथे. “कायतरीच काय बोलतेस सरू! अगं तुला समुद्रकिनारी जायचे होते, म्हणून तर आलो ना आपण इथे? आता तूच इथे राहायचे नाही म्हणतेस! नक्की काय झालय ते मला सांगशील?” किशोर काळजीने म्हणाला. सारिका बोलू लागली, “ मालवणला उतरल्यावर मी शौचालयात गेले होते, आठवतंय? खूप घाण होते पण नाईलाजाने मी उरकले आणि निघणार इतक्यात माझे लक्ष कोपऱ्यात पडलेल्या एका पिशवीकडे गेले काही कुत्रे त्या पिशवीला हुंगत होते. त्या कुत्र्यांना मी हाकलले. कोणी तरी गडबडीत विसरून गेले असावे. त्यात काय आहे ते पाहावे आणि ती पिशवी बस स्थानक प्रमुखाकडे द्यावी असा विचार करून मी आत पहिले. त्यात स्त्री जातीचे मृत अर्भक होते. घाबरून माझ्या तोंडून निघाले, अगं बाई कोणाचे आहे हे? आणि मागून एक आवाज आला, “माझा असा ता!” दचकल्यामुळे ती पिशवी माझ्या हातून खाली पडली. मी वळून पाहिले पण तिथे कुणीच नव्हते. निट पाहिले तर तिथे एक काळी आकृती तरंगत होती. ती इतकी भयानक दिसत होती की मला घामच फुटला. “माका माझा बाळ व्हया असा, मी येव तुझ्या वांगडा (बरोबर)?” असे तिने विचारताच माझे अवसानच गळाले आणि मी जीव मुठीत घेऊन पळत सुटले. तिच काळी आकृती मला आत्ता बाथरूम मध्ये पुन्हा दिसली.” सारिका भीतीने थरथरत होती.

[next] "म्हणजे मला झालेला तो भास नव्हता तर!” किशोरच्या या वाक्याने सारिका हादरलीच. “म्हणजे? तुला नक्की काय म्हणायचंय किशोर?” सारिकाच्या प्रश्नावर किशोर म्हणाला, “सकाळी बसमध्ये अशीच एक आकृती तुझ्या बाजूला तरंगताना मी पहिली. आधी मला वाटले की मला भास झाला असेल, पण आता जे तू सांगितलंस, त्यावरून मला वाटते की तू त्या शौचालयातून येताना एकटी नाही आलीस. तर आपल्या सोबत काहीतरी अमानवीय घेऊन आली आहेस. मला वाटते की आपण लगेच पुण्याला निघूया. बॅग्स पॅक कर. मी अक्षयला सांगतो की आम्ही रुम सोडतोय.” असे म्हणुन किशोर बाहेर जाण्यासाठी वळला. तो जेमतेम दरवाज्यापाशी गेला असेल तोच सारिकाचा आवाज त्याच्या कानावर पडला, “थांब!". त्या आवाजात जरबंच एवढी होती की किशोर जागेवरच थांबला. त्याने वळून पहिले तर सारिका उठून उभी राहिली होती. तिचा चेहरा विलक्षण शांत वाटत होता. भितीचा लवलेशही तिथे नव्हता ते पाहुन किशोरला आश्चर्य वाटले. अचानक नेहेमीचे हसरे खेळकर भाव चेहऱ्यावर आणत सारिका त्याच्याजवळ आली आणि म्हणाली, “काही नको रूम सोडायला, मी ठीक आहे. नको काळजी करूस. एकाच दिवसाचा तर प्रश्न आहे! तसेही रुम सोडली तरी भाडे तर द्यावेच लागेल ना? त्या पेक्षा आज मस्त एन्जॉय करू, उद्या बघु काय करायचे ते. तू जाऊन नाश्ता सांग. तोपर्यंत मी आवरते". एवढे बोलून गाणे गुणगुणत ती आवरायला लागली. तिच्यातील अमुलाग्र बदल किशोरला चक्रावून गेला. आत्तापर्यंत भीतीने गाळण उडालेली सरू अचानक इतकी बिनधास्त कशी झाली हेच त्याला समजेना. पण तिच्या बोलण्यात तथ्य होते आणि त्या आकृतीने अजुनपर्यंत काही त्रास दिला नव्हता त्यामुळे तोही थोडा निर्धास्त झाला. तुला जर काही प्रॉब्लेम वाटत नसेल तर ठीक आहे. मी नाश्त्याची ऑर्डर देऊन येतो म्हणत तो बाहेर गेला. इकडे आवरत असलेल्या सारिकाच्या चेहेऱ्यावर मात्र एक वेगळेच खुनशी हास्य पसरले होते.

ज्या हॉटेल मधे ते उतरणार होते तेे अक्षयच्या हॉटेल कम रूमच्या समोरच होते. आवरल्यावर किशोर आणि सारिका तिथे गेले तेव्हा तिथला मालक अक्षय देसाई त्यांना सामोरा गेला, त्याने तसदी बद्दल त्यांची माफी मागितली. ३० रुपये पर प्लेट या दराने पोहे आणि १५ रुपये दराने चहा घेऊन, मनात शिव्यांची लाखोली घालत किशोर आणि सारिका रूमवर परतले. तोपर्यंत अक्षय मालवणकरने स्कुबा डायव्हिंगसाठी एका माणसाला बोलावले होते. घासाघीस करत १५०० वरून १४०० रुपये स्कुबा डायव्हिंग साठी आणि ६०० रुपये स्नॉर्केलिंग साठी द्यायचे ठरले. साधारण १ किलोमिटर चालत ते बिच वर पोहोचले. बिच पूर्णपणे पर्यटकांनी भरले होते. सर्वचजण बोटिंग, वॉटर स्कुटर, पॅरा सेलिंग, स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्केलिंग, बनाना राईड इत्यादीचा आनंद लुटण्यासाठी आतुर झाले होते. पैसे भरून झाल्यावर किशोर आणि सारिका इतर पर्यटकांसह ठरलेल्या बोटीत बसण्यासाठी निघाले तेव्हा दुपारचे साडेबारा झाले होते. सूर्य माथ्यावर तळपत होता आणि वाळु चांगलीच तापली होती. शूज काढून चटके बसणाऱ्या वाळुवर उघड्या पायांनी धावतच किशोर बोटी जवळ पोहोचला. सारिका कुठे राहिली म्हणुन त्याने वळून पाहिले तर त्या भाजून काढणाऱ्या वाळूत सारिका मजेत बसली होती. किशोरसह आजूबाजूचे सगळेच लोक तिच्याकडे आश्चर्याने पाहात होते. वेडी आहे का ही? त्या गरम वाळूत कशी बसली आहे बघा तरी! हिला भाजत नाही का? वगैरे कुजबूज सुरु झाल्यावर अजून तमाशा नको असा विचार करून नाईलाजाने किशोर परत त्या तापलेल्या वाळूत तिला जाऊन घेऊन आला. किशोरचे तळपाय चांगलेच पोळले होते, बिचाऱ्याला आग आग होत होती. समुद्राच्या थंड पाण्यात पाय बुडवल्यावर त्याला जरा बरे वाटले. एरव्ही जरा काही झाले तर आकांडतांडव करणारी सारिका आज मात्र त्या गरम वाळूवर, हिरवळीवर फिरावे तशी फिरत होती. आपल्याच विश्वात हरवलेल्या सारिकाच्या चेहऱ्यावर एक कमालीचे गुढ स्मित विलसत होते.

[next] साधारण १५ मिनिटात सगळे बोटीत बसल्यावर कोरल्स पाहण्यासाठी त्यांची बोट खोल समुद्राच्या दिशेने जाऊ लागली. काही जण खूप ऊत्साहित होते तर काहीना पाण्यात उतरण्याच्या नावानेच धडकी बसली होती. सारिकाच्या चेहऱ्यावर अजूनही ते गुढ स्मित विलसत होते. अनिमिश नेत्रांनी ती बोटीमुळे उसळणाऱ्या पाण्याकडे पाहात होती. किशोरला तिचे वागणे जरा विचित्रच वाटत होते, पण लोकांसमोर फुकटचा तमाशा नको म्हणुन तो गप्प होता. अचानक सारिकाच्या डोळ्यातील एक वेगळीच चमक त्याने टिपली. कोणाला काही कळायच्या आत सारिका ऊठुन ऊभी राहिली आणि बोटीच्या कठड्यावरून पाण्यात हात बुडवायला झुकली त्याने बोटीचे संतुलन बिघडले आणि बोट सारिकाच्या बाजुने झुकली. पण वेळीच किशोरने तिला मागे खेचल्यामुळे ती पाण्यात पडता पडता वाचली. बोटीत एकच घबराट पसरली. नावाड्यासह बोटीतील इतर प्रवासी सारिकाला दुषणे देऊ लागले. सारिकाच्या वतीने किशोर माफी मागत होता पण कोणीच ऐकायला तयार नव्हते. लोकांचा आवाज जसा चढत होता तशी सारिका जास्तच अस्वस्थ होत होती. शेवटी ती ताडकन उभी राहिली आणि तिने मोट्ठी आरोळी ठोकली. तिची आरोळी एवढी कर्कश होती की सर्वांनी कानावर हात घेतले. बोटीत एक भयाण शांतता पसरली होती. सर्वजण तिच्याकडे भितीयुक्त विस्मयाने पाहत होते. तोच ती कडाडली, “आता जर का माका कोणी काय बोल्लो, तर त्याची खांडोळी करून टाकतलय. तुमच्या पैकी एकाक पण मी जित्तो सोडुचं नाय". एवढे बोलून तीने उरात धडकी बसेल असे एक अमानवी खरंतर सैतानी म्हणावे असे हास्य केले. तिचा तो आवेश आणि चेहेऱ्यावरील भाव पाहून सर्वांचीच पाचावर धारण बसली. मराठी बोलणारी सारिका अस्सल मालवणीत बोलली होती. बोटीत स्मशान शांतता पसरली. किशोरही मनातून हादरला होता. पुढच्याच क्षणाला सारिका एकदम नॉर्मल झाली जणु काही झालेच नाही. किशोरच्या हाताला आपल्या हातांनी वेढा देत तिने आपले डोके त्याच्या खांद्यावर ठेवले. पुन्हा तिच्या चेहऱ्यावर तेच गुढ स्मित विलसु लागले होते.

तिच्या वागण्यातील अमुलाग्र बदल पाहून सर्वजण चक्रावलेच. हळू आवाजात लोकांची कुजबुज सुरु होती पण अजूनही भीती गेली नसल्यामुळे सर्वच तिची नजर टाळत होते. थोडा वेळ गेल्यावर सर्वजण ठरलेल्या स्पॉट जवळ पोहोचले. तिथे आधीच असलेल्या एका बोटीला खेटून त्यांची बोट थांबली आणि पाण्यात नांगर टाकला गेला. नंतर सुरु झाले बोटीतील प्रवाशांचे हस्तांतरण. या बोटीतील प्रवासी त्या बोटीत आणि त्या बोटीतील प्रवाशी या बोटीत असा रोजचा सरावाचा पण थोडा धोकादायक प्रकार सुरु झाला. ५ मिनिटात सर्व प्रवाश्यांची अदलाबदल करून आलेली बोट किनाऱ्याकडे निघुनही गेली. मग सुरु झाले स्कुबा डायव्हिंग. एक एक करून लोकं ट्रेनर सोबत समुद्रात उतरत होते, डायव्हिंगचे टेक्निक समजुन घेत होते आणि अथांग समुद्राच्या अंतरंगात डोकावण्यासाठी बुडी मारत होते. किशोरला स्कुबा डायव्हिंग करायचे असल्यामुळे तो खूप ऊत्तेजित झाला होता. पण सारिका मुळातच घाबरट असल्यामुळे ती स्नॉर्केलिंगसाठी पण पाण्यात उतरायला तयार नव्हती. किशोरने तिला खूप समजावले, धीर दिला, पैसे वाया जातील असे सांगितले पण तिचा काही धीर होईना. मग आपल्याला पाण्यात उतरलेले पाहुन तिचाही मुड होईल असा विचार करून त्याने स्कुबा डायविंगचे उपकरण आपल्या शरीरावर बसवण्यास तिथल्या लोकल ट्रेनरला सांगितले. चेहऱ्यावर मास्क बसवून व बोटीवर बसवलेल्या एअर कॉमप्रेसर पासून निघालेली लांबलचक पाईप, तोंडाने श्वास घेण्याच्या उपकरणाला जोडून तो ट्रेनर सोबत त्या थंड पाण्यात उतरला. लाईफ सेव्हिंग ट्यूब गळ्यात घालून प्रथम त्याने पाण्याखाली तोंडाने श्वास घ्यायचे टेक्निक समजावुन घेतले. ऑल ओकेसाठी छानची खुण आणि काही प्रॉब्लेम वाटल्यास थम्स अपची खुण अशा खुणा ठरवून बघता बघता तो ट्रेनर सोबत पाण्याखाली गायब झाला. डायव्हिंग करण्याच्या उत्साहात तो सारिकाला बाय करायलाही विसरला.

[next] किशोर सारखेच बोटीतील इतर लोक डायव्हिंगसाठी उत्साही असल्यामुळे बोटीच्या एका टोकाला बसलेल्या सारिका आणि तिच्या मागे असलेल्या त्या काळ्या आकृतीकडे कोणाचेच लक्ष नव्हते. सारिकाला आणि इतर कोणालाही काही कळण्यापूर्वीच त्या आकृतीने सारिकाला पाण्यात ढकलुन दिले. सारिका पाण्यात गटांगळ्या खाऊ लागली, आणि बोटीवर एकच गलका झाला. सर्वच जण आरडा ओरडा करू लागले. बोटीतील नावाडी झाला प्रकार समजून काही कृती करेपर्यंत त्या काळ्या आकृतीने सारिकाला समुद्रात खोलवर नेण्यास सुरवात केली होती. इकडे ट्रेनर सोबत पाण्यात कोरल्स आणि विविध मासे बघण्यात हरवलेल्या किशोरला आपल्या डाव्या बाजूला काही हालचाल जाणवली. एखादा डॉल्फिन असावा असा समज करून त्याने तिकडे पहिले तशी पाण्यात खोलवर ओढली जाणारी सारिका त्याला दिसली आणि तो हादरलाच. खुणेनेच त्याने सोबत असलेल्या ट्रेनरचे लक्ष्य सारिकाकडे वेधले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ट्रेनर वेगाने पोहत सारिकापाशी पोहोचला त्याने सारिकाचे नाक दाबून धरले व स्वतःचे हवेचे उपकरण तिच्या तोंडात घातले. तिचा हात धरून तिला पाण्याच्या पृष्ठभागावर नेण्याचा तो प्रयत्न करू लागला. पण खालून त्या आकृतीने तिला धरून ठेवल्याने तिला वर खेचणे त्याला शक्य होत नव्हते. इतक्यात किशोर त्याच्या मदतीला आला. त्याने सारिकाचा पाय धरून तिला वर ढकलायचा प्रयत्न करताच त्या आकृतीने तिला सोडले व सारिका वेगाने वर जाऊ लागली तोच सारिकाच्या भोवती गरागरा फिरणारी ती भयानक आकृती किशोरच्या नजरेस पडली आणि तो क्षणभर घुसमटलाच. वेगाने हातपाय मारत तो आणि ट्रेनर सारिकाला घेऊन पृष्ठभागावर आले. नावाड्यानी हात देऊन सारिकाला बोटीत खेचून घेतले, पाठोपाठ किशोर आणि तो ट्रेनरही बोटीवर आले. ताबडतोब CPR दिल्यामुळे सारिकाचे प्राण तर वाचले होते पण किती काळासाठी?

बोटीने एव्हाना समुद्र किनारा गाठला होता. मलुल पडलेल्या सारिकाला घेऊन किशोर रूमवर पोहोचला तेव्हा ४ वाजून गेले होते. अक्षय देसाईंने आणून ठेवलेल्या जेवणाच्या थाळ्या पाहून दोघांनाही भुकेची जाणीव झाली. अजिबात किरकिर न करता थंडगार झालेल्या त्या थाळ्यांवर दोघेही तुटून पडले. सारिका थकल्यामुळे लगेचच झोपेच्या अधीन झाली, पण मनातून खूप धास्तावल्यामुळे ती झोपेतही किशोरला बिलगूनच होती. पोटात अन्न गेल्यामुळे मेंदुला तरतरी आलेला किशोर, आत्तापर्यंत भास म्हणून उडवून लावलेल्या आणि मालवण पासून घडत आलेल्या सर्व घटनांचा तपशीलवार विचार करू लागला. किशोरच्या एव्हाना लक्षात आले होते की आपल्या सरुच्या जीवाला त्या काळ्या आकृतीपासून धोका आहे. पण जेव्हा जेव्हा किशोर जवळ होता त्या आकृतीने सारिकाला काही नाही केले पण तो दूर असतानाच तिने सारिकाच्या जवळ जाण्याचा अथवा हानी पोहोचवायचा प्रयत्न केला होता. मगाशी पाण्याखाली सुद्धा किशोर सारिका जवळ जाताच तिने सारीकाला सोडले होते, पण का? असे काय होते जे तिला किशोर पासुन दूर ठेवत होते? विचार करता करता किशोरचे लक्ष त्याच्या गळ्यातील मारुतीच्या लॉकेट कडे गेले जे त्याच्या आईंने तो लहान असताना जेव्हा रात्री घाबरून उठायचा तेव्हा खास त्याच्यासाठी एका महाराजांकडून सिद्ध करून आणले होते. कोणताही विचार न करता त्याने ते लॉकेट सारिकाच्या गळ्यात बांधले. त्या आकृतीने आत्तापर्यन्त किशोरला काहीच त्रास दिला नव्हता त्यामुळे तो निर्धास्त होता. एकदा का सकाळ झाली की लगेच पुणे गाठु मग आपणाला काही धोका असणार नाही असा विचार करून तो ही थोडा सुस्तावला.

[next] भिंतीवर जोरात डोके आपटल्यामुळे किशोर कळवळला. त्याने इकडे तिकडे पाहिले तर तो जमिनीवर पडला होता. हाताला काही तरी ओले लागले म्हणुन त्याने पहिले तर त्याला रक्त दिसले. त्याला काहीच कळेना की तो जमिनीवर कसा फेकला गेला. जखमेवर हात दाबून धरत तो भिंतीचा आधार घेत कसाबसा उभा राहीला. सारिका बेडवर शांत झोपली होती. तिला सुरक्षित पाहून त्याला हायसे वाटले, तोच कोणीतरी त्याचा गळा आवळत असल्याची त्याला जाणीव झाली, त्याचा श्वास कोंडू लागला. तो त्या पकडीतून सुटायचा प्रयत्न करत होता पण ती पकड इतकी जबरदस्त होती की त्याचे डोळे फिरू लागले. तो हातपाय झाडू लागला, त्याची एक लाथ बेडवर बसली. त्या दणक्याने जाग्या झालेल्या सारिकाने लाईट लावला, आणि समोरचे दृश्य पाहून तिचा श्वासच अडकला. आत्तापर्यंत तिला दिसणारी ती स्त्री सदृष्य आकृती तिच्या किशोरचा गळा दाबत होती. ते पाहून सारिका प्रचंड चिडली. अचानक कोण जाणे कुठून तिच्यात शक्ती संचारली आणि त्या आकृतीवर धावून जात ती ओरडली, “सोड माझ्या किशोरला! का आम्हाला त्रास देत आहेस तु? आम्ही काय बिघडवले आहे तुझे म्हणुन असा छळ मांडला आहेस?” असे म्हणत ती त्या आकृतीचे हात त्याच्या गळ्यापासून दूर करण्यासाठी पुढे सरसावली. त्या बरोबर ती आकृती भयानक हास्य करत गायब झाली, पण जाता जाता तिचे वाक्य त्या रुम मध्ये घुमले, “माका माझा बाळ व्हया असा". रूम मध्ये सुरु असलेली गडबड ऐकून अक्षय मालवणकर धावतच आला व “सायबानू काय झाला?” म्हणत रुमचा दरवाजा ठोठावू लागला. त्याचा आवाज ऐकून सारिकाच्या जीवात जीव आला. किशोरला सावरत तिने दरवाजा उघडला.

रक्ताने माखलेल्या किशोरला पाहून अक्षय चाटच पडला, “काय झाला काय, सायबांका? डोका कशान फुटला?” अक्षयने प्रश्नांची सरबत्ती सुरु केली, तेव्हा “सगळं सांगते आधी यांना डॉक्टर कडे घेऊन चला” म्हणत सारिकाने रूमला लॉक लावले. डॉक्टरांनी मलमपट्टी केल्यावर ते रुमवर परतले. तसे तिने मालवणच्या बसस्टँड वरील शौचालयापासून ते आत्तापर्यंत अनुभवलेले सर्व काही अक्षयला कथन केले. अक्षय सर्व काही ऐकल्यावर, “वाईच (जरा), हयसरच बसा सायबांच्या वांगडा (जवळ); मी इलय म्हणत आपल्या घरात गेला. त्याने घडलेला सर्व वृत्तांत आपल्या वडीलांच्या कानावर घातला. किशोर बेडवर पडून होता तर सारिका त्याच्या उशाशी बसून होती. दोघेही कुठुन या संकटात सापडलो असा विचार करत असतानाच अक्षयचे वडील रमेश मालवणकर, अक्षय सोबत सारिका आणि किशोर उतरलेल्या रूमवर आले. त्यांना आलेले पाहाताच किशोर उठुन बसला. रमेश मालवणकर बाहेरची बाधा झालेल्या लोकांना अमानवी शक्तींच्या त्रासातुन मुक्त करत असत. रुम मध्ये येताच त्यांना तिथे असलेल्या आत्म्याचे अस्तित्व जाणवले. त्याबरोबर त्यांनी अक्षयला रूमच्या बाहेर जाण्यास सांगितले व आतुन कडी लावली. रमेश मालवणकर म्हणाले, “काळजी करा नको, मी तुमका यातून खात्रीने सोडवतलंय फक्त मी जे काय प्रश्न विचारतलय त्यांची तुमी निट आठवून उत्तरा देऊक व्हयी. भूतां कोणाक पण असा धरनंत नाय, त्यांचो कायतरी उद्देश असताच जो पूरो करूक त्यांका माणसांची गरज पडता. ही जी काय बायलेची (स्त्रीची) काळी आकृती तुमकां दिसता तिने तिका तुमच्या कडून काय व्हया असा याची कायतरी हिंट तुमकां नक्की दिली असतली. माका निट आठवून सांगशाल तर माका त्येचो इलाज करूक मदत होतली". यावर सारिका लगेच म्हणाली, “मी जेव्हा शौचालयात त्या मृत अर्भकाला पाहिल्यावर घाबरून म्हणाले की कोणाचे आहे हे? तेव्हा तिने ऊत्तर दिले की, ते तिचे आहे आणि नंतर ती म्हणाली की माका माझा बाळ व्हया असा, मी येव तुझ्या वांगडा? का असच काहीतरी. मगाशी जेव्हा मी तिचे हात किशोरच्या गळ्यावरून दूर करायचा प्रयत्न केला तेव्हा ती गायब झाली पण परत तेच वाक्य बोलली, “माका माझा बाळ व्हया असा.”

[next] हे ऐकल्यावर रमेश मालवणकरांच्या सगळा प्रकार लक्षात आला. वेळ फार थोडा आहे तेव्हा घाई करायला पाहिजे हे त्यांनी ताडले. “मी आता जे काय सांगतंय ते निट समजून घेवा आणि तसाच करा. सायबानु, यात टायमिंगच मेन असा, त्यामुळे जराशी जरी चुक झाली तरी तुमी तुमच्या बायलेक कायमचे मुकतलात.” असे म्हणत त्यांनी दोघांना काय करायचे आहे हे नीट समजावले. मग सोबत आणलेल्या पिशवीतून त्यांनी भस्म काढले व त्यापासून एक वर्तुळ बनवले. नंतर पिशवीतून आणलेल्या मिठाने त्यांनी भस्माच्या वर्तुळाभोवती त्यापेक्षा एक मोठे वर्तुळ काढले. दोन वर्तुळामधील जागेत त्यांनी एक पिशाच्चबंध मंत्र गोलाकार लिहिला. दोन्ही वर्तुळे प्रथम बाथरूमच्या बाजुने उघडी केली आत येण्यासाठी अरुंद रस्ताच जणू. तसाच रस्ता विरुद्ध बाजूला बाहेर पडण्यासाठी दरवाज्याच्या दिशेने बनवला. किशोर आणि सारिका ते काय करत आहेत हे कुतुहलाने पाहात होते. काम पुर्ण झाल्यावर त्यांनी सारिकाला गळ्यातील लॉकेट काढून त्या वर्तुळात झोपायला सांगितले, तसे किशोरने त्याला विरोध केला पण मालवणकरांनी त्याला सर्व काही ठीक होईल असा दिलासा दिला. त्याने सारिकाच्या गळ्यातील लॉकेट काढुन घेतले व तिला वर्तुळात झोपवले. सारिका प्रचंड घाबरली होती पण किशोर खातर ती तयार झाली.

सारिका वर्तुळात झोपताच रमेश मालवणकरांनी पिशाच्च आवाहन सुरु केले, थोड्याच वेळात रुम मधील वातावरण जड आणि थंड जाणवू लागले. बाथरूम जवळ एक काळी आकृती मनुष्य रूपात आकार घेऊ लागली. तिचे डोळे, नाक, कान, चेहरा, हात, पाय, शरीर हळूहळू स्पष्ट दिसु लागले. त्या आकृतीला एका स्त्रीचा आकार प्राप्त झाला. ती एकटक वर्तुळात बसलेल्या सारिकालाच पाहात होती. तिच्या चेहऱ्यावर एक खुनशी हास्य विलसत होते. तिचे हात तिच्या सावजाच्या नरडीचा घोट घ्यायला आतुर झाले होते. हळूहळू तरंगत ती सारिकाच्या दिशेने पुढे सरकु लागली. तिला आपल्या कडे येताना पाहून सारिका गलीतगात्र झाली, पण किशोर आणि रमेश मालवणकरांवर विश्वास टाकून ती तशीच पडून राहिली. ती आकृती वर्तुळात शिरताच रमेश मालवणकरांनी शिताफीने एका मुठीत भस्म आणि दुसऱ्या मुठीत मीठ घेऊन बाथरूमच्या दिशेची दोन्ही वर्तुळे बंद केली आणि ओरडले, “सायबानु हीच वेळ असा!” त्याबरोबर मालवणकरांचा आवाज ऐकून ती स्त्री सदृश्य आकृती त्यांच्या दिशेने वळली. तो क्षण साधुन सारिका दोन्ही वर्तुळातुन बाहेर पडली आणि किशोरने दरवाजाच्या दिशेची दोन्ही वर्तुळे बंद केली. ती लावसट त्या वर्तुळात अडकलेली पाहून रमेश मालवणकरांसह किशोर आणि सारिकाच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. आपण अडकल्याची जाणीव झाल्यावर ती लावसट आपल्या भयानक मुर्त रूपात त्यांच्या अंगावर धाऊन जाऊ लागली पण तिने वर्तुळाच्या बाहेर पडायचा प्रयत्न करताच वेदनेने आर्त किंचाळली. तिचा पाय जबरदस्त भाजला होता. रागातच ती त्वेषाने बोलली, “मालवणकरां तुका काय वाटला? तु माका बांधून ठेऊ शकतय! माका माझा बाळ व्हया असा, मी ह्या बायलेक (स्त्रीला) तर मारतलयंच पण तुका पण सोडूचं नाय. माका मुक्त कर, नायतर तुझ्या पुऱ्या घरादाराचो निर्वंश केल्या बिगर मी शांत बसूची नाय.” तिचा तो आवेश ऊरात धडकी भरवत होता.

[next] रमेश मालवणकरांसह किशोर आणि सारिका रुमच्या बाहेर आले तसे मालवणकर म्हणाले, “त्या लावसटीचो जिव तिच्या पोरीत अडकलो हा, जोपर्यंत तिच्या पोरीचा क्रिया कर्म होना नाय ती असोच त्रास देत ऱ्हवतली. आत्ताच्या आत्ता तिच्या पोरीचा कलेवर (मृत शरीर) शोधून त्याका मूठमाती देऊक व्हयी. एकदा का ह्या केला की तिच्या पोरीक मुक्ती मिळतली मग तिका ह्या जगात ऱ्हाऊक कारणच उराचा नाय. तिची इच्छा असो वा नसो तिका मुक्त होऊचाच लागतला.” मालवणकरांचे म्हणणे जरी योग्य होते तरी सारिकाने ते मृत अर्भक पाहून आता १२ तासांच्या वर झाले होते. एवढ्या मोठ्या काळात ते अर्भक तिथेच असण्याची शक्यता जवळ जवळ शुन्य होती. एव्हाना त्याची माहिती पोलिसांना होऊन ते अर्भक पोस्ट मॉर्टेम साठी गेले असण्याचीच शक्यता जास्त होती. पण दुसरा पर्याय नसल्याने ते करणे भाग होते. रमेश मालवणकरांनी अक्षयला त्याच्या मावस भावाची ओम्नी व्हॅन मागून आणण्यास सांगितले. गाडी येताच अक्षयला रूमवर लक्ष्य ठेवायला सांगुन, रुम मध्ये कोणालाही सोडू नको असे रमेश मालवणकरांनी अक्षयला बजावले. गाडी सुरु करून रमेश मालवणकर, किशोर आणि सारिकासह मालवणला जायला निघाले. अक्षयने किशोर आणि सारिका उतरलेल्या रूमला कुलुप लावले आणि घरात ती रूम कोणीही उघडू नका असे बजावून रात्रीच्या जेवणासाठी समुद्रावर मासे आणायला गेला.

साधारण तासाभरात रमेश मालवणकर किशोर आणि सारिकासह मालवण बस स्थानकावर पोहोचले. स्थानकावर पोलिसांना पाहून मालवणकरांनी गाडी थोडी दूर लावली. उगाच किशोर आणि सारिकाला कोणी ओळखू नये अशी धास्ती त्यांना वाटली. मालवणकरांना बहुतांश लोक ओळखत होते त्यामुळे त्यांना आलेले पाहताच तिथलाच एक रिक्षावाला त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला, ''मालवणकरानु एवढ्या उशिरा मालवणात इलास ते! काय विशेष? “काय नाय रे पावण्यांका मालवणी खाजे घेऊचे होते म्हणान इलय. पोलिस इलेले दिसतत स्थानकावर! काय झाला काय?” असे मालवणकरांनी विचारताच तो रिक्षावाला सांगू लागला, ''तुमका म्हाईत नाय वाटता? पोलिसांका लेडीज टॉयलेट मध्ये एका लहान बाळाची बॉडी मिळाली हा. त्याका थयसर कोणी टाकल्यान ता माहिती नाय पण कोणीतरी बाईलच असतली असो अंदाज हा. पोलिस चौकशी करतत.” “वाईट झाला! नाय रे? मेल्यांका संभाळुक जमना नाय तर जन्माक घालततच कित्याक ताच माका समजना नाय! असा टॉयलेट मध्ये पोटच्या गोळ्याक टाकूक लोकांचो जीव तरी कसो होता देव जाणे. पोरगो होतो की पोरगी काय कळला काय रे?” मालवणकरांनी हळहळत विचारले? “पोरग्याक कोण टाकतलो? पोरगीच असतली! माका काय वाटता, कोणाक तरी पोरगो व्हयो असतलो आणि पोरगी झाली म्हणान टाकल्यानी असतला. कोणाची पोर होती, ता काय कळूक नाय पण पोस्ट मॉर्टेमसाठी बॉडीक सरकारी हॉस्पिटलात नेल्यानी असा. उद्या पेपरात येतलाच” तो रिक्षावाला म्हणाला". “असा काय? बर चल माका जाऊचा हा, गडबडीत असय, पुन्हा भेटू” असे म्हणून मालवणकरांनी गाडी पुढे घेतली. थोडे पुढे गेल्यावर ते किशोरला म्हणाले, “माझो अंदाज खरो ठरलो. डेड बॉडीक पोस्ट मॉर्टेमसाठी घेऊन गेले असत. आता आपल्याक हॉस्पिटलात जाऊचा लागतला. काय तरी आयडिया करून त्या पोरीची बॉडी मिळवूक व्हयी. ती वर्तुळा त्या लावसटीक किती वेळ बंदिस्त करून ठेवतली ता देवाकच ठाऊक. आपल्याक घाई करुक व्हयी.” एवढे बोलून त्यांनी आपली गाडी सरकारी हॉस्पिटलकडे दामटली.

[next] अक्षय घरातील सगळ्यांना रूम न उघडण्याची तंबी देऊन गेला खरा पण नेमकी त्याची मोठी बहिण अंकिता नवऱ्याबरोबर मुलाला घेऊन घरी आली. चहा करण्यासाठी अक्षयची आई किचन मध्ये गेली आणि तिच्या पाठोपाठ अंकिता पण गप्पा मारण्यासाठी किचन मध्ये गेली. अंकिताचा नवरा रवि हॉल मध्ये पेपर वाचत बसला होता. त्यांचा मुलगा कुणाल किरकिर करू लागला म्हणून तो त्याला बाहेर घेऊन गेला. थोडा वेळ खेळल्यावर कुणालला जोराची लाघवी लागली. घराच्या पाठीमागे दूरवर असलेल्या संडासात त्याला नेण्याऐवजी घरात हॉल मध्ये टांगलेली चावी घेऊन भाड्याने दिलेल्या रूम मधील संडासात नेणे रविला जास्त सोयीस्कर वाटले. दुर्दैवाने त्याने किशोर आणि सारिका उतरलेल्या रूमची चावी घेतली आणि दरवाजा उघडला. रवीने लाईट लावण्याआधीच कुणाल वेगात बाथरुमकडे धावला. तितक्यात मासे घेऊन आलेल्या अक्षयने नाही! थांब! म्हणत धावत येऊन त्याला अडवायचा अयशस्वी प्रयत्न केला पण वेळ झाला होता. नकळत कुणालच्या पावलांनी मीठ आणि भस्मापासून बनवलेले ती वर्तुळे उधळली गेली होती. शेवटी व्हायचे तेच झाले. अक्षय आणि रविला जोराचा धक्का देऊन ती लावसट गडगडाटी हास्य करत दरवाजातून बाहेर निघुन गेली.

रमेश मालवणकर किशोर आणि सारिकासह सरकारी हॉस्पिटल पाशी आले. ७:३० वाजुन गेल्यामुळे काळोख झाला होता पण हॉस्पिटल मध्ये बऱ्यापैकी गर्दी होती. रुग्णांना भेटायची वेळ संपायला अजून अवकाश होता. त्यामुळे थोडी सामसूम व्हायची वाट पहावी असे रमेश मालवणकरांनी किशोरला सुचवले. साधारण तासभर गेल्यावर, गाडीत नुसते बसून राहण्यापेक्षा काहीतरी खाऊन घ्यावे असा विचार करून ते तिघे एका हॉटेलपाशी आले. त्यांचे जेवण उरकेपर्यंत रात्रीचे ९ वाजले होते. गाडी पार्क करून ते तिघेही शवागाराच्या दिशेने चालु लागले. रात्री ९:३० वाजता नाईट शिफ्टचा शवागाराचा वॉचमन कम वॉर्डबॉय जनार्दन परब दोन क्वार्टर लाऊन ड्युटीवर हजर झाला होता. आपले लक्ष नसल्यासारखे दाखवत रमेश मालवणकर शवागाराच्या बंद दरवाज्याच्या बाहेर स्टूलवर बसलेल्या जनार्दन परबाच्या जवळून गेले. दोन क्वार्टर लावलेल्या असूनही जनार्दनने त्यांना ओळखले आणि हाक मारली, ''ओ मालवणकरानू! चल्लाव खय? कोणाक शोधताव?” मालवणकरांनी पण आश्चर्य झाल्यासारखे दाखवत, “एका ओळखीच्याक बघुक इलय होतंय, पण बाहेर पडत असताना खय तरी चुकीचो वळलय आणि हयसर येउन पोचलय. पण झाला ता बरा झाला, त्यामुळे तुझी भेट झाली? खय असय खय? आज काल दिसनय नाय” म्हणत जनार्दनला बोलण्यात गुंतवले. शवागाराच्या दरवाज्याकडे त्याची पाठ झाल्याचे पाहताच किशोर आणि सारिका हळूच चोरपावलांनी त्या शवागाराच्या दरवाज्यातून आत प्रवेश केला. कसली तरी चाहूल लागली म्हणुन जनार्दनने वळून पहिले पण तोपर्यंत सुदैवाने दरवाजा बंद झाला होता. मालवणकरांनी पुन्हा त्याला बोलण्यात गुंतवले. आधीच दोन क्वार्टर झालेल्या असल्यामुळे जनार्दनलाही बडबड करायला कोणीतरी हवेच होते त्यामुळे त्यानेही फारसे लक्ष दिले नाही. तसेही शवागाराकडे कोणी फिरकत नसे त्यामुळे तो निवांत होता.

[next] शवागारात शिरताच तिथल्या थंड वातावरणाने दोघांच्याही अंगावर काटा आला. सारिका प्रमाणेच किशोरलाही भिती वाटत होती पण ठरवलेले काम करणे भाग होते. आतमध्ये त्या अर्भकाला शोधायचे कुठे हा प्रश्न दोघांना पडला पण तितक्यात मोबाइलच्या टोर्चच्या प्रकाशात त्याला टेबलावर ठेवलेले एक पॅड दिसले त्यावर एका वहीत एका पानाच्या सुरवातीला त्या दिवसाच्या तारखेला एका स्त्री जातीच्या अर्भकाची नोंद केलेली त्याला दिसली व त्यापुढे ज्या शवपेटीत त्या स्त्री अर्भकाचा मृतदेह ठेवला होता त्या पेटीचा क्रमांकही त्याला दिसला. देवाचे आभार मानत त्या दोघांनी भीत भीतच ती पेटी शोधली. पेटी उघडताच आतील बल्ब पेटला आणि आत ठेवलेले ते स्त्री अर्भकाचे कलेवर पाहून दोघांचेही डोळे पाणावले पण भावनेला आवर घालून किशोरने सारिकाला सावरले. का कोणास ठाऊक पण त्या अर्भकाच्या डेड बॉडीला उचलताना त्याचे डोळे हलल्यासारखे किशोरला वाटले. आपण शवागारात आहोत याची जाणीव झाल्याने त्या थंड वातावरणातही त्याला घाम फुटला. आपल्याला भास झाला असेल असा विचार करून त्या बद्दल त्याने सारिकाला काही न बोलता जवळच पडलेल्या एका फडक्यात त्या अर्भकाला गुंडाळून सोबत आणलेल्या पिशवीत ठेवले. दरवाजातून बाहेर पडण्याआधी त्यांनी दरवाजा थोडासा किलकिला करून बाहेरचा अंदाज घेतला अजूनही जनार्दनची दरवाज्याकडे पाठच होती. ती संधी साधून त्याने सारिकाला पिशवी घेऊन हळूच बाहेर पडायला सांगितले. तिने एकटीने जायला विरोध केला तेव्हा किशोरने तिला समजावले की त्याला त्या वहीतील त्या अर्भकाची नोंद केलेले पान फाडून आणायचे आहे जेणेकरून कोणताही पुरावा मागे राहणार नाही. त्यामुळे तिने पुढे जावे आणि तो मागून येईल आणि काही गडबड झालीच तर तिने सरळ जाऊन गाडीत बसावे तो काही तरी शक्कल लढवून तिला येउन भेटेल. सारिकाला त्याचे म्हणणे पटले व तिने बाहेरचा कानोसा घेत हळूच दरवाजा उघडला तसे रमेश मालवणकरांनी बोलण्या बोलण्यात जनार्दनला तिथून थोडेसे दूर नेले. ती संधी साधून सारिका त्या अर्भकाला घेऊन तिथून पसार झाली.

इकडे आवाज होणार नाही याची काळजी घेऊनही किशोरने वहीतील तो कागद फाडला आणि त्याचा आवाज त्या शवागाराच्या शांततेत चांगलाच घुमला. आपल्या घाईबद्दल किशोरने स्वत:लाच एक शिवी हासडली आणि पुढे काय होते याचा तो कानोसा घेऊ लागला. दुर्दैवाने तो आवाज दरवाजाला टेकून बसलेल्या जनार्दनच्या कानात शिरला आणि तो एकदम दचकलाच. शवागारातून आवाज कसा काय आला या विचाराने त्याच्या पाठीतून भितीची थंड शिरशिरी गेली. त्याने खात्री करण्यासाठी मालवणकरांना विचारले की त्यांनी कोणता आवाज ऐकला काय म्हणुन, पण मालवणकरांनी त्याची शंका, “तुका भास झालो असतलो”, असे म्हणत धुडकावून लावली. जनार्दनने तो आवाज अगदी स्पष्टपणे ऐकला होता पण त्याला आत एकट्याने जाऊन खात्री करायची भिती वाटत होती म्हणुन त्याने मालवणकरांना सोबत यायची विनंती केली. मालवणकरांनी त्याचे मन वळवायचा खूप प्रयत्न केला पण तो अडून बसला. शेवटी धाडस करून भीत भीत त्याने दरवाजा ढकलला व डोळे बारीक करून आत मधल्या काळोखात पाहण्याचा प्रयत्न करू लागला पण काही दिसेना म्हणुन आत मध्ये जाऊन आतील लाईट सुरु करण्यासाठी तो हळू हळू पुढे सरकू लागला. तो दरवाज्यातून आत शिरला तोच दरवाज्याच्या आड लपलेल्या किशोरने त्याच्या मागून आपल्या दोन्ही हातानी त्याची मान धरली आणि जनार्दन इतका प्रचंड घाबरला की त्याच्या तोंडातून आवाजच फुटला नाही आणि तो धाडकन बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला. ते पाहताच आपल्या हुशारीवर खुश होत किशोर बाहेर आला तसा मालवणकरांनी त्याला पटकन गाडीकडे जाण्यास सांगितले.

[next] किशोर पुरेसा दूर जाताच मालवणकरांनी आरडा ओरडा केला तो ऐकून बाजूच्या वॉर्ड मधील वॉर्डबॉय, नर्स व काही पेशंट वगैरे धावत आले. मालवणकरांनी मग झाला प्रकार त्यांना मीठ मसाला लावून सांगितला, सगळ्यांनाच शवागारात जायची भिती वाटत होती पण काही जणांनी धाडस करून जनार्दनला उचलून बाहेर आणले आणि हॉस्पिटलमधील एका कॉटवर झोपवले. तोंडावर पाणी मारल्यावर जनार्दन शुद्धीवर आला, त्याला प्रचंड धक्का बसला होता त्यामुळे तो असंबद्ध बरळू लागला. तो दारू प्यायलेला आहे हे त्याच्या तोंडाला येणाऱ्या वासावरून लक्षात आल्यावर, त्याच्या बडबडीला काही अर्थ नाही असे म्हणुन सर्वजण तिथून पांगु लागले आणि त्या गोंधळाचा फायदा घेऊन मालवणकरपण तिथून निसटले. मालवणकर गाडीपाशी आले तेव्हा किशोर आणि सारिका त्यांचीच वाट पाहत बसले होते. मालवणकरांना पाहताच त्यांच्या जीवात जीव आला. ते तातडीने तिथून निघाले. या सगळ्या गडबडीत रात्रीचे साडेदहा वाजले होते. ट्रफिक खूप कमी असल्यामुळे सफाईदार वळणे घेत गाडी वेगाने देवबागच्या दिशेने जाऊ लागली.

किशोर आणि सारिका मागच्या सीटवर बसले होते. साधारण अकरा वाजले होते, अर्ध्या रस्त्यावर आल्यावर गाडीने गचके खायला सुरवात केली, शेवटी एक मोठा गचका खाऊन गाडी बंद पडली. हातातील वेळ निघून जात चालला असल्यामुळे सर्वच चिंतेत होते त्यात हे नवीन संकट समोर उभे ठाकले होते. मालवणकर आपले सारे कौशल्य पणाला लाऊन गाडी ठीक करण्याचा प्रयत्न करत होते. आणि कुठून इकडे यायची दुर्बुद्धी झाली या विचारात किशोर आणि सारिका दोघेही आपल्या नशिबाला दोष देत होते. फुलासारखी नाजूक आणि सुंदर सारिका एकदम मलूल झाली होती. पुण्यासारख्या मॉडर्न शहरात राहणाऱ्या त्या दोघांना हा सगळा प्रकार न पचणारा होता. गंमत म्हणुन हॉरर स्टोरीज वाचणे आणि सिरिअल्स पाहणे वेगळे आणि आपण स्वतः या सगळ्या प्रकाराचा भाग होणे वेगळे. एवढ्या तणावातही, आपल्याशी कोणतीही ओळख-पाळख नसताना आपल्या मदतीसाठी धावून आलेल्या मालवणकरांचे त्यांना खूप अप्रूप वाटले. सारिकाला धीर देऊन किशोर मालवणकरांच्या मदतीसाठी गेला. मोठ्या प्रयत्नांनी शेवटी एकदा गाडी सुरु झाली. आणि देवाचे आभार मानत ते तिघेही पुन्हा देवबागच्या दिशेने निघाले. किशोरने घड्याळात पहिले तेव्हा रात्रीचे साडे बारा वाजले होते.

अर्ध्या तासात ते घराजवळ पोहोचले आणि जशी गाडी मालवणकरांच्या घरापाशी आली तशी अचानक सारिकाच्या किंकाळण्याने मालवणकर आणि किशोर दोघेही दचकले. करकचून ब्रेक लावल्यामुळे गाडी स्लिप झाली पण मालवणकरांनी मोठ्या शिताफीने तिच्यावर ताबा मिळवला. सारिकाच्या मांडीवर ठेवलेल्या पिशवीमध्ये हालचाल होऊ लागली होती. प्रचंड घाबरलेल्या सारिकाने मांडीवरील पिशवी जवळ जवळ फेकुनच दिली आणि गाडीचा दरवाजा उघडून ती समुद्राच्या दिशेने धाऊ लागली. रमेश मालवणकर दबक्या आवाजात ओरडले, किशोर! तुमच्या बायलेक पकडा! तिका जर का लावसटीने धरल्यान तर तुमची बाईल वाचुची नाय! सारिका समुद्राच्या दिशेने धावलेली पाहताच रागाने धुसफुसणारी ती लावसट तिच्या मागे गेली. ती लावसट आपल्या मूर्त रुपात आली होती. किशोर सारिकाच्या जवळ पोहोचायच्या आत तिने सारिकाला गाठले आणि क्षणात गायब झाली. धावणारी सारिका अचानक हवेत उचलली गेली आणि तरंगत समुद्राच्या दिशेने पुढे सरकू लागली. ते पाहून किशोर चक्रावलाच. त्याने धावायचा स्पीड वाढवला, पण वाळूत फार वेगात धावणे त्याला शक्य होत नव्हते. सारिका समुद्रापर्यंत पोहोचली होती आणि आता ती समुद्रात जाऊ लागली. छातीपर्यंत पाणी आल्यावर तिने पाण्यात बुडी मारली पाठोपाठ किशोरने देखील पाण्यात बुडी मारली. सारिका पाण्यात गटांगळ्या खाऊ लागली. ती लावसट तिला पाण्यात बुडवू लागली. तितक्यात किशोरने सारिकाला गाठले आणि तिला धरून पाण्याबाहेर ओढू लागला पण त्या लावसटीच्या ताकदी पुढे त्याची ताकद तोकडी पडत होती. आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा किशोरने सारिकाला स्पर्श केला होता तेव्हा तेव्हा लावसटीने सारिकाला सोडले होते पण आता मात्र ती तिला सोडत नव्हती. किशोरचा हात त्याच्या गळ्याकडे गेला आणि त्याला धक्काच बसला त्याचे लॉकेट त्याच्या गळ्यात नव्हते. त्याला आठवले की रुममध्ये सारिकाला मिठाच्या आणि भस्माच्या वर्तुळात झोपवताना मालवणकरांनी त्याला ते सारिकाच्या गळ्यातून काढायला सांगितले होते, पण पुढच्या गडबडीत तो ते आपल्या गळ्यात घालायला विसरला होता आणि ते तिथेच बेडवर राहिले होते.

आपल्या गळ्यात लॉकेट नाही हे लक्षात येताच किशोर पुरता घाबरला कारण आता त्या लावसटीच्या ताकदी पुढे त्याचे काहीच चालणार नाही हे लक्षात यायला त्याला वेळ लागला नाही. तरीही हिम्मत न हारता तो सारिकाला किनाऱ्याकडे ओढण्याची शर्थ करू लागला. तिकडे किशोर सारिकाला वाचवण्यासाठी त्या लावसटीसोबत लढत होता आणि त्याचं वेळी रमेश मालवणकर आजूबाजूचा अंदाज घेत होते. सगळीकडे सामसूम झाली होती. रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांव्यतिरिक्त चिटपाखरुही नव्हते हे एका अर्थी बरे झाले होते. उगाच गवगवा झालेला त्यांना नको होता. त्यांनी पटकन ते अर्भक असलेली पिशवी आणि आपली सामग्री असलेली पिशवी गाडीतून काढली आणि त्या दोन्ही पिशव्या घेऊन ते त्यांच्या घरापासून जवळच असलेल्या दफनभुमीकडे धावले. फटका जवळ खुर्ची टाकून बसलेला चौकीदार बसल्या बसल्याच घोरत होता. दफनभुमीतील शांत वातावरणात त्या चौकीदाराच्या घोरण्याचा आवाज खूप मोठा वाटत होता. अजिबात आवाज न करता त्याच्या बाजुने ते हळूच फटकामधुन आत शिरले. आयत्या वेळी गडबड नको म्हणून तिथे कबर खोदण्याचे काम करणाऱ्या गड्याने काही खड्डे खणून ठेवले होते त्यातल्या एका अर्धवट खणलेल्या खड्याकडे त्यांचे लक्ष गेले. तो खड्डा त्या अर्भकाला पुरण्यासाठी पुरेसा होता त्यामुळे त्यांनी पिशवीतून आणलेले ते अर्भक त्याच्या कपड्यासकट त्या खड्ड्यात ठेवले त्या अर्भकाच्या आत्म्याच्या मुक्तीसाठी काही मंत्र म्हणत ते त्याच्यावर माती टाकू लागले. मालवणकरांनी मंत्र म्हणण्यास सुरवात करताच त्या लावसटीने सारिकाचे शरीर सोडले आणि भयाकारी चित्कार करत ती दफनभुमीच्या दिशेने जाऊ लागली.

[next] नाकातोंडात पाणी गेल्याने घुसमटलेल्या सारिकाला घेऊन किशोर किनाऱ्यावर आला. वाळुत सारिकाला झोपवुन किशोर तिच्या पोटावर दाब देऊ लागला, सारिकाच्या पोटात गेलेले वाळुमिश्रित पाणी बाहेर पडू लागले पण सारिका श्वास घेत नाही हे लक्षात आल्यावर किशोर मनातुन हादरला, पण लगेच स्वत:ला सावरत त्याने सारिकाच्या हृदयावर हात ठेऊन तिची छाती पंप करायला सुरवात केली. मध्येच तो तिच्या तोंडात आपल्या तोंडाने हवा पण सोडत होता. पाच एक मिनिटे ही क्रिया केल्यावर सारिकाने दीर्घ श्वास घेतला आणि खोकू लागली तसा किशोरच्या जीवात जीव आला. योग्य वेळी CPR देऊन सारिकाला मृत्युच्या दाढेतून त्याने एकाच दिवसात दोन वेळा ओढून आणले होते. तिला घट्ट मिठी मारून तो लहान मुलासारखा रडू लागला. नाका-तोंडात समुद्राचे खारट पाणी गेल्याने सारिकाची चांगलीच घुसमट झाली होती. मोठ्या प्रयत्नाने तिने आपल्या श्वासावर ताबा मिळवला. आपण किशोरच्या मिठीत सुरक्षित असल्याचे लक्षात येताच तिची भीती थोडी कमी झाली.

इकडे दफन भूमीच्या दरवाज्यापर्यंत पोहोचलेल्या त्या भयंकर लावसटीने खुर्चीवर घोरत असलेल्या त्या रखवालदाराला एक जोराचा तडाखा दिला, त्याने तो दूरवर फेकला गेला आणि खाली पडताच बेशुद्ध झाला. रागाने फणकारत ती लावसट दफनभूमीच्या फाटकातून आत शिरली. आत मध्ये रमेश मालवणकर तिच्या मुलीच्या आत्म्याच्या मुक्तीसाठी प्रार्थना करत होते. तिच्या मृत मुलीला जिवंत करण्याचा तिचा मनसुबा धुळीला मिळत असलेले पाहून ती पिसाळलीच. रागाने ती रमेश मालवणकरांच्या दिशेने निघाली पण मालवणकरांनी पिशाच्चरक्षा मंत्राने स्वतःला सुरक्षित केले असल्यामुळे ती काही करू शकली नाही. पण त्यामुळे ती आणखीनच पिसाळली. रमेश मालवणकरांनी तिच्या मुलीचा मुक्तीविधी पूर्ण केल्यावर खड्डयामध्ये माती टाकून तो बुजवला व नमस्कार केला. त्याच बरोबर त्या थडग्यावर एक दिव्य प्रकाश अवतरीत झाला आणि त्या मृत मुलीचा आत्मा त्या प्रकाशात विलीन झाला. ते पाहताच आत्ता पर्यंत रागाने धुमसणारी ती लावसट केविलवाणे होऊन चक्क रडू लागली ते पाहून मालवणकरांचेही डोळे पाणावले. ते तिला म्हणाले, "काळजी करा नको. तुझा चेडू (मुलगी) मुक्त झाला असा. आता तिचो पुनर्जन्म होतलो. तू तिका तुझ्या स्वार्थासाठी अडकवून ठेवणा बरा नाय. मी तुझ्या मुक्तीसाठी पण प्रयत्न करतंय म्हणजे तुझो पण पुनर्जन्म होतलो आणि तुका या जन्मात न मिळालेला मातृसुख पुढच्या जन्मात मिळतला. पण तू तुझ्या चेडवाक (मुलीला) शौचालयात टाकलंय कित्या?" असे मालवणकरांनी विचारताच तिचे रडणे एकदम थांबले आणि चेहऱ्यावर तेच खुनशी भाव प्रकट झाले.

[next] मी माझ्या चेडवाक मारुक नाय आणि शौचालयात पण टाकूक नाय, खैची (कोणती) आऊस (आई) असा करतली? माझ्या नवऱ्याक झील (मुलगा) व्हयो होतो. सोनोग्राफीत माझ्या पोटात पोरगी हा ह्या कळला. गर्भाची वाढ पूर्ण झाल्यामुळे, गर्भ पाडल्यास माझ्या जिवाक धोको होतो. पण डॉक्टराक पैशे दाबून माझ्या नवऱ्याने आणि त्याच्या घरच्यांनी माझ्या पोरीक पाडल्यानी. त्याच वेळी ऑपरेशन मध्ये काहीतरी गडबड झाली आणि माझो पण जीव गेलो. स्वतःचा नाव खराब होतला म्हणान डॉक्टरान माझ्या नवऱ्याक, माझ्या आणि माझ्या पोरीपासून सुटका करून घेऊक पैशे परत करून आमची प्रेता घेऊन जाउक सांगल्यान. मी पोटुशी व्हतय ह्या माझ्या माहेरच्यांका माहित व्हता पण त्यांका माका भेटुक देऊक नाय. त्यांका कायतरी सांगुक व्हया होता म्हणान, माझा भायेर लफडा होता, मी माझ्या चेडवाक घेऊन कोणासोबत तरी पळून गेलय असा माझ्या माहेरच्यांका खोटाच सांगीतल्यानी. परिस्थितीने गरीब असलेल्या माझ्या माहेरच्यांनी पोलिसात दाद मागीतल्यानी पण त्यांका पोलिसांनी भिक घालूक नाय. माझ्या नवऱ्यान माझ्या सासवेक (सासूला) माझ्या पोरीला खय तरी टाकूक देऊक सांगल्यान. घराक जाताना तिनेच माझ्या पोरीक शौचालयात दडवल्यान त्यामुळे ती कोणाक दिसुक नाय. ह्या रखवालदाराक पैशे दाबून रातोरात माका थयसर गाडल्यानी, असे म्हणत तिने एका थडग्याकडे बोट दाखवले. माझा शरीर मेला पण माझो आत्मो सूडासाठी बेचैन होतो. माझ्या सासरचे घरी परतत असताना मी माझ्या नवऱ्याच्या गाडीचो ऍक्सिडंट करवलय त्यात त्याच्या घरातले सगळे मेले पण माका चैन पडुक नाय. माका माझी लेक व्हयी होती.

शौचालयात कुत्र्यांका वास लागलो आणि त्यांनी माझ्या पोरीक ठेवलेली पिशवी भायेर काढल्यानी. जेव्हा सारिका ईली, तिका ती पिशवी दिसली आणि जेव्हा तिका माझो आवाज ऐकूक गेलो मी तेव्हाच समजलंय की हिचो उपयोग करून मी माझ्या अतृप्त इच्छा पुऱ्या करू शकतंय. सारिकाच्या पोटात तिच्या नवऱ्याचो अंश वाढता. मी तिका मारून तिच्या शरीराचो ताबा घेणार व्हतय आणि नंतर तिच्या गर्भातल्या पोरीक मारून माझ्या पोरीचो आत्मो तिच्यात घालणार व्हतय आणि यासाठी माका तुझ्यासारख्याच एका माणसाची गरज होती पण तू माझ्या सगळ्या इच्छांवर पाणी फिरवलस. आता मी तुका आणि त्या दोघांका पण जीत्तो सोडूचय नाय." असे म्हणत तिने रमेश मालवणकरांवर हल्ला चढवला. मालवणकर बेसावध होते त्यामुळे ते तिच्या थडग्यावर पडले पण त्यांनी स्वतःला सावरले आणि पिशाच्चमुक्ती मंत्र म्हणू लागले. ते पाहून फाटका आडून सर्व काही ऐकणाऱ्या किशोर आणि सारिकावर तिने हल्ला चढवला. ती सारिकाचा गळा आवळु लागली. किशोर तिला सारिका पासून दूर करण्याचा प्रयत्न करत होता पण ते त्याच्या शक्तीच्या बाहेरचे होते. गळ्यावरील पकडीमुळे सारिका डोळे फिरवू लागली ते पाहून किशोर आशेने मालवणकरांकडे पाहू लागला. ते मंत्र म्हणण्यात व्यग्र होते.

[next] आता आपल्यालाच काहीतरी करावे लागेल हे लक्षात येताच किशोर त्या लावसटीकडे पाहून म्हणाला, "तू स्वतःच्या स्वार्थासाठी माझ्या सारिकाचा जीव नाही घेऊ शकत. तुझी कहाणी ऐकून तुझ्या बद्दल करुणा वाटली पण आता तुझ्या कृतीने तू सिद्ध केलेस की तुझ्या सासरच्यात आणि तुझ्यात काहीच फरक नाही. तुझ्या सासरच्यांनी तुझ्या मुलीला तुझ्या पासून दूर केले आणि आता तू पण तेच करत आहेस. तू ही एक स्त्री आहेस, तू दुसऱ्या स्त्रीची आणि तिच्या बाळाची हत्या करण्याचा विचारच कसा करू शकतेस?" किशोरचे शब्द कानावर पडताच, सारिकाच्या गळ्यावरील त्या लावसटीची पकड ढिली झाली. शेवटी तीही एक आई होती. तिने सारिकाला सोडून दिले आणि किशोर कडे पाहत म्हणाली, "बरोबर हा तुझा, सुडाने माका आंधळा केला होतान. माझी चेडू (मुलगी) मुक्त झाली, आता माकापण मुक्त होऊक लागतला. म्हणजे मी पुन्हा जन्म घेतलंय आणि आई होतलय. माका माफ करा. तुम्ही दोघ खुश ऱ्हावा. मी आता तुमका त्रास देवाचं नाय." असे म्हणून ती लावसट रमेश मालवणकरांकडे वळून म्हणाली, "मालवणकरानु माका मुक्त करा. माका माझ्या चेडवाक भेटूचा हा. मालवणकरांचे अनुष्ठान पूर्ण होत आलेच होते. त्यांनी शेवटचा मंत्र म्हणताच ती लावसट आपल्या मुलीच्या आत्म्याप्रमाणेच अनंतात विलीन झाली. इकडे किशोर आणि सारिकाने सुटकेचा निश्वास सोडला आणि मालवण करांचे आभार मनात दोघे आपल्या नॉनएसी रूमकडे चालू लागले.




केदार कुबडे | Kedar Kubade
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कथा, मराठी भयकथा, मराठी कविता या आणि अशा विविध विभागांत लेखन.

अभिप्राय

नाव

अ रा कुलकर्णी,1,अ ल खाडे,2,अ ज्ञा पुराणिक,1,अंकित भास्कर,1,अंजली भाबट-जाधव,1,अंधश्रद्धेच्या कविता,5,अकोला,1,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनंत दळवी,1,अनंत फंदी,1,अनंत भावे,1,अनिकेत येमेकर,2,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनिल भारती,1,अनिल वल्टे,8,अनुभव कथन,19,अनुरथ गोरे,1,अनुराधा पाटील,1,अनुराधा फाटक,39,अनुवादित कविता,1,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,6,अभिजित गायकवाड,1,अभिजीत टिळक,2,अभिव्यक्ती,1385,अभिषेक कातकडे,5,अभिषेक घुगे,1,अमन मुंजेकर,7,अमरश्री वाघ,2,अमरावती,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमित सुतार,1,अमुक-धमुक,1,अमृत जोशी,1,अमृता शेठ,1,अमोल कोल्हे,1,अमोल तांबे,1,अमोल देशमुख,1,अमोल बारई,7,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अरविंद जामखेडकर,1,अरविंद थगनारे,5,अरुण कोलटकर,1,अरुण म्हात्रे,1,अर्चना कुळकर्णी,1,अर्चना डुबल,2,अर्जुन फड,3,अर्थनीति,3,अल्केश जाधव,1,अविनाश धर्माधिकारी,2,अशोक थोरात,1,अशोक रानडे,1,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अश्विनी तासगांवकर,2,अस्मिता मेश्राम-काणेकर,7,अहमदनगर,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,1131,आईच्या कविता,29,आईस्क्रीम,3,आकाश पवार,2,आकाश भुरसे,8,आज,7,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,18,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,15,आदर्श कामिरे,4,आदित्य कदम,1,आदेश ताजणे,8,आनंद दांदळे,8,आनंद प्रभु,1,आनंदाच्या कविता,26,आमट्या सार कढी,18,आर समीर,1,आरती गांगण,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,21,आशा गवाणकर,1,आशिष खरात-पाटील,1,आशिष चोले,1,इंदिरा गांधी,1,इंदिरा संत,6,इंद्रजित नाझरे,26,इंद्रजीत भालेराव,1,इतिहास,281,इलाही जमादार,1,इसापनीती कथा,48,उत्तम कोळगावकर,2,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,15,उमा पाटील,1,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,14,उमेश चौधरी,1,उस्मानाबाद,1,ऋग्वेदा विश्वासराव,5,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,18,ऋषिकेश शिरनाथ,2,ऋषीकेश कालोकार,2,ए श्री मोरवंचीकर,1,एच एन फडणीस,1,एप्रिल,30,एम व्ही नामजोशी,1,एहतेशाम देशमुख,2,ऐतिहासिक स्थळे,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ऑडिओ कविता,15,ऑडिओ बुक,1,ओंकार चिटणीस,1,ओम ढाके,8,ओमकार खापे,1,ओशो,1,औरंगाबाद,1,कपिल घोलप,12,करण विधाते,1,करमणूक,72,कर्क मुलांची नावे,1,कल्पना देसाई,1,कल्याण इनामदार,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,280,कवी अनिल,1,कवी ग्रेस,4,कवी बी,1,काजल पवार,1,कार्यक्रम,12,कार्ल खंडाळावाला,1,कालिंदी कवी,2,काशिराम खरडे,1,कि का चौधरी,1,किरण कामंत,1,किल्ले,97,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,किशोर पवार,1,कुठेतरी-काहीतरी,3,कुणाल खाडे,3,कुणाल लोंढे,1,कुसुमाग्रज,9,कृष्णकेशव,1,कृष्णाच्या आरत्या,5,के के दाते,1,के तुषार,8,के नारखेडे,2,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशव मेश्राम,1,केशवकुमार,2,केशवसुत,5,कोल्हापूर,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,2,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,ग दि माडगूळकर,6,ग ल ठोकळ,3,ग ह पाटील,4,गंगाधर गाडगीळ,1,गझलसंग्रह,1,गडचिरोली,1,गणपतीच्या आरत्या,5,गणपतीच्या गोष्टी,24,गणेश कुडे,2,गणेश तरतरे,20,गणेश निदानकर,1,गणेश पाटील,1,गणेश भुसारी,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गायत्री सोनजे,5,गावाकडच्या कविता,14,गुरुदत्त पोतदार,2,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गो कृ कान्हेरे,1,गो गं लिमये,1,गोकुळ कुंभार,13,गोड पदार्थ,55,गोपीनाथ,2,गोविंद,1,गोविंदाग्रज,1,गौतम जगताप,1,गौरांग पुणतांबेकर,1,घरचा वैद्य,2,घाट,1,चंद्रकांत जगावकर,1,चंद्रपूर,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,चैत्राली इंगळे,2,जयश्री चुरी,1,जयश्री मोहिते,1,जवाहरलाल नेहरू,1,जळगाव,1,जाई नाईक,1,जानेवारी,31,जालना,1,जितेश दळवी,1,जिल्हे,31,जीवनशैली,431,जुलै,31,जून,30,ज्योती किरतकुडवे,1,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,ठाणे,2,डिसेंबर,31,डॉ मानसी राजाध्यक्ष,1,डॉ. दिलीप धैसास,1,तनवीर सिद्दिकी,1,तन्मय धसकट,1,तरुणाईच्या कविता,7,तिच्या कविता,63,तुकाराम गाथा,4,तुकाराम धांडे,1,तुतेश रिंगे,1,तेजश्री कांबळे-शिंदे,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ता हलसगीकर,2,दत्ताच्या आरत्या,5,दत्तात्रय भोसले,1,दत्तो तुळजापूरकर,1,दया पवार,1,दर्शन जोशी,2,दर्शन शेळके,1,दशरथ मांझी,1,दादासाहेब गवते,1,दामोदर कारे,1,दिनदर्शिका,366,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिपाली गणोरे,1,दिवाळी फराळ,26,दीपा दामले,1,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,76,दुर्गेश साठवणे,1,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,3,धनंजय सायरे,1,धनराज बाविस्कर,71,धनश्री घाणेकर,1,धार्मिक स्थळे,1,धुळे,1,धोंडोपंत मानवतकर,12,नमिता प्रशांत,1,नलिनी तळपदे,1,ना के बेहेरे,1,ना घ देशपांडे,4,ना धों महानोर,3,ना वा टिळक,1,नांदेड,1,नागपूर,1,नारायण शुक्ल,1,नारायण सुर्वे,2,नाशिक,1,नासीर संदे,1,निखिल पवार,3,नितीन चंद्रकांत देसाई,1,निमित्त,4,निराकाराच्या कविता,15,निवडक,8,निसर्ग कविता,37,निसर्ग चाटे,2,निळू फुले,1,नृसिंहाच्या आरत्या,1,नोव्हेंबर,30,न्याहारी,50,पथ्यकर पदार्थ,2,पद्मा गोळे,4,परभणी,1,पराग काळुखे,1,पर्यटन स्थळे,1,पल्लवी माने,1,पवन कुसुंदल,2,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,322,पाककृती व्हिडिओ,15,पालकत्व,7,पावसाच्या कविता,40,पी के देवी,1,पु ल देशपांडे,9,पु शि रेगे,1,पुंडलिक आंबटकर,4,पुडिंग,10,पुणे,15,पुरुषोत्तम जोशी,1,पुरुषोत्तम पाटील,1,पुर्वा देसाई,2,पूजा काशिद,1,पूजा चव्हाण,1,पूनम राखेचा,1,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,27,पौष्टिक पदार्थ,20,प्र श्री जाधव,12,प्रकाश पाटील,1,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिमा इंगोले,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रदिप कासुर्डे,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर महाजन,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,11,प्रविण पावडे,15,प्रवीण दवणे,1,प्रवीण राणे,1,प्रशांतकुमार मोहिते,2,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,10,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रितफुल प्रित,1,प्रिती चव्हाण,27,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,97,प्रेरणादायी कविता,17,फ मुं शिंदे,3,फादर स्टीफन्स,1,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,11,फ्रॉय निस्सेन,1,बहिणाबाई चौधरी,6,बा भ बोरकर,8,बा सी मर्ढेकर,6,बातम्या,11,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,10,बाबासाहेब आंबेड,1,बायकोच्या कविता,5,बालकविता,14,बालकवी,9,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,21,बिपीनचंद्र नेवे,1,बी अरुणाचलाम्‌,1,बी रघुनाथ,1,बीड,1,बुलढाणा,1,बेकिंग,9,बेहराम कॉन्ट्रॅक्टर,1,भंडारा,1,भक्ती कविता,23,भक्ती रावनंग,1,भरत माळी,2,भा दा पाळंदे,1,भा रा तांबे,7,भा वें शेट्टी,1,भाग्यवेध,1,भाज्या,29,भाताचे प्रकार,16,भानुदास,1,भानुदास धोत्रे,1,भावनांची वादळे,1,भुषण राऊत,1,भूगोल,1,भूमी जोशी,1,म म देशपांडे,1,मं वि राजाध्यक्ष,1,मंगला गोखले,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंगेश कळसे,9,मंगेश पाडगांवकर,5,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,3,मंदिरे,4,मधल्या वेळेचे पदार्थ,41,मधुकर आरकडे,1,मधुकर जोशी,1,मधुसूदन कालेलकर,2,मनमोहन नातू,3,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मनिषा फलके,1,मनोज शिरसाठ,9,मराठी,1,मराठी उखाणे,2,मराठी कथा,107,मराठी कविता,1172,मराठी कवी,3,मराठी कोट्स,4,मराठी गझल,30,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,67,मराठी चारोळी,42,मराठी चित्रपट,19,मराठी टिव्ही,53,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,7,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,44,मराठी मालिका,20,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,48,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,288,मराठी साहित्यिक,2,मराठी सुविचार,2,मराठीप्रेमी पालक महासंमेलन,5,मराठीमाती,145,मसाले,12,महात्मा गांधी,8,महात्मा फुले,1,महाराष्ट्र,307,महाराष्ट्र फोटो,11,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,22,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेंद्र म्हस्के,1,महेश जाधव,3,महेश बिऱ्हाडे,9,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,4,माझा बालमित्र,88,मातीतले कोहिनूर,19,माधव ज्यूलियन,6,माधव मनोहर,1,माधवानुज,3,मानसी सुरज,1,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मिलिंद खांडवे,1,मीना तालीम,1,मुंबई,12,मुंबई उपनगर,1,मुकुंद भालेराव,1,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,8,मोहिनी उत्तर्डे,2,यवतमाळ,1,यशपाल कांबळे,4,यशवंत दंडगव्हाळ,25,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,6,योगेश सोनवणे,2,रंगपंचमी,1,रंजना बाजी,1,रजनी जोगळेकर,5,रत्नागिरी,1,रविंद्र गाडबैल,1,रविकिरण पराडकर,1,रवींद्र भट,1,रा अ काळेले,1,रा देव,1,रागिनी पवार,1,राजकारण,2,राजकीय कविता,12,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश पोफारे,1,राजेश्वर टोणे,3,राम मोरे,1,रामकृष्ण जोशी,2,रामचंद्राच्या आरत्या,5,रायगड,1,राहुल अहिरे,3,रुपेश सावंत,1,रेश्मा जोशी,2,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,15,लघुपट,3,लता मंगेशकर,2,लहुजी साळवे,1,लक्ष्मण अहिरे,2,लक्ष्मीकांत तांबोळी,2,लातूर,1,लिलेश्वर खैरनार,2,लीना पांढरे,1,लीलावती भागवत,1,लोकमान्य टिळक,3,लोणची,9,वंदना विटणकर,2,वर्धा,1,वसंत बापट,12,वसंत साठे,1,वसंत सावंत,1,वा गो मायदेव,1,वा ना आंधळे,1,वा भा पाठक,2,वा रा कांत,3,वात्रटिका,2,वादळे झेलतांना,2,वामन निंबाळकर,1,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,वि दा सावरकर,3,वि भि कोलते,1,वि म कुलकर्णी,5,वि स खांडेकर,1,विंदा करंदीकर,8,विक्रम खराडे,1,विचारधन,215,विजय पाटील,1,विजया जहागीरदार,1,विजया वाड,2,विजया संगवई,1,विठ्ठल वाघ,3,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विद्याधर करंदीकर,1,विनायक मुळम,1,विरह कविता,58,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,4,विवेक जोशी,3,विशाल शिंदे,1,विशेष,12,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव गव्हाळे,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,वैशाली नलावडे,1,व्यंगचित्रे,17,व्रत-वैकल्ये,1,व्हिडिओ,13,शंकर रामाणी,1,शंकर विटणकर,1,शंकर वैद्य,1,शंकराच्या आरत्या,4,शरणकुमार लिंबाळे,1,शशांक रांगणेकर,1,शशिकांत शिंदे,1,शां शं रेगे,1,शांततेच्या कविता,9,शांता शेळके,11,शांताराम आठवले,1,शाम जोशी,1,शारदा सावंत,4,शाळेचा डबा,15,शाळेच्या कविता,11,शितल सरोदे,1,शिरीष पै,1,शिरीष महाशब्दे,8,शिल्पा इनामदार-आर्ते,1,शिवाजी महाराज,7,शिक्षकांवर कविता,4,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,14,शेती,1,शेषाद्री नाईक,1,शैलेश सोनार,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्री दि इनामदार,1,श्री बा रानडे,1,श्रीकृष्ण पोवळे,1,श्रीधर रानडे,2,श्रीधर शनवारे,1,श्रीनिवास खळे,1,श्रीपाद कोल्हटकर,1,श्रीरंग गोरे,1,श्रुती चव्हाण,1,संघर्षाच्या कविता,33,संजय उपाध्ये,1,संजय डोंगरे,1,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिंदे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संजीवनी मराठे,3,संत एकनाथ,1,संत चोखामेळा,1,संत जनाबाई,1,संत तुकडोजी महाराज,2,संत तुकाराम,8,संत नामदेव,3,संत ज्ञानेश्वर,6,संतोष जळूकर,1,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदीपकुमार खुरुद,1,संदेश ढगे,39,संध्या भगत,1,संपादक मंडळ,1,संपादकीय,11,संपादकीय व्यंगचित्रे,2,संस्कार,2,संस्कृती,133,सई कौस्तुभ,1,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,22,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सतीश काळसेकर,1,सदानंद रेगे,2,सदाशिव गायकवाड,2,सदाशिव माळी,1,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,8,सरबते शीतपेये,8,सरयु दोशी,1,सरला देवधर,1,सरिता पदकी,3,सरोजिनी बाबर,1,सलीम रंगरेज,8,सविता कुंजिर,1,सांगली,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सातारा,1,साने गुरुजी,5,सामाजिक कविता,113,सामान्य ज्ञान,8,सायली कुलकर्णी,7,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,साक्षी यादव,1,सिंधुदुर्ग,1,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,3,सुदेश इंगळे,24,सुधाकर राठोड,1,सुनिल नागवे,1,सुनिल नेटके,1,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुमित्र माडगूळकर,1,सुरज दळवी,1,सुरज दुतोंडे,1,सुरज पवार,1,सुरेश भट,2,सुरेश सावंत,2,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सुहास बोकरे,6,सैनिकांच्या कविता,4,सैरसपाटा,128,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,सोलापूर,1,सौरभ सावंत,1,स्तोत्रे,2,स्नेहा कुंभार,1,स्फुटलेखन,4,स्फूर्ती गीत,1,स्माईल गेडाम,4,स्वप्ना पाटकर,1,स्वप्नाली अभंग,5,स्वप्नील जांभळे,2,स्वाती काळे,1,स्वाती खंदारे,320,स्वाती गच्चे,1,स्वाती दळवी,9,स्वाती नामजोशी,31,स्वाती पाटील,1,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,42,हर्षद माने,1,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,2,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हितेशकुमार ठाकूर,1,हेमंत जोगळेकर,1,हेमंत देसाई,1,हेमंत सावळे,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,ज्ञानदा आसोलकर,1,ज्ञानदेवाच्या आरत्या,2,
ltr
item
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन: स्कुबा डायव्हिंग - मराठी भयकथा
स्कुबा डायव्हिंग - मराठी भयकथा
स्कुबा डायव्हिंग, मराठी भयकथा - [Scuba Diving, Marathi Bhaykatha] साहसाची ओढ किशोर आणि सारिकाच्या काही भलतीच अंगलट येते आणि सुरु होतो त्यांचा मृत्युशी पाठशिवणीचा खेळ याचीच कहाणी म्हणजे स्कुबा डायव्हिंग.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj716Q5g0UwUgkwMK2azxtWS5iH9wo0jhFoDIMsfe6qm-JgclBF7e6rrfyr74QwYa4SZeZmdmTkkfCsjQt89VZaYw5U1i1i7JuL_M1CIYut0qn47wnRGztneVr10WJ4r0oOxFFJYJhspSyg/s1600/scuba-diving-710x360.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj716Q5g0UwUgkwMK2azxtWS5iH9wo0jhFoDIMsfe6qm-JgclBF7e6rrfyr74QwYa4SZeZmdmTkkfCsjQt89VZaYw5U1i1i7JuL_M1CIYut0qn47wnRGztneVr10WJ4r0oOxFFJYJhspSyg/s72-c/scuba-diving-710x360.jpg
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2016/06/scuba-diving-marathi-bhaykatha.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2016/06/scuba-diving-marathi-bhaykatha.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची