
कधी बदामी कधी गोल, कधी बोलके कधी अबोल
कधी बदामी कधी गोलकधी बोलके कधी अबोल
कधी टपोरे कधी पाणीदार
कधी तलवारी सारखे तीक्ष्ण धार धार
कधी नाराज कधी हासरे
कधी मादक कधी लाजरे
कधी मिश्किल कधी फितूर
कधी प्रेमळ कधी निष्ठुर
पापणीत लपलेले स्वप्नात सजलेले
अश्रुंनी भिजलेले शांत कधी निजलेले
सुंदर ते डोळे