कंठातून गाण्यात आणि, गाण्यातून अंतरंगात जे नेतात, ते सूर
कंठातून गाण्यात आणिगाण्यातून अंतरंगात जे नेतात
ते सूर
अनुभवातून वाक्यात आणि
वाक्यातून डोळ्यात जी चमकते
ती बुद्धी
वर्दीतून निश्चयात आणि
निश्चयातून सीमेवर उभे असते
ते धैर्य
एकांतातून शांततेत आणि
शांततेतून आनंदात जो लाभतो
तो आत्मविश्वास
सुयशातून सातत्यात आणि
सातत्यातून ऐश्वर्यात जी बहरते
ती नम्रता
स्पर्शातून आधारात आणि
आधारातून अश्रुत जी ओघळते
ती माया
हृदयातून गालावर आणि
गालावरून स्मितेत जे तरंगते
ते प्रेम
इच्छेतून हक्कात आणि
हक्कातून शब्दात जी उमटते
ती खात्री
स्मृतितून कृतित आणि
कृतितून समाधानात जी दिसते
ती जाणीव
मनातून ओठावर आणि
ओठावरून पुन्हा मनात जाते
ती आठवण