Loading ...

उद्याचा मी म्हणून - मराठी कविता

उद्याचा मी म्हणून, मराठी कविता - [Udyacha Me Mhanun, Marathi Kavita] उद्याचा उगवणारा दिवस माझा आहे म्हणून, जगत असतो, पण उद्याचा दिवस.

उद्याचा उगवणारा दिवस माझा आहे म्हणून, जगत असतो, पण उद्याचा दिवस

उद्याचा उगवणारा दिवस माझा आहे म्हणून
जगत असतो, पण उद्याचा दिवस
आज म्हणून येतो, तो कालचा झालेला असतो

उद्याचा जन्मणारा बाळ आहे म्हणून
तरसत असतो, पण उद्याचा माझा बाळ
तरुण म्हणून होतो, तो दुसर्‍याचा झालेला असतो

उद्याची कोमललेली सकाळ आहे म्हणून
तरळत असतो, पण उद्याची सकाळ
संध्याकाळ म्हणून येते, आणि ती चंद्राची झालेली असते

उद्याचा मुलगा माझा आहे म्हणून
वेडावून गेलेला असतो, पण उद्याचा मुलगा
जावई म्हणून जातो, तो सासरचा झालेला असतो

उद्याची सोनकळी माझी आहे म्हणून
सद्‌गदीत असतो, पण उद्याची सोनकळी
सून म्हणून जाते, ती दुसर्‍या घराची झालेली असते

उद्याचा प्रत्येक क्षण माझा आहे म्हणून
कंठत असतो, पण उद्याचा क्षण
भूतकाळ म्हणून जातो, तो काळाचा झालेला असतो

मी जेव्हा आज मात्र माझा आहे म्हणून
स्वतःवर मी पणा गाजवतो, पण आजचा मी
हरवलेला म्हणून येतो, तो अहंकारात विलीन झालेला असतो

उद्याचं वाटणारं तारुण्य आहे म्हणून
जोशात असतो, पण उद्याचं तारुण्य
वार्धक्य म्हणून येतं, आणि तो उद्याचा मी म्हणूनच असतो

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची