Loading ...

अश्वपती पुसता - वटसावित्रीची आरती

अश्वपती पुसता, वटसावित्रीची आरती - [Ashwapati Pusata Vatsavitrichi Aarti] अश्वपती पुसता झाला, नारद सांगताती तयाला, अल्पायुषी सत्यवंत.

अश्वपती पुसता झाला, नारद सांगताती तयाला, अल्पायुषी सत्यवंत

अश्वपती पुसता झाला ॥
नारद सांगताती तयाला ॥
अल्पायुषी सत्यवंत ॥
सावित्रीने का प्रणीला ॥
आणखी वर वरी बाळे ॥
मनि निश्चय जो केला ॥
आरती वड० ॥ १ ॥

दयावंत यम दूजा ॥
सत्यवंत ही सावित्री ॥
भावे करीन मी पूजा ॥
आरती वड० ॥ ध्रु० ॥

ज्येष्ठमास त्रयोदशी ॥
करिती पूजन वडाशी ॥
त्रिरात्र व्रत करुनिया ॥
जिंकिसी तू सत्यवंताशी ॥
आरती वड० ॥ २ ॥

स्वर्गावरी जाऊनिया ॥
अग्निखांब कवळीला ॥
धर्मराज उचकला ॥
हत्या घालील जीवाला ॥
येई गे पतिव्रते ॥
पति नेई गे आपुला ॥
आरती वड० ॥ ३ ॥

जाऊनियां यमापाशी ॥
मागतसे आपला पती ॥
चाई वर देऊनिया ॥
दयावंत द्यावा पती ॥
आरती वड० ॥ ४ ॥

पतिव्रते तुझी कीर्ति ॥
ऐकूनि ज्या नारी येती ॥
तुझे व्रत आचरती ॥
तुझी भवने पावती ॥
आरती वड० ॥ ५ ॥

पतिव्रते तुझी स्तुती ॥
त्रिभुवनी ज्या करीती ॥
स्वर्गी पुष्पवृष्टी करुनिया ॥
आणिलासी आपला पती ॥
अभय देउनिया ॥
पतिव्रते तारी मजसी ॥
आरती वड० ॥ ६ ॥

टीप: वरील साहित्य केवळ पारंपरिक श्रद्धांवर आधारित असून, वाचकांनी विवेकबुद्धी जपून अंधश्रद्धेपासून दूर राहावे.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची