Loading ...

लोकमान्य टिळक (मराठी लेख)

लोकमान्य टिळक (मराठी लेख) - मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद लेखिका स्वप्नाली अभंग यांचा लोकमान्य टिळक हा मराठी लेख.

लोकमान्य टिळक (मराठी लेख)

टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सुर्याचे पिल्लू’ म्हणायचे

बाळ गंगाधर टिळक (लोकमान्य टिळक / Lokmanya Bal Gangadhar Tilak) यांचा जन्म रत्नागिरी जिल्हायातल्या चिखली या गावी झाला. टिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सुर्याचे पिल्लू’ म्हणायचे. त्यांना लहाणपणापासूनच अन्यायाविरुध्द चीड. होती शाळेत असताना एकदा त्यांच्या वर्गातील मुलांनी वर्गात शेंगा खाऊन टरफले तशीच टाकली होती शिक्षकांनी वर्गात आल्यानंतर त्याबद्द्ल मुलांना विचारले पण कुणीही तोंड उघडले नाही शेवटी टिळकांना टरफले उचलण्यास सांगितले परंतू “मी शेंगा खाल्या नाहीत मी टरफले उचलणार नाही” या शब्दांत त्यांनी टरफले उचलण्यास स्पष्ट नकार दिला. वयाच्या १०व्या वर्षी ते पुण आले. त्यांच्या वडिलांची बदली पुण्यात झाली होती.

१८७२ साली ते मॅट्रीक ची परिक्षा उत्तीर्ण झाले त्यानंतर त्यांनी डेक्कन कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. आणि आपले महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण केले. सामाज परिवर्तनाला शिक्षणा शिवाय पर्याय नाही हे त्यांनी जाणले आणि त्यांनी त्यांच्या मित्रांबरोबर न्यु इंग्लिश स्कुल आणि डेक्कन ऎज्यकेशन सोसायटीची स्थापना केली. टिळक आणि आगरकर एकमेकांचे परममित्र होते. परंतु स्वातंत्र मिळवण्याच्या मतांतरामुळे त्यांच्यात वाद निर्माण झाला. आगरकरांचे मत होते आधी देश सूधरला पाहिजे तरच त्या स्वातत्रंयाला अर्थ राहिल. परंतु टिळकांच्या मत होते कि, समाज सुधारणेला बरेच दिवस लागतील त्यासाठी इतके दिवस थांबणे शक्य नाही.

टिळकांचा गणितात व्यासंग होता त्याशिवाय राजकारण, तत्वज्ञान, खगोलशास्त्र, लेखन, न्यायशास्त्र, सनातन धर्मग्रथांचा अभ्यास यात त्यांचा हातखंडा होता. टिळक मुंबईत ज्या मित्राकडे राहात होते तो वैदकशास्त्र शिकत होता त्याच्या घरी बसून हेही वैदक शास्त्रात घुसले आणि एकदा डिसेक्शनसाठी बैलाचे ह्रदय घेवून आले. त्यांच्या मित्रानाने या घटनेनंतर त्यांना गणितातच व्यासंग करण्याचा प्रेमळ सल्ला दिला.

टिळकांनी ग्रीक संस्कृतीचा अभ्यास केला ज्युपीटर देवाच्या स्मरणार्थ भरवले जाणारे ऑलिंपिक खेळ विविध ग्रीक राज्यांना एकत्र आणण्यात यश्स्वी ठरले. याच धर्तीवर त्यांनी प्रस्थापित गणेशोत्सावावे पुनरुज्जीवन केले. हिंदु धर्मातील ऎकोपा वाढीस लागावा म्हणुन गणेशोत्सवाला दहा दिवस चालणाऱ्या सार्वजनिक उत्सवाचे स्वरुप दिले. शिवाजी महाराज हे मराठयांसाठी स्फुर्तीस्थान आहेत म्हणुन त्यांनी शिवजंयती सुरु केली. भारतीय समाजाला सभोवताली घडणाऱ्या घटनांचा निरपेक्ष वृतांत देण्यासाठी तसेच सामाजप्रबोधनासाठी त्यांनी आपल्या मित्रांसोबत ‘केसरी’ आणि ‘मराठा’ ही वृत्तपत्रे सुरु केली. केसरी मराठीतून तर मराठा इंग्रजीतून प्रकशित होत होते.

१८८१ ते १९२० या चाळिस वर्षांच्या कालखंडात त्यांनी ५१३ अग्रलेख लिहले. त्यांचे अग्रलेख हा केसरीचा आत्मा होता. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, शिशुपाल की, पशुपाल यासारख्या अग्रलेखांनी इंग्रज सरकरचे धाबे दणाणले होते. त्यांनी ‘ओरायन’ आणि ‘द आर्क्टिक होम ऑफ वेदाज’ ही पुस्तके लिहली. तसेच त्यांनी गीतारहस्य ही लिहले. स्वातंत्र लढ्यात त्यांनी देशबाधंवामध्ये चेतना निर्माण करण्यासाठी त्यांनी दिलेली घोषणा ‘स्वराज हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच’ इतिहासात अजरामर झाली.


लोकमान्य टिळक (मराठी लेख) संबंधी महत्त्वाचे दुवे:


- स्वप्नाली अभंग

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची