Loading ...

शिळासप्तमीची कहाणी

शिळासप्तमीची कहाणी, श्रावणातल्या कहाण्या - [Shilasaptamichi Kahani, Shravanatalya Kahanya] श्रावणात वाचल्या जाणाऱ्या श्रावणातल्या कहाण्यांपैकी एक कहाणी - शिळासप्तमीची कहाणी.

शिळासप्तमीची कहाणी - श्रावणातल्या कहाण्या | Shilasaptamichi Kahani - Shravanatalya Kahanya

श्रावणात वाचल्या जाणाऱ्या श्रावणातल्या कहाण्यांपैकी एक - शिळासप्तमीची कहाणी

आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्यानं एक गाव वसवला. जवळ तळं बांधलं. काही केल्या पाणी लागेना. जलदेवतांची प्रार्थना केली. त्या प्रसन्न झाल्या. “राजा, राजा, तुझ्या सुनेचा वडील मुलगा बळी दे. पाणी लागेल.” हे राजानं ऐकलं. घरी आला. मनी विचार केला, फार दुःखी झाला. पुष्कळ लोकांच्या जिवांपेक्षा नातवाचा जीव अधिक नाही. पण ही गोष्ट घडते कशी? सून कबूल होईल कशी? तशी त्यानं तोड काढली. सुनेला माहेरी पाठवावं, मुलगा ठेवून घ्यावा. सासऱ्यानं आज्ञा केली, सून माहेरी गेली. इकडे राजानं चांगला दिवस पाहिला. मुलाला न्हाऊ माखू घातलं, जेवू घातलं, दागदागिने अंगावर घातले आणि एका पलंगावर निजवून तो पलंग तळ्यात नेऊन ठेविला. जलदेवता प्रसन्न झाल्या, तळ्याला महापूर पाणी आलं. पुढं राजाची सून माहेराहून येऊ लागली. भावाला बरोबर घेतलं. मामंजींनी बांधलेलं तळं आलं. पाण्यानं भरलेलं पाहिलं. तिथं तिला श्रावण शुद्ध सप्तमी पडली; वशाची आठवण झाली.

तो वसा काय? तळ्याच्या पाळी जावं, त्याची पूजा करावी. काकडीचं पान घ्यावं. वर दहीभात आणि लोणचं घालावं, एक शिवराई सुपारी ठेवावी आणि वाण भावाला द्यावं. एक मुटकुळं तळ्यात टाकावं आणि जलदेवतांची प्रार्थना करावी. “जय देवी आई माते, आमच्या वंशी कोणी पाण्यात बुडाले असतील ते आम्हास परत मिळोत.” याप्रमाणं तळ्यात उभं राहून तिनं त्या दिवशी प्रार्थना केल्यावर बळी दिलेला मुलगा पाय ओढू लागला. पाय कोण ओढतो म्हणून पाहू लागली, तो तिचा मुलगा दृष्टीस पडला. तिनं त्याला कडेवर घेतलं. आश्चर्य करू लागली. सासरी येऊ लागली. राजाला कळलं. सून आपल्या वडील मुलासह येत आहे. राजाला आश्चर्य वाटलं. त्यानं तिचे पाय धरले. तिला विचारलं, “अगं अगं मुली, तुझा मुलगा आम्ही बळी दिला, तो परत कसा आला?” “मी शिळासप्तमीचा वसा केला, तळ्यात वाण दिलं, जलदेवतांची प्रार्थना केली. मूल पुढं आलं, तसं उचलून कडेवर घेतलं.” राजाला फार आनंद झाला. तिच्यावर अधिक ममता करू लागला.

जश्या तिला जलदेवता प्रसन्न झाल्या, तशा तुम्हा आम्हा होवोत. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी, देवाब्राह्मणांचे द्वारी सुफळ संपूर्ण.

तात्पर्य: दुसऱ्याच्या कल्याणाकरिता केलेले कोणतेही कृत्य फुकट जात नाही. त्यातूनही परोपकारासाठी जो आपल्या अत्यंत आवडत्या वस्तूचाही त्याग करतो, त्याला देव शेवटी आनंदातच ठेवतो.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची