देहत्रय निरसीत चिन्मय जे उरले, ते मी ऐसे तुझिया वचने जाणवले
देहत्रय निरसीत चिन्मय जे उरले ॥ते मी ऐसे तुझिया वचने जाणवले ॥
पाचांच्या अन्वये अवघे समरसले ॥
ज्ञानादि त्रिपुटीचे भानहि मावळले ॥ १ ॥
जय देव जय देव सद्ग्रुरुनाथा ॥
तव पददर्शनमात्रे हरली भवव्यथा ॥ ध्रु० ॥
आहे नाही पण याविरहित मी साचा ॥
माझ्या ठायी व्यापक स्थितिलय विश्वाचा ॥
तेथे भेदाभेद मायिक तो कैचा ॥
घडला अनुभव ऐसा प्रकार स्वामीचा ॥ जय० ॥ २ ॥
जे काही बोलणे जललहरिप्राय ॥
त्याहुनि वर भिन्नत्वे काय ॥
आता मौन्ये तूझे वंदावे पाय ॥
गोसावीनंदन सहजचि चिन्मय ॥ जय० ॥ ३ ॥