Loading ...
/* Dont copy */

पूर्वी मंदिराच्या गाभार्‍यात - मराठी कविता (संतोष सेलुकर)

पूर्वी मंदिराच्या गाभार्‍यात (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी संतोष सेलुकर यांची पूर्वी मंदिराच्या गाभार्‍यात ही मराठी कविता.

पूर्वी मंदिराच्या गाभार्‍यात - मराठी कविता (संतोष सेलुकर)

पूर्वी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन, देवाचं मनोभावे दर्शन घेणार तो...

पूर्वी मंदिराच्या गाभार्‍यात

संतोष सेलुकर (परभणी, महाराष्ट्र)

पूर्वी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन देवाचं मनोभावे दर्शन घेणार तो आता फक्त मंदिराच्या पायऱ्यांवर बसून असतो सुन्न होऊन येणार्‍या जाणार्‍या भक्ताकडे पाहत त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडत नाही आता कुणासाठीही आपुलकीची शुभ्र धार दिसतही नाही त्याच्या चेहर्‍यावर आसमंतात झुलणारं चिअतन्य किंवा हसतही नाही तो स्वतःच्या आयुष्यावर कुठल्याही वेड्या उपहासानं बांधलेल्या घरात राहमन सुद्धा मी पाहतो त्याच्या चेहऱ्यावर पडलेल्या घराची भगनता ओथंबून आलेली एका जागी बसून सुद्धा नेहमीच मी पाहतो त्याला कुठे तरी दूर दूर... एकटं... एकाकी भटकतांना तो असतो इथल्या युवकांच्या बरबाद जिंदगीचा प्रतिनिधी आयुष्यावर कसा जंग चढतो ह्याच्या उदाहरणाचा तो असतो एक सार्वेत्कृष्ट नमुना लाचखाऊ लोकांच्या खेळाचं साधन असतो तो सखीचं उघडं अंग झाकण्यास असमर्थ असलेला साजन असतो तो... तो पहतो कधी एम्पलॉयमेन्ट ऑफिसला चकरा घालून घालून झिजलेल्या स्वतःच्या स्लीपरच्या तळव्यंकडे कधी हात ही फिरवितो स्वतःच्या वाढलेल्या खुरट्या दाढीवरून तसा त्याचा राग ही नसतो कुणावर अन भारही नसतो कुणाच्या खांद्यावर ...फक्त साप मेल्यावर वळवळत रहावी काही वेळ शेपटी तसाचा तो वळवळत असतो आत्तशा चुपचापणे आयुष्याच्या मातीत!

संतोष सेलुकर यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

  1. उर्वशी सुरेश१२ मे, २०२२

    शेवटच्या चार ओळी कमाल लिहिल्या आहेत तुम्ही.

    उत्तर द्याहटवा
तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची