जय देव वैनतेया - गरुडाची आरती

जय देव वैनतेया, गरुडाची आरती - [Jai Dev Vainateya, Garudachi Aarti] जय देव जय देव जय वैनतेया, आरती ओवाळू तुज पक्षीवया.

जय देव जय देव जय वैनतेया, आरती ओवाळू तुज पक्षीवया

जय देव जय देव जय वैनतेया ।
आरती ओवाळू तुज पक्षीवया ॥ ध्रु० ॥

हरिवहनाऽमृतहरणा कश्यपनंदना ।
दिनकरसारथिबंधो खगकुलमंडना ॥
कांचनमयबाहू नाम सूपर्ण ।
नारायनसांनिध्ये वंद्य तू जाण ॥ जय० ॥ १ ॥

त्वय्यारूढ होऊनि विष्णूचे गमन ।
मुनींद्र्वचने केले सागरझडपन ॥
जलचरी वर्तला आकांत जाण ।
विनते पयोब्धीने केले सांत्वन ॥ जय० ॥ २ ॥

तूझे नाममंत्र जपती जे कोण ।
सर्पादिक विषबाधा नोहे निशिदिन ॥
ऐसा तू महाराजा पक्षींद्र जाण ।
म्हणवुनि कवि हा तुजला अनन्य शरण ॥ जय० ॥ ३ ॥

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.