Loading ...
/* Dont copy */

अशेरीगड किल्ला

अशेरीगड किल्ला - [Asherigad Fort] १६८० फूट उंचीचा अशेरीगड किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. ठाणे जिल्ह्यातील पालघर डोंगररांगेतील अशेरीगड किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.

अशेरीगड किल्ला - Asherigad Fort

अशेरीगड शिलाहारवंशीय भोजराजाने बांधला असा उल्लेख आहे. त्यामुळे या गडाचे आयुर्मान साधारणतः ८०० वर्षे आहे असे अनुमान निघते.

अशेरीगड किल्ला - [Asherigad Fort] १६८० फूट उंचीचा अशेरीगड किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. ठाणे जिल्ह्यातील पालघर डोंगररांगेतील अशेरीगड किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो. पालघर विभागात जे अनेक लहानमोठे किल्ले आहेत, त्यांच्यात ‘दादा’ वाटावा असा हा अशेरीगड. आकार प्रचंड असल्याने हा गड बुलंद वाटतो.

अशेरीगड किल्ल्याचा इतिहास


अशेरीगड शिलाहारवंशीय भोजराजाने बांधला असा उल्लेख आहे. त्यामुळे या गडाचे आयुर्मान साधारणतः ८०० वर्षे आहे असे अनुमान निघते. पुढे पोर्तुगीजांनी हा गड ताब्यात घेऊन त्याची पुनर्बांधणी केली. पेशव्यांनी १७३७ च्या कोकणमोहिमेत हा गड जिंकून घेतला व १८१८ नंतर तो इंग्रजांच्या हाती गेला.

अशेरीगड किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे


पठारावर व उजवीकडे पडक्या वाड्यांचे अवशेष आढळतात. तसेच चर असलेले अनेक चौथरे येथे आढळतात. बहुदा पावसाळ्यात पावसाचे पाणी किंवा सांडपाणी वाहून नेण्यासाठी त्यांची योजना केलेली असावी. गुहेचा पृष्ठभाग अतिशय खडबडीत आहे. मात्र इथे आत व बाहेर पहारेकऱ्यांना झोपण्यासाठी ‘बर्थ’ केलेले आहेत. गावकऱ्यांकडून येथे कधीतरी पूजा होत असावी असे वाटणारी व एरवी सहसा न आढळणारी दोन जास्वंदीची झाडे गुहेच्या तोंडाशी आहेत.

गुहेच्या वरच्या अंगाला एक चौकोनी बांधीव तळे आहे. या तळ्यात एक अर्धवट बुडालेली तोफही दिसते. याशिवाय आणखी दोन पण अर्धवट बांधलेली तळी आहेत. वरच्या पठारावरून आग्नेय दिशेकडे पाहिल्यास कोहोजगड स्पष्ट दिसतो. दुर्बिणीने त्यावरील निसर्गनिर्मित मानवी पुतळाही सहज निरखता येतो. याच दिशेने पुढे गेल्यास कड्याला गेलेली मोठी भेग व पुढे एक बांधीव बुरुज दिसतो.

अशेरीगड गडावर जाण्याच्या वाटा


गडावर जाण्यसठी एकच वाट आहे. पालघरहून कासा या शहराकडे जाणाऱ्या एस.टी. बसने किंवा या महामार्गावरून धावणाऱ्या वाहनाने निघून ‘मस्तान नाका’ या ठिकाणापासून सुमारे १०-११ कि.मी. वर असणाऱ्या ‘खोडकोना’ गावाच्या स्टॉपला उतरायचे. प्रत्यक्ष गाव महामार्गापासून थोडे आत आहे. गावात जाण्यासाठी रस्त्याच्या डावीकडे बैलगाडीची वाट आहे. महामागावरूनच पालघरकडे पाठ करून उभे राहिल्यास उजवीकडे अडसूळ व डावीकडे प्रचंड असा अशेरीगड दिसतो. बैलगाडीची वाट एका सिमेंटच्या पुलावरून गावात शिरते. इथे वेशीवरच वाघदेवाचे छोटेसे परंतु टुमदार मंदिर आहे. आत गेल्यावर विस्तीर्ण पसरलेले आम्रवृक्ष, शेते व त्यातून डोकावणारी घरे प्रवासाचा शीण घालवतात.

विहिरीच्या थंड पाण्याने आपल्या बाटल्या भरून गावकऱ्यांनी दाखवलेल्या वाटेने खिंडीकडे निघायंच. वाट जंगलातून जात असल्याने उन्हाळ्यातही त्रास होत नाही. साधारणतः खिंडीत पोहोचण्यास एक ते दीड तास लागतात. वाट इथपर्यंत सोपी पण चढणीची आहे. खिंडीत थोड्या वरच्या बाजूला वाघदेवाचे छोटॆ उघडे देऊळ आहे. खिंडीतून उजवीकडे वळून गडमाथ्याकडे निघायचं. इथे एका मोठ्या खडकाला वळसा घातला की आपण दरवाजाच्या खाली येतो. इथे दगडावर कोरलेली एक छोटी गणेशमूर्ती आहे. दरवाजा सुरुंगाने फोडलेला आहे. इथे मात्र वर चढतांना काळजी घेणे आवश्यक आहे.

प्रस्तर वेडेवाकडे असल्याने अनुभवी व्यक्तींच्या सहाय्याने चढाई करणे योग्य. शक्यतो पाठीवरचे सामान उतरवूनच चढावे. इथून प्रस्तरारोहणाची हौस भागवून वर चढले की उजवीकडे वर जाण्यासाठी कातळात पायऱ्या खोदलेल्या आहेत. वाटेत खराब पाण्याचे टाके लागते. या टाक्यावरूनच दुतर्फा खांद्यापर्यंत उंच झुडूपातून गडाच्या मध्यापर्यंत जाणारी वाट आहे. या वाटेने जाताना डाव्या हाताला थोडे खाली खडकात पाच पाण्याची टाकी खोदलेली आहेत. यापैकी एका टाक्याचे पाणी पिण्यायोग्य आहे. पुन्हा सरळ वाटेने पुढे चालल्यावर ५ मिनिटांच्या अंतराने डावीकडे अजून एक वाट फुटते. तिने खाली गेल्यावर पाण्याची तीन आणखी टाकी आहेत. या टाक्यांतील अतिशय सुंदर आहे. जवळच खडकात एक गुहा देखील आहे.

१० ते १२ माणसे गुहेत व बाहेरच्या बांधीव कट्ट्यावर राहू शकतात. परंतु उंदरांपासून सामानाची काळजी घ्यावी. जेवणाची सोय आपण स्वतः करावी. तेथे बारामही पिण्याचे पाणी उपलब्ध आहे. जाण्यासाठी ३ तास लागतात. पावसाळ्यात प्रस्तरारोहण धोक्याचे ठरू शकते.


मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरील विविध विभागांत लेखन आणि संपादन.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची