अंबाघाट - महाराष्ट्र

अंबाघाट, महाराष्ट्र - [Amba Ghat, Maharashtra] अत्यंत निसर्गरम्य, हिरव्यागर्द झाडांनी आणि अनेक रानफुलांनी भरलेल्या ह्या परिसरात घाटाच्या वर अंबा गांव आहे.

विशाळगड, पावनखिंड अशा ठिकाणांना येथून जाता येते

कोल्हापूर-रत्नागिरी हमरस्त्यावरून ६२ कि.मी. अंतरावर मलकापूरच्या पुढे गेल्यावर अंबाघाट सुरु होतो. अत्यंत निसर्गरम्य, हिरव्यागर्द झाडांनी आणि अनेक रानफुलांनी भरलेल्या ह्या परिसरात घाटाच्या वर अंबा गांव आहे. विशाळगड, पावनखिंड अशा ठिकाणांना येथून जाता येते, इथे राहण्यासाठी काही खाजगी बंगल्यांची सोय होते. घाटातून खाली गेल्यावर साखरपा हे कोकणातील निसर्गरम्य गांव आहे. येथुन देवरुख, मार्लेश्वर, विशाळगड, पावनखिंड अशा ठिकाणांना जाता येते. येथे जाण्यासाठी सप्टेंबर ते मार्च हा काळ आल्हाददायक आहे.


मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरिल विविध विभागांत लेखन आणि संपादन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.