Loading ...
/* Dont copy */
आजोबागड किल्ला - Ajobagad Fort
स्वगृहमहाराष्ट्रमराठीमातीसैरसपाटाकिल्ले

आजोबागड किल्ला

आजोबागड किल्ला - [Ajobagad Fort] आजोबागड हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारात मोडतो. ठाणे जिल्ह्यातील हा किल्ला ट्रेकच्या दृष्टीने मध्यम श्रेणीचा आहे.

कुर्डुगड - विश्रामगड किल्ला
हरगड किल्ला
गोरखगड किल्ला
हातगड किल्ला
इंद्राई किल्ला

आजोबागडावर बसून वाल्मिकी ऋषींनी ‘रामायण’ हा धर्मग्रंथ लिहिला. याच गडावर सीतामाईने लव आणि कुश यांना जन्म दिला. लव आणि कुश वाल्मिकी ऋषींना ‘आजोबा’ म्हणत असत.

आजोबागड किल्ला - [Ajobagad Fort] आजोबागड हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारात मोडतो. ठाणे जिल्ह्यातील हा किल्ला ट्रेकच्या दृष्टीने मध्यम श्रेणीचा आहे. बालाघाटाच्या रांगेत रतनगड आणि हरिश्चंद्रगड यांच्या मधोमध अगदी कडेला असलेला ‘अजापर्वत’ उर्फ ‘आजोबाचा डोंगर’ एखाद्या पुराण पुरुषाप्रमाणे भासतो. घनदाट झाडाझुडुपांनी नटलेला हा आजोबाचा गड गिर्यारोहकांसाठी एक आगळे वेगळे लक्ष्यच ठरला आहे. या गडाची ३००० फूट उभी भिंत ही प्रस्तरोहकांसाठी एक मोठे आव्हानच आहे.

आजोबागड किल्ल्याचा इतिहास


गडाचे नाव आजोबा कसे पडले यावर एक पुराणकथा प्रसिद्ध आहे. याच गडावर बसून वाल्मिकी ऋषींनी ‘रामायण’ हा धर्मग्रंथ लिहिला. याच गडावर सीतामाईने लव आणि कुश यांना जन्म दिला. लव आणि कुश वाल्मिकी ऋषींना ‘आजोबा’ म्हणत असत. म्हणूनच या गडाचे नाव आजोबाचा गड असे पडले अशी कथा सांगितली जाते. येथे गडावर वाल्मिकि ऋषीचा आश्रम व त्यांची समाधीसुद्धा आहे.

आजोबागड किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे


पहिली वाट पकडून वाल्मिकी ऋषींच्या आश्रमापाशी साधारणतः अर्ध्या तासात पोहचावे. वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाजवळून गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी वाट नसल्याने आपल्याला मुक्काम आश्रमातच करावा लागतो. येथे गडावर रहाण्यासाठी एक कुटी आहे. जवळच झरा आहे. जर मुक्कामाचा कार्यक्रम असेल तर जेवणाची सोय आपल्याला घरूनच करून आणावी लागते. आश्रमाजवळून पुढे धबधब्याच्या वाटेने चढत गेल्यास सुमारे एक ते दीड तासानंतर वर एक गुहा लागते. येथे लवकुशाच्या पादुका खडकात कोरलेल्या आहेत. येथे डावीकडे एक पाण्याचे टाके सुद्धा आहे. या गुहेपर्यंत जाण्यासाठी शिड्या देखील लावल्या आहेत. याच मार्गाने आश्रमात परतावे. अशा प्रकारे मुंबईहून येणार्‍यांसाठी आजोबाचा गड एक निसर्गरम्य अशी दुर्गयात्राच ठरते. गडाच्या माथ्यावर दोन ते तीन पाण्याची टाकी सोडल्यास पहाण्याजोगे विशेष असे काहीच नाही. अनेक दुर्गवीर रतनगड-आजोबागड-हरिश्चंद्रगड असा ४ ते ५ दिवसांचा ट्रेक करतात.

आजोबागडावर जाण्याच्या वाटा


मुंबईहून आसनगाव रेल्वे स्थानकावरून: या वाटेने गडावर यायच एझाल्यास जुन्नर शहरात शिरल्यानंतर नव्या बसस्टँड समोरील रस्त्याने शिवपुतळ्यापाशी यावे. येथे चार रस्ते एकत्र मिळतात. डाव्या बाजूस जाणाऱ्या रस्त्याने साधारणतः एक किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्या कडेला एक मंदिर लागते. मंदिरसमोर जाणारी मळलेली पायवाट थेट आजोबागड किल्ल्याच्या एका कातळभिंतीपाशी घेऊन जाते. भिंतीला लावलेल्या साखळीच्या साह्याने आणि कातळाट खोदलेल्या पाऱ्यांच्या साह्याने वर पोहचता येते. ही वाट थोडी अवघड असून गडावर पोहचण्यास पाऊण तास लागतो.

कल्याण-मुरबाड-माळशेज-डोळखांब यामार्गाने: कल्याण - मुरबाड - माळशेज - डोळखांब यामार्गाने सुद्धा डेणे गावी पोहचता येते.

कसारा-घोटी-राजूर-कुमशेत मार्गे: गडवरचा माथा पहाण्यासाठी कसारा - घोटी- राजूर - कुमशेत मार्गे जाता येते.

गडावरती रहाण्यासाठी आश्रम आहे. यात २० जणांना रहाता येते. गडावर जेवणाची सोय नसल्याने जेवणाचे साहित्य आपण स्वतःच घेऊन यावे. बारामाही पाण्याचा झरा सतत वाहत असतो त्यामुळे येथे पाण्याची सोय मुबलक प्रमाणात आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी साधारणपणे १ तासाचा अवधी लागतो. गडावर सापांचे फार वास्तव्य असल्याने योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.




मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरिल विविध विभागांत लेखन आणि संपादन.

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची