नानापरिमळ दूर्वा - गणपतीची आरती

नानापरिमळ दूर्वा, गणपतीची आरती - [Nanaparimal Durva, Ganpatichi Aarti] नानापरिमळ दूर्वा शमिपत्रे, लाडू मोदक अन्ने परिपूरित पाते.

नानापरिमळ दूर्वा शमिपत्रे, लाडू मोदक अन्ने परिपूरित पाते

नानापरिमळ दूर्वा शमिपत्रे ।
लाडू मोदक अन्ने परिपूरित पाते ॥
ऐसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे ।
अष्टहि सिद्धी नवनिधि देसी क्षणमात्रे ॥१॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
तुझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती ॥ ध्रु० ॥

तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती ।
त्यांची सकलहि पापे विघ्नेही हरती ॥
वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती ।
सर्वहि पावुनि अंती भवसागर तरती ॥ जय देव० ॥ २ ॥

शरणागत सर्वस्वे भजती तव चरणी ।
कीर्ति तयांची राहे जोवर शाशितरणी ॥
त्रैयोक्यो ते विजयी अद्भुत हे करणी ।
गोसावीनंदन रत नामस्मरणीम ॥ जय देव जय देव० ॥३॥

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.