Loading ...

ऋषिपंचमीची कहाणी

ऋषिपंचमीची कहाणी, श्रावणातल्या कहाण्या - [Hrushi Panchamichi Kahani, Shravanatalya Kahanya] श्रावणात वाचल्या जाणाऱ्या श्रावणातल्या कहाण्यांपैकी एक कहाणी - ऋषिपंचमीची कहाणी.

ऋषिपंचमीची कहाणी - श्रावणातल्या कहाण्या | Hrushi Panchamichi Kahani - Shravanatalya Kahanya

श्रावणात वाचल्या जाणाऱ्या श्रावणातल्या कहाण्यांपैकी एक - ऋषिपंचमीची कहाणी

ऐका ऋषीश्वरांनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. तो आपला शेतीभाती करून सुखानं नांदत होता. पुढं एके दिवशी काय झालं? त्याची बायको शिवेनाशी झाली, विटाळ तसाच घरात कालविला. त्या दोषानं काय झालं? तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला. त्या बाईला आपला कुत्रीचा जन्म झाला. देवाची करणी! दोघंही आपल्या मुलाच्या घरी होती. तो मोठा धार्मिक होता. देवधर्म करी, श्राद्धपक्ष करी. आल्या ब्राह्मणांचा समाचार घेई. एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं. बायकोला सांगितलं, “आज माझ्या बापाचं श्राद्ध आहे. खीरपुरीचा स्वयंपाक कर.” ती मोठी पतिव्रता होती. तिनं चार भाज्या, चार कोशिंबिरी केल्या. खीरपुरीचा स्वयंपाक केला. इतक्यात काय चमत्कार झाला? खिरीचं भांडं उघडं होतं त्यात सर्पानं आपलं गरळ टाकलं. हे त्या कुत्रीनं पाहिलं. मनांत विचार केला, ब्राह्मण खीर खातील नि मरून जातील. मुलाला ब्रह्महत्येचं पातक लागेल म्हणून उठली. पटकन खाऊन खिरीच्या पातेल्याला शिवली. ब्राह्मणाच्या बायकोला राग आला. तिनं जळतं कोलीत घेतलं. नि कुत्रीच्या कंबरेत मारलं. तो स्वयंपाक टाकून दिला. पुन्हा स्वयंपाक केला. ब्राह्मणांना जेवू घातलं. कुत्रीला काही उष्टंमाष्टं देखील घातलं नाही. सारा दिवस उपास पडला.

रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे त्या बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली. बैलानं तिला कारण विचारलं. ती म्हणाली, “मी उपाशी आहे. मला अन्न नाही, पाणी नाही, खिरीच्या पातेल्यात सर्पानं गरळ टाकलं, ते माझ्या दृष्टीस पडलं. ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्याला शिवले. माझ्या सुनेला राग आला. तिनं जळतं कोलीत माझी कंबर मोडली. माझं सारं अंग दुखतं आहे. ह्याला मी काय करू?” बैलानं तिला उत्तर दिलं, “तू आदल्या जन्मी विटाळशीचा विटाळ घरात कालविलास, त्याचा संपर्क मला झाला. त्या दोषानं मी बैल झालो. आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं, तोंड बांधून मला मारलं, मी देखील आज उपाशीच आहे. त्याचं श्राद्ध फुकट गेलं.” हे भाषण मुलानं ऐकलं. लागलाच उठून बाहेर आला. बैलाला चारा घातला. कुत्रीला अन्न घातलं, दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं. मनात फार दुःखी झाला.

दुसरे दिवशी सकाळी उठला, घोर अरण्यात गेला. तिथं ऋषींचा मेळा पाहिला. त्यांना साष्टांग नमस्कार घातला. ऋषींनी त्याला प्रश्न केला, “तु असा चिंताक्रांत का आहेस?” मुलानं सांगितलं, “माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे. त्यांना मोक्ष कसा मिळेल? ह्या चिंतेत मी पडलो आहे. कृपा करून मला उपाय सांगा.” तेव्हा ऋषींनी सांगितलं, “तू ऋषिपंचमीचं व्रत कर. ते व्रत कसं करावं? भाद्रपद महिना येतो. चांदण्या पाखांतली पंचमी येते. त्या दिवशी काय करावं? ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं. आघाड्याची प्रार्थना करावी, त्याच्या काष्ठानं दंतधावन करावं, आंवळकाठी कुटून घ्यावी, तीळ वाटून घ्यावे. केसांना लावावे, मग आंघोळ करावी, धुतलेलीं वस्त्रे नेसावी. चांगल्या ठिकाणी जावं. अरुंधतीसह सप्तऋषींची पूजा करावी. असं सात वर्ष करावं. शेवटी उद्यापन करावं. ह्या व्रतानं काय होतं? रजस्वलादोष नाहीसा होतो, पापापासून मुक्तता होते. नाना तीर्थांच्या स्नानाचं पुण्य लागतं. नानाप्रकारच्या दानाचं पुण्य लागतं. मनी इच्छिलं कार्य होतं.” मुलानं ते व्रत केलं. त्याचं पुण्य आपल्या आईबापास दिलं. त्या पुण्यानं काय झालं? रजोदोष नाहीसा झाला. आकाशातून विमान उतरलं. बैल होता तो सुंदर पुरुष झाला. कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली. दोघं विमानांत बसून स्वर्गाला गेली.

मुलाचा हेतु पूर्ण झाला, तसा तुमचा आमचा होवो. ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची