Loading ...
/* Dont copy */ body{user-select:none;-moz-user-select:none;-ms-user-select:none;-khtml-user-select:none;-webkit-user-select:none;-webkit-touch-callout:none} pre, code, kbd, .cmC i[rel=pre]{user-select:text;-moz-user-select:text;-ms-user-select:text;-khtml-user-select:text;-webkit-user-select:text;-webkit-touch-callout:text}

महालक्ष्मीची कहाणी

महालक्ष्मीची कहाणी, श्रावणातल्या कहाण्या - [Mahalaxmichi Kahani, Shravanatalya Kahanya] श्रावणात वाचल्या जाणाऱ्या श्रावणातल्या कहाण्यांपैकी एक कहाणी - महालक्ष्मीची कहाणी.

महालक्ष्मीची कहाणी - श्रावणातल्या कहाण्या | Mahalaxmichi Kahani - Shravanatalya Kahanya

श्रावणात वाचल्या जाणाऱ्या श्रावणातल्या कहाण्यांपैकी एक - महालक्ष्मीची कहाणी

आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला दोन बायका होत्या. एक आवडती होती. दुसरी नावडती होती. आवडतीचं नाव पाटमाधवराणी आणि नावडतीचं नाव चिमादेवराणी होतं. त्या राजाला एक शत्रु होता, त्याचं नाव नंदनवनेश्वर होतं. तो क्षणी उडे, क्षणी बुडे, क्षणी आताळी जाई, क्षणी पाताळी जाई. असा राजाच्या पाठीस लागला होता. त्यामुळे राजा फार वाळत चालला. एके दिवशी राजानं सर्व लोकांना बोलवून त्याला शोधायला संगितलं. लोकांनी राजाला बरं म्हटलं. त्याला जिकडे तिकडे शोधू लागले. त्याच नगरात एक म्हातारीचा लेक होता. तो आपल्या आईला म्हणू लागला, “आई आई, मला भाकरी दे, मी राजाच्या शत्रूला मारायला जातो.” म्हातारी म्हणाली, “बाबा, तू गरीबाचा पोर, चार पावलं पुढं जा, झाडाआड ही वाळली भाकरी खा. म्हणजे लोक तुला हसणार नाहीत.” पोरानं बरं म्हणून म्हटलं. म्हातारीनं भाकरी दिली. म्हातारीचा लेक भाकरी घेऊन निघाला. सगळ्यांच्या पुढं गेला. इतक्यात संध्याकाळ झाली. सर्व लोक घरी आले. त्यांना नंदनवनेश्वर काही सापडला नाही. तशी राजाला फार काळजी लागली. पुढं फार रात्र झाली. म्हातारीचा पोर तिथंच राहिला.

पुढं मध्यरात्री काय झालं? नागकन्या-देवकन्या तिथं आल्या. महालक्ष्मीचा वसा वसू लागल्या. पोरानं विचारलं, “बाई बाई, ह्यानं काय होतं?” त्यांनी सांगितलं, “पडलं झडलं सापडतं. मनीं चिंतलं कार्य होतं.” इतकं ऐकल्यावर तोही त्यांच्याबरोबर वसा वसू लागला. पूजा केली, घागरी फुकल्या. पहाटेस उत्तरपूजा केली. जशी पहाटेस महालक्ष्मीमाय कोल्हापुरा जाती जागती झाली तसा नागकन्या-देवकन्यांनी आशीर्वाद मागितला. तसा ह्यानही मागितला. तसा देवीनं दिला. “राजाचा शत्रु मरेल, तुला अर्ध राज्य मिळेल, अर्ध भांडार मिळेल. माडीशी माडी बांधील. नवलवाट नाव ठेवील. तो वैरी डावा पाय मस्तकी घेऊन उद्या राजाच्या अंगणात मरून पडेल.” असं म्हणून देवी अदृश्य झाली. म्हातारीचा पोर घरी आला. दुसऱ्या दिवशी राणी पहाटेस उठली. परसात आली. राजाचा वैरी मेलेला पाहिला. तिला फार आनंद झाला. तशी तिनं ही गोष्ट राजाला जाऊन सांगितली. राजानं चौकशी केली. म्हातारीचा पोर सगळ्यांच्या मागं होता. त्यानं ह्याला मारलं असेल, असं लोकांनी राजाला सांगितलं. राजानं त्याला बोलावू धाडलं. म्हातारीचा पोर राजाच्या घरी आला, त्यानं राजाला विचारलं, “राजा राजा, आळ नाही केला, अन्याय नाही केला, मला इथं का बोलावलं?” राजा म्हणाला, “भिऊ नको, माझा वैरी नंदनवनेश्वर कोणी मारला? सगळे लोक तुझं नाव सांगतात. याचं काय कारण ते सांग.” पोर म्हणाला, “राजा, राजा, मी मारला नाही, पण तो देवीच्या वरानं मेला.” राजा म्हणाला, “ती देवी कोणती? तिला तू कुठं भेटलास?” पोर म्हणाला. “सगळ्यांच्या पाठीमागून निघालो. त्यांच्यापुढे थोडासा गेलो. शिळी भाकर झाडाआड करून खाल्ली. येता येता रात्र झाली. झाडाखाली वस्ती केली. रात्री नागकन्या-देवकन्या तिथं आल्या. त्यांनी महालक्ष्मीचा वसा वसला. त्याची मी चौकशी केली. पुढं मी पूजा केली. घागरी फुकल्या. पहाटेस महालक्ष्मीमाय कोल्हापुरा जाती जागती झाली. सर्वांना आशीर्वाद दिला, तसा मलाही दिला.” “तुला आशीर्वाद काय मिळाला?” “मला आशीर्वाद असा मिळाला, राजाचा शत्रू मरेल, तुला अर्धे राज्य मिळेल, अर्ध भांडार मिळेल. माडीशी माडी बांधील, नवलवाट नाव ठेवील.” असं म्हणून देवी अदृश्य झाली. मग आम्ही उत्तरपूजा केली. तातू घेऊन घरी आलो, तो तुझं बोलावणं आलं.” राजानं हकीकत ऐकली. आनंदीआनंद झाला. पोराला अर्ध राज्य दिलं, अर्ध भांडार दिलं. माडीशी माडी बांधून दिली. नवलवाट नाव ठेवलं. पुढं म्हातारीचा पोर आनंदानं वागू लागला.

ही बातमी आवडत्या राणीला समजली, राणीनं नवलवाटाला बोलावू धाडलं. महालक्ष्मीचा वसा कसा म्हणून विचारलं. नवलवातानं तातू दाखविला. तिला सांगितलं, “आश्विनमास येईल, पहिली अष्टमी येईल, त्या दिवशी सोळा सुतांचा तातू तेल-हळद लावून करावा. सोळा दुर्वा, सोळा तांदूळ घेऊन तुळशीची पंचामृती पूजा करावी. ज्याला हा वसा घेणं असेल त्यानं तातूची पूजा करावी. तातू हातात बांधावा. दुसरी कहाणी चतुर्थी व तिसरी चतुर्दशीला करावी. याप्रमाण दर आश्विनमासी करावं.” असा तिनं वसा समजून घेतला. आपले ते व्रत पाळू लागली.

[next] पुढे एके दिवशी काय झालं? राजा राणीच्या महाली आला. सारीपाट खेळू लागला. राजानं राणीचा तातू पाहिला. हे काय? म्हणून विचारलं. राणीनं तातूची हकीकत सांगितली. राजा म्हणाला, “माझे घरी हारे बहू, दोरे बहू, कांकणं बहू; कळाचे बहू; व्रताचं सूत तोडून टाक. मला ह्याची गरज नाही.” पुढं रात्र झाली राजाराणी निजली. सकाळीं दासी बटकी महाल झाडू लागल्या. केरात त्यांना तातू सापडला. दासींनी तो तातू नवलवाटाला दिला, त्याला राणीचा फार राग आला. इतक्यात काय चमत्कार झाला? त्याला नावडती राणी भेटली. तिनं तो तातू मागितला. हा म्हणाला, “उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील.” तिनं सांगितलं, “उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही.” तसा तातू तिच्या हवाली केला, वसा सांगितला.

पुढं अश्विनमास आला. पहिली अष्टमी आली. त्या दिवशी काय चमत्कार झाला? देवी महालक्ष्मीनं म्हातारीचं सोंग घेतलं. पाटमाधवराणीचे महाली गेली. महालक्ष्मीची तिला आठवण आहे किंवा नाहीं हे पाहू लागली, तो घरांत कोठे काहीच तयारी दिसेना. तेव्हा ती पाटमाधवराणीला म्हणू लागली, “अगं अगं पाटमाधवराणी, पुत्राची माय, आज तुझ्या घरी काय आहे?” राणीनं उत्तर दिलं, “आज माझ्या घरी काही नाही.” तेव्हा ती राणीला पुन्हा म्हणाली, “अगं अगं पाटमाधवराणी, पुत्राची माय, म्हातारीला पाणी देशीला तर तुझ्या राज्याला पुरे होईल.” राणीनं उत्तर दिलं, “म्हातारीला तांब्याभर पाणी दिलं तर माझ्या राज्याला पुरणार नाही.” तेव्हां म्हातारीनं पुन्हा पाटमाधवराणीला हाक मारली, “अगं अगं पाटमाधवराणी, पुत्राची माय, म्हातारीला दहीभाताची शिदोरी देशील, तर तुझ्या राज्याला पुरे होईल.” राणी म्हणाली, “म्हातारीला दहीभाताची शिदोरी दिली, तर माझ्या राज्याला पुरणार नाही.” म्हातारीला राग आला. तिनं शाप दिला. तो काय दिला? “सवतीच्या न्हाणी डाराडुरी करीत असशील. अर्ध अंग बेडकाचं, अर्ध अंग मनुष्याचं, अशी होऊन पडशील.” इतकं राणीनं ऐकलं. खदखदा हसली.

पुढं म्हातारी निघून गेली ती चिमादेवराणीच्या महाली आली. इकडे तिकडे पाहू लागली. तो तिला जिकडे तिकडे गडबड दिसली. एकीकडे पूजेचं साहित्य दिसलं, दुसरीकडे महालक्ष्मीचा मुखवटा मांडलेला पाहिला. तिनं चिमादेवराणीला विचारलं, “अगं अगं चिमादेवराणी, पुत्राची माय. आज तुझ्या घरी काय आहे?” तिनं उत्तर दिलं. “आज माझ्या घरी महालक्ष्मी आहे.” तेव्हा म्हातारी म्हणाली “कशानं ओळखावी? कशानं जाणावी?” तो ती सकाळीं कुवारीण झाली, दुपारी सवाशीण झाली; संध्याकाळीं पोक्त बायको झाली, अशा तिन्ही कळा तिला पालटून दाखविल्या. नंतर राणीनं तिला घरात बोलावलं, न्हाऊ माखू घातलं, पीतांबर नेसायला दिला. चौरंग बसावयास दिला. राणीनं व नवलवाटानं तिची पूजा केली. संध्याकाळ झाली. देवीसमोर दोघंजणं घागरी फुकू लागली. तसा घागरीचा आवाज राजाचे कानी गेला. धुपाचा वास महाली आला. तशी राजानं चौकशी केली. शिपायांना हाक मारली. “नावडतीच्या घरी आवाज कशाचा येतो तो तुम्ही पाहून या.” शिपाई नावडतीच्या घरी आले. महालक्ष्मीचं दर्शन घेतलं, तसेच ते परतले, राजाच्या महाली आले. पाहिलेली हकीकत सांगितली. तसा राजा म्हणाला, “मला तिथं घेऊन चला.” शिपाई राजाला घेऊन राणीकडे आले. राणीनं पंचारती ओवाळली, राजाचा हात धरला, मंदिरात घेऊन गेली, सारीपाटा खेळू लागलीं. खेळता खेळता पहाट झाली. पहाटेस महालक्ष्मीमाय कोल्हापुरा जाती जागती झाली तशी राणी म्हणाली, “माय, मला आशीर्वाद दे.” महालक्ष्मी म्हणाली, “तुला आशीर्वाद काय देऊं? राजा तुला सकाळी घेऊन जाईल आणि तुझी सवत तुझ्या न्हाणी डाराडुरी करील. अर्ध अंग बेडकाचं, अर्ध अंग मनुष्याचं, अशी होऊन पडेल.” तशी चिमादेवीराणीनं तिची प्रार्थना केली की, “तिला इतका कडक शाप देऊ नये.” तसं देवीनं सांगितलं की, राजा तिला बारा वर्ष वनात तरी धाडील.” असं म्हणून देवी अदृश्य झाली.

[next] उजाडल्यावर राजानं तिला रथात घातलं, वाड्यासमोर घेऊन आला. पाटमाधवराणीला निरोप धाडला की, राजा राणीला घेऊन येतो आहे. तिला तू सामोरी ये. तशी ती फाटकं तुटकं नेसली, घाणेरडी चोळी अंगात घातली, केस मोकळे सोडले, कपाळी मळवट भरला, जळतं खापर डोकीवर घेतलं आणि ओरडत किंचाळत पुढं आली. तो राजानं विचारलं, “ओरडत किंचाळत कोण येत आहे? भूत आहे की खेत आहे?” शिपायांनीं सांगितलं, ‘भूत नाही, खेत नाही, तुझीच राणी तुला सामोरी येत आहे.” राजा म्हणाला, “तिला रानात नेऊन मारून टाका.” असा शिपायांना हुकूम केला आणि आपण उठून महाली आला, राजाराणी सुखानं नांदू लागली.

इकडे शिपायांनीं पाटमाधवराणीला रानात नेलं. तिला राजाचा हुकूम सांगितला. राणी मुळूमुळू रडू लागली, तसं शिपायांनीं सांगितलं. “बाई बाई, रडू नको; आम्ही तुझ्या हातचं खाल्लेले प्यालेले आहोत. आमच्यानं काही तुला मारवत नाही, म्हणून आम्ही तुला सोडून देतो. पुन्हा तू या राज्यात काही येऊ नको. “ असं म्हणाले. राणीला तिथं सोडून दिलं. आपण निघून नगरात आले.

नंतर ती तशीच फिरता फिरता एका नगरात गेली. पहिल्यानं कुंभाराचे आळीत गेली. तिथं नव्या राणीला नवा कळस घडवीट होते. परंतु एकही कळस उतरेना. तेव्हा त्यांनी चौकशी केली. नवं माणूस कोण आलं आहे? तो ही सापडली. त्यांनी तिला हाकून पिटून लावलं. पुढं ती कासाराच्या आळीत गेली. तो तिथं नव्या राणीला नवा चुडा करीत होते. पण एकही चुडा उतरेना. तेव्हा चौकशी केली. नवं माणूस कोण आलं आहे? तेव्हा ही सापडली. लोकांनी तिला हाकून पिटून लावलं. तिथून निघाली ती सोनाराच्या आळीत आली. तिथं नव्या राणीला नवा दागिना घडवीत होते. तो एकही दागिना उतरेना. तेव्हा त्यांनी चौकशी केली. नवं माणूस कोण आलं आहे? तेव्हा ही सापडली. त्यांनी तिला हाकून पिटून लावलं. तिथून निघाली. साड्यांच्या आळीत गेली. तो तिथ नव्या राणीसाठी नवा साडा विणीत होते. पण एकही साडा उतरेना. मग त्यांनी चौकशी केली. नवं माणूस कोण आलं आहे? इकडे तिकडे पाहू लागले. तो ही सापडली. मग तिला तेथून हाकून पिटून लावलं. पुढं ती रानात निघुन गेली.

[next] जातां जातां ऋषीची गुंफा दृष्टीस पडली. तिथं गेली. तो ऋषि ध्यानस्थ बसले होते. ती तिथंच राहिली. ऋषि स्नानाला गेले म्हणजे ही आपली झाडसारवण करी, पूजेचं मांडून ठेवी. अशी तिनं बारा वर्ष सेवा केली. ऋषी प्रसन्न झाले व म्हणाले, “इथं झाडसारवण कोण करतं, त्यानं माझ्यासमोर यावं.” तशी ती ऋषींच्या पुढं आली, नमस्कार केला. ऋषींनीं झाडसारवणचं कारण विचारलं. ती म्हणाली, “अभय असेल तर सांगते,” ऋषींनी अभय दिलं. राणीनं पहिल्यापासून हकिकत सांगितली, ऋषींनी पोथ्या पुस्तकं वाचून पाहिली. तो तिच्यावर महालक्ष्मीचा कोप आहे असं समजलं. ऋषींनी तिच्याकडून महालक्ष्मीची पूजा करविली, रात्री घागरी फुकविल्या, पहाटे महालक्ष्मी माय कोल्हापुरा जाती जागती झाली, तसा राणीनं आशीर्वाद मागितली. देवी रागावली होती. ऋषींनी देवीजवळ क्षमा मागितली होती. देवीनं उःशाप दिला. “ह्या झाडाखाली सगळी तयारी कर. पाय धुवायला पाणी ठेव. चंदनाची उटी ठेव. फराळाची तयारी कर. कापुरी विडा ठेव. वाळ्याचा पंखा ठेव. त्या सगळ्याला तुझ्या हाताचा वास येऊ लागेल. राजा इथं आज उद्या येईल. तहानेला असेल. त्याचे शिपाई थंड पाण्याचा शोध करतील. ते ही सगळी तयारी पाहतील. राजाला जाऊन सांगतील. नंतर राजा इथं येईल.” त्याप्रमाणं दुसऱ्या दिवशी तिथं राजा आला. थंडगार छाया पाहिली. स्वस्थ बसून विश्रांती घेतली. नंतर पाय धुतले. पोटभर फराळ केला, पाणी प्याला. कापुरी विडा खाल्ला, आत्मा थंड झाला, पुढं राजानं शिपायांना विचारलं, “इथं मी पाणी प्यालो, फराळ केला, विडा खाल्ला, ह्या सगळ्याला पाटमाधवराणीच्या हाताचा वास कसा आला?" शिपाई म्हणाले, “अभय असेल तर सांगतो.” राजानं अभय दिलं. तेव्हा शिपाई म्हणाले, “आम्ही तिच्या हातचं खाल्लं प्यालं, आमच्यानं काही तिला मारवलं नाही म्हणून आम्ही तिला सोडून दिलं.” राजा म्हणाला. “असं असेल तर तिचा तुम्ही आसपास शोध करा.” शिपाई निघाले. ऋषीच्या गुंफा पाहिल्या. तिथं ही सापडली. राजाला जाऊन शिपायांनी सांगितलं. राजा उठला. ऋषींच्या गुंफेत गेला. त्यांचं दर्शन घेतलं. ऋषींनी ओळखलं. त्याला सगळी हकीकत सांगितली. पुष्कळसा बोध केला. राणीला नमस्कार करायला सांगितलं. नंतर तिला राज्याच्या हवाली केलं. तसा उभयतांनी ऋषींना नमस्कार केला. ऋषींनी त्यांना आशीर्वाद दिला. पुढं राजानं तिला रथात घातलं, आपल्या नगरीत घेऊन आला. बाहेर रथ उभा केला. राणीला निरोप पाठविला. “राजा पाटमाधवराणीला घेऊन येतो आहे. त्याला तू सामोरी ये.” तशी राणी न्हाली, माखली, पीतांबर नेसली, शालजोडी पांघरली, अलंकार घातले. नगरांच्या नारी बरोबर घेतल्या आणि वाजत गाजत राणी सामोरी गेली. राजानं विचारलं, “वाजतगाजत कोण येत आहे? नागकन्या की देवकन्या?” तसं शिपायांनीं सांगितलं, “नागकन्या नाही देवकन्या नाही, तझीच राणी तुला सामोरी येत आहे.” तेव्हा राजा पाटमाधवराणीला म्हणाला, “तू जर अशीच सामोरी आली असतीस, तर तुला इतके हाल भोगावे लागले नसते.” राणी उगीच बसली. राजानं चिमादेवराणीला उचलून रथात घेतलं आणि दोघींसह वाजतगाजत नगरात आला. सुखानं रामराज्य करू लागला.

जशी पाटमाधवराणीवर महालक्ष्मीमाय कोपली, तशी तुम्हा आम्हावर न कोपो. ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

तात्पर्य: देवीची भक्ति सर्व काळी सारख्याच भावाने करावी. अडचणीच्या वेळी त्याला प्रसन्न करण्यासाठी व्रते उपोषणे करावी आणि मग बरे दिवस आल्यावर देवाला विसरावे, हे चांगले नाही.
नाव

अंधश्रद्धेच्या कविता,5,अकोला,1,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,14,अनुराधा फाटक,39,अनुवादित कविता,1,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,3,अभिव्यक्ती,1007,अमन मुंजेकर,7,अमरश्री वाघ,2,अमरावती,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित पापळ,25,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल देशमुख,1,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अर्थनीति,3,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अहमदनगर,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,776,आईच्या कविता,20,आईस्क्रीम,3,आकाश पवार,2,आकाश भुरसे,8,आज,6,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,16,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,11,आदित्य कदम,1,आनंद दांदळे,8,आनंदाच्या कविता,21,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,18,आर समीर,1,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,20,आशिष खरात-पाटील,1,इंदिरा संत,3,इंद्रजित नाझरे,26,इंद्रजीत भालेराव,1,इतिहास,7,इसापनीती कथा,44,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,15,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,12,उस्मानाबाद,1,ऋग्वेदा विश्वासराव,5,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,18,ऋषिकेश शिरनाथ,2,एच एन फडणीस,1,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ऑडिओ कविता,12,ओंकार चिटणीस,1,औरंगाबाद,1,कपिल घोलप,11,करमणूक,51,कर्क मुलांची नावे,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,40,कवी बी,1,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,कि का चौधरी,1,किल्ले,97,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,कुठेतरी-काहीतरी,2,कुणाल खाडे,2,कुसुमाग्रज,7,कृष्णाच्या आरत्या,5,के के दाते,1,के तुषार,8,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशवकुमार,1,केशवसुत,2,कोल्हापूर,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,1,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,ग दि माडगूळकर,1,ग ह पाटील,1,गडचिरोली,1,गणपतीच्या आरत्या,5,गणपतीच्या गोष्टी,24,गणेश तरतरे,16,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गावाकडच्या कविता,12,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोकुळ कुंभार,6,गोड पदार्थ,58,ग्रेस,1,घरचा वैद्य,2,घाट,1,चंद्रकांत जगावकर,1,चंद्रपूर,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,जयश्री मोहिते,1,जळगाव,1,जाई नाईक,1,जानेवारी,31,जालना,1,जितेश दळवी,1,जिल्हे,31,जीवनशैली,422,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,ठाणे,1,डिसेंबर,31,डॉ. दिलीप धैसास,1,तनवीर सिद्दिकी,1,तरुणाईच्या कविता,6,तिच्या कविता,52,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दर्शन जोशी,2,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,366,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिवाळी फराळ,26,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,69,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धनराज बाविस्कर,25,धार्मिक स्थळे,1,धुळे,1,धोंडोपंत मानवतकर,11,ना धों महानोर,1,ना वा टिळक,1,नांदेड,1,नागपूर,1,नाशिक,1,निखिल पवार,3,निमित्त,3,निराकाराच्या कविता,8,निवडक,1,निसर्ग कविता,23,नोव्हेंबर,30,न्याहारी,49,पथ्यकर पदार्थ,2,परभणी,1,पराग काळुखे,1,पल्लवी माने,1,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,319,पाककृती व्हिडिओ,2,पालकत्व,7,पावसाच्या कविता,30,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,11,पूनम राखेचा,1,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,26,पौष्टिक पदार्थ,20,प्र श्री जाधव,6,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,11,प्रविण पावडे,13,प्रवीण राणे,1,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,13,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिती चव्हाण,15,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,85,प्रेरणादायी कविता,15,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,9,बहीणाबाई चौधरी,2,बा भ बोरकर,2,बा सी मर्ढेकर,4,बातम्या,7,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,2,बायकोच्या कविता,4,बालकविता,13,बालकवी,3,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बिपीनचंद्र नेवे,1,बीड,1,बुलढाणा,1,बेकिंग,9,भंडारा,1,भक्ती कविता,14,भरत माळी,1,भा रा तांबे,2,भाज्या,29,भाताचे प्रकार,16,भूमी जोशी,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,2,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,40,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी उखाणे,2,मराठी कथा,100,मराठी कविता,658,मराठी गझल,18,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,66,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,13,मराठी टिव्ही,32,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,5,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,41,मराठी मालिका,6,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,35,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,49,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,181,मसाले,12,महात्मा फुले,1,महाराष्ट्र,305,महाराष्ट्र फोटो,9,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,22,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेश बिऱ्हाडे,3,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,2,माझा बालमित्र,85,मातीतले कोहिनूर,15,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मीना तालीम,1,मुंबई,9,मुंबई उपनगर,1,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,5,मोहिनी उत्तर्डे,1,यवतमाळ,1,यश सोनार,2,यशपाल कांबळे,2,यशवंत दंडगव्हाळ,17,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,5,योगेश सोनवणे,2,रजनी जोगळेकर,5,रत्नागिरी,1,रागिनी पवार,1,राजकीय कविता,7,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश्वर टोणे,3,रामचंद्राच्या आरत्या,5,रायगड,1,राहुल अहिरे,3,रेश्मा जोशी,2,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लघुपट,3,लता मंगेशकर,2,लक्ष्मण अहिरे,2,लातूर,1,लिलेश्वर खैरनार,2,लोकमान्य टिळक,3,लोणची,9,वर्धा,1,वा भा पाठक,1,वात्रटिका,2,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,वि सावरकर,1,विंदा करंदीकर,2,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,54,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,4,विवेक जोशी,3,विशेष,4,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,व्यंगचित्रे,42,व्हिडिओ,23,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,6,शांता शेळके,3,शारदा सावंत,4,शाळेचा डबा,13,शाळेच्या कविता,10,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,3,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,11,शेती,1,शैलेश सोनार,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीधर रानडे,1,श्रीनिवास खळे,1,श्रीरंग गोरे,1,संघर्षाच्या कविता,28,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिंदे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकडोजी महाराज,1,संत तुकाराम,8,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,4,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदेश ढगे,39,संपादक मंडळ,1,संपादकीय,9,संपादकीय व्यंगचित्रे,2,संस्कार,2,संस्कृती,129,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,19,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सदाशिव गायकवाड,2,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,9,सरबते शीतपेये,8,सलिम रंगरेज,1,सांगली,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सातारा,1,सामाजिक कविता,112,सामान्य ज्ञान,7,सायली कुलकर्णी,7,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सिंधुदुर्ग,1,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,1,सुदेश इंगळे,4,सुनिल नागवे,1,सुनिल नेटके,2,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुमित्र माडगूळकर,1,सुरेश भट,2,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,3,सैरसपाटा,127,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,सोलापूर,1,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,5,स्वाती खंदारे,318,स्वाती गच्चे,1,स्वाती दळवी,9,स्वाती नामजोशी,31,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,41,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,1,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमंत जोगळेकर,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,
ltr
item
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन: महालक्ष्मीची कहाणी
महालक्ष्मीची कहाणी
महालक्ष्मीची कहाणी, श्रावणातल्या कहाण्या - [Mahalaxmichi Kahani, Shravanatalya Kahanya] श्रावणात वाचल्या जाणाऱ्या श्रावणातल्या कहाण्यांपैकी एक कहाणी - महालक्ष्मीची कहाणी.
https://4.bp.blogspot.com/-iH5DOLl-0u4/XUR6qe4uD6I/AAAAAAAAD2I/YSLMqrugFVwQYASUvdoq3v95ZEjqm-NBQCLcBGAs/s1600/mahalaxmichi-kahani.jpg
https://4.bp.blogspot.com/-iH5DOLl-0u4/XUR6qe4uD6I/AAAAAAAAD2I/YSLMqrugFVwQYASUvdoq3v95ZEjqm-NBQCLcBGAs/s72-c/mahalaxmichi-kahani.jpg
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2008/12/mahalaxmichi-kahani.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2008/12/mahalaxmichi-kahani.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची