माझं मन - मराठी कविता

माझं मन, मराठी कविता - [Maajh Mann, Marathi Kavita] सगळ्यांनी समजावलं तरी मानत नाही, कितीही वाटलं तरी करवत नाही.

सगळ्यांनी समजावलं तरी मानत नाही, कितीही वाटलं तरी करवत नाही

सगळ्यांनी समजावलं तरी मानत नाही
कितीही वाटलं तरी करवत नाही
कुणी काही सांगितलं तर ऐकवत नाही
अश्रु कितीही गाळले तरी गळतच नाही

चटके कितीही बसले तरी ओरडत नाही
आपल्यानीच तोडलं तरी दुरावायला तयार नाही
अपेक्षेप्रमाणे सगळ्यांना एकत्र आणता येत नाही
माझं मन हे असं का? कुणालाच उमजत नाही

निःस्वार्थी कष्टाची जाणीवही कुणा नाही
निखळ प्रेमाच्या भावनेचा आदरही कुणा नाही
कितीही केलं तरी केलं कुणी म्हणतच नाही
वाटतं मी कुणाची कुणी राहिलेच नाही

कारण कुणी मला प्रेमाने आपलं म्हणतच नाही
माझं मन हे असं का? कुणालाच समजत नाही

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.