हिरव्या मिरचीचे लोणचे - पाककृती
हिरव्या मिरचीचे लोणचे, पाककला - [Green Chilly Pickle, Recipe] ठसाकेदार, चटकदार आणि जेवणाला स्वाद आणणारे ‘हिरव्या मिरचीचे लोणचे’ नक्की बनवून पहा.
चटकदार, जेवणाचा स्वाद वाढवणारे ‘हिरव्या मिरचीचे लोणचे’
हिरव्या मिरचीच्या लोणच्यासाठी लागणारा जिन्नस
- १ किलो लांबट हिरवी मिरची
- २ वाट्या मोहरीची डाळ
- अर्धा चमचा मेथीची (कच्ची) पूड
- दीड चमचा हळद
- चमचे हिंग
- २॥ ते ३ वाट्या मीठ
- १२ लिंबांचा रस
- १ वाटी तेल
हिरव्या मिरचीच्या लोणच्याची पाककृती
- एका मध्यम आकाराच्या परातीत किंवा ताटात मोहरीची डाळ, मेथीपूड, हळद व हिंग घालावे.
- लहान पातलीत तेल कडकडीत तापवावे.
- धूर दिसेपर्यंत तापले की परातीतल्या जिनसांवर ओतावे व झार्याने ढवळावे.
- मसाला एकत्र कालवला गेला की गार होऊ द्यावा.
- मिरच्या धुवून फडक्यावर कोरड्या होऊ द्याव्यात.
- त्यांचे आपल्या आवडीनुसार बेताचे तुकडे करावे.
- मिरची यंत्रात बारीक केली तरी बिघडत नाही.
- त्यात ४ चमचे वगळून बाकीचे मीठ मिसळावे.
- गार झालेल्या मोहरीच्या डाळीचा मसाला घालावा.
- उन्हात ठेवलेल्या बरणीत तळाला २ चमचे मीठ घालावे.
- बरणी गार असावी.
- त्यात मिरच्या व मसाला कालवून भरावा.
- वरून दोन चमचे मीठ घालावे.
- दुसर्या किंवा तिसर्या दिवशी बारा लिंबाचा रस काढून लोणच्यात घालावा.
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.