स्मारक - मराठी कविता

स्मारक, मराठी कविता - [Smarak, Marathi Kavita] स्मारक नको म्हणालात तरी शेवटी, पुतळा उभारला त्यांनी भरचौकात.

स्मारक नको म्हणालात तरी शेवटी, पुतळा उभारला त्यांनी भरचौकात

स्मारक नको म्हणालात तरी शेवटी
पुतळा उभारला त्यांनी भरचौकात
पुतळ्याच्या हातात तलवार होती
इवली झालेली
मी पुस्तकांच्या हातांनी नमन केले.
बाजूला कुंपण होत, समंजसपणे बांधलेले
समोर काही आधीच माना तुकवून पाठीतून वाकलेले
वाटले, ह्याच्या हातात शस्त्र आहे म्हणून हा हिंस्त्र वाटतो
जमावतले थोर म्हणाले
हातात पुस्तक असते तर अधिक हिंस्त्र वाटला असता
मग मी स्मारकाच्या सावलीत
दप्तरातून शस्त्र असणाऱ्या मुलांची शाळा घेतली

तूर्तास
ह्या देशाला मूठभर अशिक्षित मुलांची गरज आहे
एवढंच


संदेश ढगे | Sandesh Dhage
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

1 टिप्पणी

  1. अप्रतिम आहे ओ तुमची हि कविता..
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.