Loading ...
/* Dont copy */

रेल्वेच्या खिडकीतून (मराठी कविता)

रेल्वेच्या खिडकीतून (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी संदेश ढगे यांची रेल्वेच्या खिडकीतून ही मराठी कविता.

रेल्वेच्या खिडकीतून (मराठी कविता)

रेल्वेच्या खिडकीतून मी माझ्या मुलीला समजावून सांगतो बाहेरच्या चौकटीतलं दृश्य


रेल्वेच्या खिडकीतून (मराठी कविता)

(Railwaychya Khidkitun - Marathi Kavita) मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी ‘संदेश ढगे’ यांची ‘रेल्वेच्या खिडकीतून’ ही कविता.



रेल्वेच्या खिडकीतून
मी माझ्या मुलीला
समजावून सांगतो
बाहेरच्या चौकटीतलं दृश्य
तिने खिडकीवर हात ठेवू नये याची मी घेतो पुरेपूर दक्षता
नाहीतर सरकेत किंवा नष्टच होईल. बाहेरच्या दृश्याची चौकट
मी बोलतो, तिच्यासाठी रुसून बसलेल्या माझ्या भाषेत
हे किन्नई तुझ्या बाबाचं स्टेशन
ते किन्नई तुझ्या आईचं स्टेशन
या दरम्यान येईल खूप काळोखाचा बोगदा
मग घरघर लागेल गाडीला
मग घरघर लागेल गाडीला
मग पुन्हा उजेड येईल
काळोखाला घाबरायचं नाही
नव्याने भेटणाऱ्य आभाळाला दचकायचं नाही
ते बघ, लुकलुकणारे दिवे, जे हमेशा असतात लांब
ते बघ, पक्षी उलटे-सुलटे, घट्ट विजेचा धरतात खांब
तो बघ काऊ, हम्माच्या आरामपाठीवर बसलेला
तो बघ काळा काळा ढग स्वतःवाच रुसलेला
मी तिच्याशी संवाद करताना
ती शेंबूड पुसते माझ्या शर्टाला
मी तिच्या मनाच्या इवल्याशा
भांड्यात
उकळतो नागरिकशास्त्र
तिच्या भुकेने वासलेल्या ओठांकडे माझे लक्ष नसते
गाडीतल्या आकसलेल्या समाजाकडे माझे लक्ष नसते
तिचे कैक प्रश्न दडवून ठेवल्याचा मला मात्र त्रास होतो
त्याक्षणी ती मोकळा श्वास घेत, बागडत असल्याचा भास होतो

- संदेश ढगे

अभिप्राय

  1. तुम्हाला काही येत नाही

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. वाचकांच्या प्रत्येक अभिप्रायाचा आम्ही आदरच करतो.
      आपल्या टिप्पणी बद्दल धन्यवाद!

      हटवा
तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची