Loading ...

कोहोजगड किल्ला

कोहोजगड किल्ला - [Kohojgad Fort] ३२०० फूट उंचीचा कोहोजगड किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. ठाणे जिल्ह्यातील पालघर डोंगररांगेतील कोहोजगड किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.

कोहोजगड किल्ला - Kohojgad Fort

पालघर परिसरात अनेक लहान मोठे गडकिल्ले अजूनही आपले अस्तित्व टिकवून आहेत. यापैकी वाडा पालघर रस्त्यावरचा ‘कोहोजगड’ हा प्रमुख किल्ला.

कोहोजगड किल्ला - [Kohojgad Fort] ३२०० फूट उंचीचा कोहोजगड किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. ठाणे जिल्ह्यातील पालघर डोंगररांगेतील कोहोजगड किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो. मुंबईच्या उत्तरेस गुजरातकडे जातांना ठाणे जिल्ह्याचा पालघर हा विभाग लागतो. या परिसरात अनेक लहान मोठे गडकिल्ले अजूनही आपले अस्तित्व टिकवून आहेत. यापैकी वाडा पालघर रस्त्यावरचा ‘कोहोज’ हा प्रमुख किल्ला. वाड्यापासून अवघ्या १०-११ कि.मी. वर वसलेला आहे.

कोहोजगड किल्ल्याचा इतिहास


कोहोजगड किल्ल्याचा फारसा इतिहास उपलब्ध नाही. गडावरच्या खोदीव टाक्यांवरून हा गड बऱ्यापैकी जुना, भोजकालीन असावा असे वाटते. पण यास पुरावा नाही. १६ व्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीजांनी गुजरातच्या राजाकडून हा प्रदेश जिंकून घेतला व या गडावर तट-बुरूज चढवले. पुढे पेशव्यांनी १८ व्या शतकात (१७३७) काढलेल्या मोहिमेत हा प्रदेश जिंकला. शेवटी तो इंग्रजांकडे गेला.

कोहोजगड किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे


माचीवरचे विस्तीर्ण पठार वाटेने येताना अजिबात न जोखता आल्याने आश्चर्यचकित व्हायला होते. माचीवर समोरच शंकराचे जीर्णोद्धारीत मंदिर आहे. त्याच्या समोरच दोन टाकी आहेत. पण ती खराब झालेली आहेत. मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यास डाव्या हाताला थोडे खाली उतरून गेल्यावर एकमेकांना लागून खोदलेली सात टाकी आहेत. यापैकी एक टाक्याचे पाणी अतिशय सुंदर आहे. दोन टाकी खराब झाली असून बाकी बुजलेली आहेत. मंदिराच्या उजवीकडे काही उद्ध्वस्त अवशेष आढळतात.

काही ठिकाणी जुजबी तटबंदी शिल्लक आहे. मंदिर डाव्या हाताला ठेवून पुढे गेले की उजवीकडे वर जाणारी वाट दिसते. इथून वर चढताना उजव्या बाजूला पाण्याची ३ प्रशस्त टाकी लागतात. यापैकी १ बुजलेले असून बाकी पाणी शेवाळयुक्त असले तरी पिण्यायोग्य आहे. इथेच कोपऱ्यात मारुतीची एक उघडी मूर्ती आहे. इथून तीच वाट घेऊन पुढे निघालं की आपण पडक्या बुरुजाजवळ येतो. डावीकडे छोटे मारुती मंदिर आहे. पायऱ्यांनी वर गडमाथ्यावर जायचं. इतकी चाल सुमारे १५ मिनिटात आटोपते.

माथ्यावर वाऱ्याने तयार झालेले सुळके आहेत. यातील निसर्गनिर्मित माणसाच्या आकाराचा दिसणारा पुतळा ही निसर्गाची केवळ अवर्णनीय कलाकृती. ही कोहोजवरची सर्वात प्रेक्षणीय गोष्ट. विविध दिशांतून विविध आकार व भास दाखवणारी हि कृती पाहून आपण अचंबित होतो. इथून थोडे पुढे डोळ्यांना सुखावणारे कृष्णाचे छोटे देऊळ आहे. वरून खालचा (वाडा-मनोर) रस्ता छान दिसतो. या सगळ्यात एक गोष्ट मात्र मनाला खंतावून जाते, मिळेल त्या ठिकाणी मंदिरावर, प्रस्तरांवर, इतकेच काय पुतळ्यावरही लोकांनी आपली नावे बदनाम करून ठेवलेले आहेत.

गडावर निवारा असा नाही. शंकराच्या मंदिरात केवळ २ माणसे राहू शकतात. खाण्याची सोय आपणच करावी. पिण्याचे पाणी गडावर आहे. बारमाही पाण्याची सोय आहे. गडावर जाण्यासाठी २ तास लागतात.




मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरील विविध विभागांत लेखन आणि संपादन.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची