Loading ...
/* Dont copy */

घनगड किल्ला

घनगड किल्ला - [Ghangad Fort] रायगड जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील घनगड किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने कठीण समजला जातो.

घनगड किल्ला - Ghangad Fort

रायगड जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील घनगड किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने कठीण समजला जातो.


घनगड किल्ला - (Ghangad Fort) ३००० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. रायगड जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने कठीण समजला जातो. मुळशीच्या पश्चिमेला एक मावळ भाग आहे यालाच ‘कोरसबारस’ मावळ म्हणतात. याच मावळात येणारा हा घनगड. आड बाजूला असलेला हा किल्ला मात्र आपल्यासारखा ट्रेकर्सला नेहमीच खुणावत राहतो. येथील जनजीवन शहरी सुखसोयीपासून दुरावलेले.



घनगड किल्ल्याचा इतिहास


किल्ल्याच्या बद्दल इतिहासात फारसा उल्लेख आढळत नाही. मात्र किल्ला कोळी सामंताकडून निजामशहाकडे आणि पुढे आदिलशहाकडे आणि नंतर मराठ्यांकडे आला.


घनगड किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे


किल्ल्यावर प्रवेश केल्यावर डाव्या हाताला असणारी टेकडीवर जाणारी वाट पकडावी. या वाटेने वर जातांना एका पडक्या दरवाजातून आपण गडमाथ्यावर प्रवेश करतो. गडावर पडक्या घरांचे अवशेष आहेत. पाण्याची एक ते दोन टाकी आहेत. आजमितिस मात्र ती फुटलेली आहेत. बाकी किल्ल्यावर फारसे अवशेष नाहीत. किल्ल्यावरून सुधागड, सरसगड आणि तैलबैला ची भिंत हा परिसर दिसतो. तसेच नाणदांड घाट, भोरप्याची नाळ या कोकणातील घाटवाटा सुद्धा दिसतात.


घनगड गडावर जाण्याच्या वाटा


ऐकोलेमार्ग: किल्ल्यावर जाण्यासाठी एकच वाट आहे आणि ती ऐकोले गावातूनच वर जाते. मुंबईकरानी आणि पुणेकरांनी लोणावळा गाठावे. लोणावळ्याहून भांबर्डेकडे जाणारी एस.टी. पकडावी. लोणावळा ते भांबर्डे हे अंतर ४० कि.मी चे आहे. भांबर्डे गावातून थेट ऐकोले गावात यावे.भांबर्डे ते ऐकोले हे साधारणतः अंतर २० मिनिटाचे आहे. ऐकोले गावातूनच किल्ल्यावर जाण्याचा रस्ता आहे. गावातून बाहेर पडल्यावर डावीकडची वाट पकडावी. ही वाट थेट किल्ल्यावर जाते. यावाटेने पुढे जातांना गारजाई देवीचे मंदिर लागते. या मंदिरात “श्री गारआई महाराजाची व किले घनगडाची” असा शिलालेख कोरलेला आहे. मंदिराच्या समोरच एक तोफगोळा पडलेला आहे. या मंदिराच्या डाव्या बाजूनेच किल्ल्यावर जाणारी वाट आहे. येथून थोड्याच वेळात आपण एका कातळकड्यापाशी येऊन पोहचतो. गडावर जाणारी वाट इंग्रजांनी सुरुंग लावून चिणून काढली आहे. १५ फुटाच्या ह्या कड्यावर थोडे प्रस्तरारोहण करून चढून जावे लागते. आवश्यक असल्यास १५ फुटाचा दोर लावावा. हा कडा पार केला की आपण थेट किल्ल्यातच प्रवेश करतो.

घनगड किल्ल्यावर राहण्याची सोय नाही मात्र ‘गारजाई’च्या मंदिरात २० लोकांची राहण्याची सोय होते. जेवणाची सोय आपण स्वतः करावी. किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही. ऐकोले गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी अर्धा तास लागतो. किल्ल्यावर जाण्यासाठी सर्व ऋतु उत्तम आहेत.


मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरिल विविध विभागांत लेखन आणि संपादन.

अभिप्राय

  1. घनगड किल्ल्यावर जाण्यास पाहिल थांबा जो हे त्या गावचे नाव भांबूर्डे असे नसून ते भांबर्डे असे आहे तरी या लेखामध्ये तसा बदल करावा ही नम्र विनंती

    उत्तर द्याहटवा
  2. घनगड किल्ल्यावर जाण्यास पाहिल थांबा जो हे त्या गावचे नाव भांबूर्डे असे नसून ते भांबर्डे असे आहे तरी या लेखामध्ये तसा बदल करावा ही नम्र विनंती

    उत्तर द्याहटवा
तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची