अजिंक्यतारा किल्ला

अजिंक्यतारा किल्ला - [Ajinkyatara Fort] ३०० मीटर उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. सातारा जिल्ह्यातील सातारा डोंगररांगेतील अजिंक्यतारा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.

अजिंक्यतारा किल्ला - Ajinkyatara Fort

अजिंक्यतारा हा किल्ला ‘सातारचा’ किल्ला म्हणून देखील ओळखला जातो.

अजिंक्यतारा किल्ला - [Ajinkyatara Fort] ३०० मीटर उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. सातारा जिल्ह्यातील सातारा डोंगररांगेतील अजिंक्यतारा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो. अजिंक्यतारा हा किल्ला ‘सातारचा’ किल्ला म्हणून देखील ओळखला जातो. सातारा शहरामंध्ये कुठेही उभे राहिले असता नजरेस पडतो. प्रतापगडापासून फुटणाऱ्या बामणोली रांगेवर अजिंक्यतारा उभारलेला आहे. येथील किल्ल्यांचे भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजे एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यावर डोंगर धारेवरून जाण्यासारखी परिस्थिती या भागात नाही. येथील किल्ल्यांची सरासरी उंची कमीच आहे. अजिंक्यताऱ्याची उंची साधारणतः ३०० मीटर असून ती दक्षिणोत्तर ६०० मीटर आहे.

अजिंक्यतारा किल्ल्याचा इतिहास


साताराचा किल्ला (अजिंक्यतारा ) म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी. पहिली राजगड मग रायगड, जिंजी आणि चौथी अजिंक्यतारा, साताऱ्याचा किल्ला हा शिलाहार वंशीय भोज (दुसरा) याने इ.स. ११९० मध्ये बांधला. पुढे हा किल्ला बहामनी सत्तेकडे आणि मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. इ.स. १५८० मध्ये पहिल्या आदिलशहाची पत्नी चांदबिबी येथे कैदेत होती. बजाजी निंबाळकर सुद्धा या ठिकणी तुरुंगात होते. शिवराज्याचा विस्तार होत असतांना २७ जुलै १६७३ मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांच्या हाती आला. या किल्ल्यावर शिवरायांना अंगी ज्वर आल्याने दोन महिने विश्रांती घ्यावी लागली. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर १६८२ मध्ये औरंगजेब महाराष्ट्रात शिरला.

इ.स. १६९९ रोजी औरंगजेबाने साताऱ्याच्या दुर्गाला वेढा घातला. त्यावेळी गडावरचा किल्लेदार प्रयागजी प्रभू होते. १३ एप्रील १७०० च्या पहाटे मोगलांनी सुरंग लावण्यासाठी दोन भुयारे खणली आणि बत्ती देताच क्षणभरातच मंगळाईचा बुरूज आकाशात भिरकावला गेला. तटावरील काही मराठे दगावले. प्रयागजी प्रभू मोगलांवर ढासळला व दीडा हजार मोगल सैन्य मारले गेले. किल्ल्यावरील सर्व दाणागोटा व दारूगोळा संपला आणि २१ एप्रिल रोजी किल्ला सुभानजीने जिंकून घेतला. किल्ल्यावर मोगली निशाण फडकण्यास तब्बल साडेचार महिने लागले.

किल्ल्याचे नामकरण झाले आझमतारा, ताराराणीच्या सैन्याने पुन्हा किल्ला जिंकला व त्यांचे नामांतर केले अजिंक्यतारा! पन ताराराणीला काही हा किल्ला लाभला नाही. पुन्हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन झाला. मात्र १७०८ मध्ये शाहुने फितवून किल्ला घेतला आणि पेशव्याकडे हा किल्ला गेला. दुसऱ्या शाहुच्या निधनानंतर किल्ला ११ फेब्रुवारी १८१८ मध्ये इंग्रजांकडे गेला.

अजिंक्यतारा किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे


साताऱ्यातून ज्या मार्गाने आपण गडावा प्रवेश करतो त्या मार्गावर दोन दरवाजे आहेत. आजही या दोनदरवाजांपैकी पहिला दरवाजा सुस्थितीत आहे. दरवाजाचे दोन्हीबुरूज आज अस्तित्वात आहेत. दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे हनुमानाचे मंदिर आहे. हे मंदिर राहण्यास उत्तम आहे. मात्र गडावर पाण्याची सोय नाही. डावीकडे सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर वाटेत महादेवाचे मंदिर लागते. समोर प्रसारभारती केंद्राचे कार्यालय व मागे दोन प्रसार भारती केंद्राचे टॉवर्स आहेत. पुढे गेल्यावर एक डावीकडे जाणारी वाटा दिसते व ‘मंगळादेवी मंदिराकडे’ असे तिथे लिहिलेले आढळते. या वाटेत ताराबाई यांचा निवास असलेला पण आता ढासाळलेला राजवाडा तसेच कोठारही आहे. वाटेच्या शेवटी मंगळादेवीचे मंदिर लागते. मंदिराच्या समोरच मंगळाईचा बुरूज आहे.

मंदिराच्या आवारात अनेक शिल्प आढळतात. या वाटेने थेट तटबंदीच्या साह्याने पुढे जाणे म्हणजे गडाला प्रदक्षिणा घालण्यासारखेच आहे. गडाच्या उत्तरेला देखील दोन दरवाजे आहेत. तटबंदीवरून प्रदक्षिणा मारतांना नजरेस पडतात. या दरवाजात येणारी वाट सातारा-कराड हमरस्त्यावरून येते. दरवाजापाशी पाण्याचे तीन तलाव आहेत. उन्हाळ्यात कशातही पाणी नसते. गडाला प्रदक्षिणा घालून आल्यामार्गाने खाली उतरावे लागते. किल्ल्यावरून समोरच यवतेश्वराचे पठार, चंदनवंदन किल्ले, कल्याणगड, जरंडा आणि सज्जगड हा परिसर दिसतो. संपूर्ण गड बघण्यासाठी दीड तास लागतो.

अजिंक्यतारा गडावर जाण्याच्या वाटा


अजिंक्यतारा किल्ला सातारा शहरातच असल्याने शहरातून अनेक वाटांनी गडावर जाता येते. सातारा एस.टी. स्थानकावरून अदालत वाड्या मार्गे जाणारी कोणतीही गाडी पकडावी आणिअदालत वाड्यापाशी उत्रावे. सातारा ते राजवाडा असी बससेवा दर १० -१५ मिनिटाला उपलब्ध आहे. राजवाडा बस स्थानकापासून अदालत वाड्यापर्यंत येण्यास १० मिनिटे लागतात. अदालत वाड्याच्या बाजूने जाणाऱ्या थेट वाटेने आपण गडावर जाणाऱ्या गाडी रस्त्याला लागतो व येथून गाडी रस्त्याने १ कि.मी. चालत गेल्यावर आपण थेट दरवाज्यापाशी पोहचतो. अजिंक्यतारा किल्ल्यावर जाण्यासाठी थेट गाडी रस्ता सुद्धा आहे. या रस्त्याने आपण किल्ल्याच्या दरवाजापाशी पोहोचतो. कोणत्याही मार्गे गड गाठण्यास साधारण १ तास लागतो.
  • गडावरील हनुमानाच्या मंदिरात १० ते १५ जण राहू शकतात.
  • जेवणाची व्यवस्था आपणच स्वतः करावी.
  • उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात गडावर पिण्याचे पाणी नसल्याने पाणी सोबत घेऊन जावे.
  • गडावर जाण्यासाठी साताऱ्यापासून साधारणतः १ तास लागतो.



मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरील विविध विभागांत लेखन आणि संपादन.

अभिप्राय

ब्लॉगर
सामायिक करा


तुमच्यासाठी सुचवलेले संबंधित लेखन


नाव

अंधश्रद्धेच्या कविता,5,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,15,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,4,अनुराधा फाटक,36,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,1,अभिव्यक्ती,584,अमन मुंजेकर,6,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल सराफ,1,अलका खोले,1,अक्षरमंच,406,आईच्या कविता,15,आईस्क्रीम,3,आकाश भुरसे,8,आज,401,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,9,आतले-बाहेरचे,1,आत्मविश्वासाच्या कविता,5,आनंद दांदळे,6,आनंदाच्या कविता,20,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,12,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,80,आरोग्य,3,आशिष खरात-पाटील,1,इंद्रजित नाझरे,11,इसापनीती कथा,44,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,13,उमेश कुंभार,11,ऋग्वेदा विश्वासराव,2,ऋचा मुळे,13,ऋषिकेश शिरनाथ,2,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ओंकार चिटणीस,1,कपिल घोलप,5,कपील घोलप,2,करमणूक,40,कर्क मुलांची नावे,1,कविता शिंगोटे,1,कार्यक्रम,8,कालिंदी कवी,1,काव्य संग्रह,1,किल्ले,92,किल्ल्यांचे फोटो,4,किशोर चलाख,3,कुठेतरी-काहीतरी,2,कृष्णाच्या आरत्या,5,केदार कुबडे,41,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,कोशिंबीर सलाड रायते,11,कौशल इनामदार,1,खरगपूर,1,गणपतीच्या आरत्या,5,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गावाकडच्या कविता,7,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोड पदार्थ,31,घरचा वैद्य,2,घाट,1,चटण्या,1,जानेवारी,31,जीवनशैली,220,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,2,डिसेंबर,31,तरुणाईच्या कविता,2,तिच्या कविता,17,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,380,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,1,दिवाळी फराळ,9,दुःखाच्या कविता,52,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धोंडोपंत मानवतकर,7,निखिल पवार,1,निसर्ग कविता,10,नोव्हेंबर,30,न्याहारी,31,पंचांग,14,पथ्यकर पदार्थ,2,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,174,पावसाच्या कविता,16,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,6,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,8,पौष्टिक पदार्थ,14,प्रतिक्षा जोशी,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवासाच्या कविता,9,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिया महाडिक,6,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,59,प्रेरणादायी कविता,13,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,9,बातम्या,5,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,3,बालकविता,8,बालकवी,1,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बिपीनचंद्र नेवे,1,बेकिंग,3,भक्ती कविता,1,भाज्या,18,भाताचे प्रकार,9,भूमी जोशी,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,27,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी कथा,44,मराठी कविता,334,मराठी गझल,3,मराठी गाणी,2,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,10,मराठी टिव्ही,26,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,2,मराठी प्रेम कथा,4,मराठी भयकथा,39,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,20,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,2,मराठी सुविचार,2,मराठीमाती,375,मसाले,12,महाराष्ट्र,256,महाराष्ट्र फोटो,7,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,15,महालक्ष्मीच्या आरत्या,2,मांसाहारी पदार्थ,10,माझं मत,1,माझा बालमित्र,46,मातीतले कोहिनूर,10,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मुंबई,7,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,5,यशपाल कांबळे,1,यशवंत दंडगव्हाळ,16,यादव सिंगनजुडे,2,योगेश कर्डीले,1,रजनी जोगळेकर,3,राजकीय कविता,6,रामचंद्राच्या आरत्या,5,राहुल अहिरे,3,रेश्मा विशे,1,रोहित साठे,12,लता मंगेशकर,1,लक्ष्मण अहिरे,2,लोणची,7,वाळवणाचे पदार्थ,5,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,31,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,2,विवेक जोशी,1,विशेष,45,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वेदांत कोकड,1,वैभव सकुंडे,1,व्यंगचित्रे,9,व्हिडिओ,18,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,5,शारदा सावंत,4,शाळेच्या कविता,5,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,2,शुभम सुपने,1,शेतकर्‍याच्या कविता,4,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,8,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीनिवास खळे,1,संगीता अहिरे,1,संघर्षाच्या कविता,9,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकाराम,7,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,3,संतोष सेलुकर,1,संदेश ढगे,34,संपादकीय,4,संपादकीय व्यंगचित्रे,8,संस्कृती,120,सचिन पोटे,6,सचिन माळी,1,सण-उत्सव,12,सणासुदीचे पदार्थ,28,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,सरबते शीतपेये,8,सामाजिक कविता,44,सायली कुलकर्णी,3,साहित्य,1,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुरेश भट,1,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,2,सैरसपाटा,96,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,3,स्वाती खंदारे,167,स्वाती दळवी,6,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,35,हर्षदा जोशी,3,हर्षाली कर्वे,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,
ltr
item
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन: अजिंक्यतारा किल्ला
अजिंक्यतारा किल्ला
अजिंक्यतारा किल्ला - [Ajinkyatara Fort] ३०० मीटर उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. सातारा जिल्ह्यातील सातारा डोंगररांगेतील अजिंक्यतारा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.
https://3.bp.blogspot.com/-HsQT__1QIZE/XZlruaz-m9I/AAAAAAAAEb4/91SKzdmZzI0VWUVy8c9qoKoL9X0VbMVewCLcBGAsYHQ/s1600/ajinkyatara-fort.jpg
https://3.bp.blogspot.com/-HsQT__1QIZE/XZlruaz-m9I/AAAAAAAAEb4/91SKzdmZzI0VWUVy8c9qoKoL9X0VbMVewCLcBGAsYHQ/s72-c/ajinkyatara-fort.jpg
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2004/07/ajinkyatara-fort.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2004/07/ajinkyatara-fort.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ minutes ago १ तासापूर्वी $$1$$ hours ago काल $$1$$ days ago $$1$$ weeks ago ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy