Loading ...

एसएनडीटीत ‘अभिजात मराठीचा गौरव’ सोहळा

एसएनडीटी कला आणि एससीबी वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘अभिजात मराठीचा गौरव’ कार्यक्रमातून भाषा व संस्कृतीचा जागर.

एसएनडीटीत ‘अभिजात मराठीचा गौरव’ सोहळा

एस.एन.डी.टी. कला महाविद्यालय आणि एससीबी वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘अभिजात मराठीचा गौरव’ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…

एसएनडीटीत ‘अभिजात मराठीचा गौरव’ सोहळा

स्वाती खंदारे (मराठीमाती डॉट कॉमच्या सह-संपादिका आणि छायाचित्रकार)

ठळक मुद्दे
  • मुंबईतील एसएनडीटी कला महाविद्यालय आणि एससीबी वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न झाला.
  • मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. सुनील रामटेके यांनी मराठी भाषेचे सांस्कृतिक महत्त्व, समृद्ध परंपरा आणि अस्मितेवर मार्गदर्शन केले.
  • प्राचार्या आदिती सावंत यांनी विद्यार्थिनींना दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा अभिमानाने वापर करण्याचे आणि संवर्धनाचे आवाहन केले.
  • विद्यार्थिनींनी सादर केलेल्या मराठी कविता व पोवाड्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मुंबई: एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या एसएनडीटी कला महाविद्यालय आणि एससीबी वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अभिजात मराठीचा गौरव : भाषा, संस्कृती आणि अस्मिता’ या विषयावर विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सुनील रामटेके यांनी प्रमुख मार्गदर्शन करताना मराठी भाषेचे सांस्कृतिक महत्त्व, तिची समृद्ध परंपरा आणि भाषेच्या माध्यमातून जपली जाणारी सामाजिक व सांस्कृतिक अस्मिता यांविषयी महत्त्वपूर्ण विचार मांडले. महाविद्यालयाच्या प्राचार्या आदिती सावंत यांनी आपल्या मार्गदर्शनातून मराठी भाषेचे संवर्धन आणि जतन करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. विद्यार्थिनींनी दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा अभिमानाने वापर करावा, तसेच तिचे साहित्य, संस्कृती आणि परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींनी मराठी कविता आणि पोवाड्यांचे सादरीकरण करून मराठी भाषेची साहित्यिक समृद्धी आणि लोकसंस्कृतीचे बहारदार दर्शन घडविले. या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या प्रसंगी उपप्राचार्या प्रा. प्रज्ञा खैरमोडे, पर्यवेक्षक प्रा. अर्चना मेश्राम, माधुरी सुटे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिल्पा हुमे यांनी केले. मराठी भाषेचा गौरव, संवर्धन आणि सांस्कृतिक अस्मितेची जाणीव दृढ करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची