Loading ...

भुताटकी – भाग ९ (भयकथा) इंद्रजित नाझरे

भुताटकी – भाग ९ (भयकथा) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद लेखक इंद्रजित नाझरे यांची भुताटकी – भाग ९ ही मराठी भयकथा.

भुताटकी – भाग ९ (भयकथा) इंद्रजित नाझरे

प्लॅन्चेटच्या कुतूहलातून सुरू झालेला खेळ तीन मैत्रिणींना भय, भ्रम आणि जीवघेण्या अदृश्य शक्तींच्या विळख्यात अडकवतो...

भुताटकी – भाग ९

इंद्रजित नाझरे (इचलकरंजी, महाराष्ट्र)

या कथेत काय वाचाल

• काव्या, सीमा आणि दिव्या प्लॅन्चेट करून आत्म्यांना बोलावण्याचा प्रयत्न करतात आणि भयावह अनुभवांना सामोऱ्या जातात. • अचानक दिसणाऱ्या आकृत्या, विकृत आवाज आणि भयानक स्वप्नांमुळे त्यांचे आयुष्य अस्थिर होते. • मृत आत्म्यांचा पाठलाग आणि मानसिक भीती यामुळे त्या वास्तव आणि भ्रम यातील फरक ओळखू शकत नाहीत. • शेवटी श्रद्धेचा आधार घेत त्या संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात, पण भय अजून संपलेले नसते.

एक भयाण अनुभव…!


प्लॅन्चेट, भूत-प्रेत, अदृश्य शक्ती… या रहस्यमय गोष्टींमध्ये विशेष रस असलेली काव्या माथूर आणि तिच्या दोन मैत्रिणींना एका रात्री असा अनुभव येतो, जो त्यांच्या आयुष्याची दिशा बदलून टाकतो.

“ए काव्या, खरंच असं काही असतं का गं? मला तर भूत-प्रेत काही पटत नाही.” दिव्या कुजबुजली. “श्श्श… हळू बोल! नाहीतर भूत पळून जाईल,” सीमा चिडवत म्हणाली. “दोघी शांत बसा,” काव्या गंभीर स्वरात म्हणाली, “मी प्लॅन्चेटची तयारी केली आहे.” तिघीही खाली वर्तुळात बसल्या. चार मेणबत्या… मध्ये एक रुपया… त्यावर तिघींची बोटं… काव्या मंत्र पुटपुटू लागली. हळूहळू तो रुपया सरकू लागला. क्षणातच मेणबत्या विझल्या. सभोवती काळोख. अचानक एक विकृत, घोगरा आवाज— “मला इथे कोणी बोलावलं…?” तिघींचे अंग शहारले. दिव्या मोबाईलचा टॉर्च लावण्याचा प्रयत्न करते—मोबाईल बंद. लायटरच्या क्षीण प्रकाशात तिला एक काळा, भाजलेला चेहरा दिसतो. ती किंचाळते. आणि क्षणार्धात मेणबत्या पुन्हा पेटतात. दुसऱ्या दिवशी दिव्याला ताप येतो. तिला सतत तोच चेहरा दिसत राहतो. सीमा काव्याला फोन करते. काव्या मात्र हॉरर चित्रपटात गुंतलेली असते. दोघी दिव्याला भेटायला जातात. दिव्याची आई संतापलेली. दोघी कसाबसा बहाणा करून बाहेर पडतात. “काल खरंच काही आलं होतं का?” सीमा घाबरून विचारते. “आज पुन्हा प्लॅन्चेट करू,” काव्या ठामपणे म्हणते. त्या रात्री… काव्याच्या घराच्या टेरेसवर पुन्हा तयारी. मंत्र… शांतता… पण काहीच घडत नाही. थकून दोघी तिथेच झोपतात. सीमाला स्वप्न पडते. ती एका घनदाट जंगलात उभी आहे. समोर पाठ करून एक मुलगी. ती जवळ जाते. ती दिव्या असते—मृत अवस्थेत. “तुमच्यामुळे मी या अवस्थेत आहे,” ती भयावह आवाजात म्हणते. आणि सीमाच्या छातीत हात घालून तिचा आत्मा खेचून काढते. काव्यालाही स्वप्न पडते. ती कॅबमध्ये प्रवास करत असते. समोर दोन सावल्या. ती उतरायला ओरडते—कॅब थांबते. दोघे मागे वळतात— ते सीमा आणि दिव्याचे आत्मे. क्षणात ते तिचा गळा आवळतात. दोघी किंचाळत जाग्या होतात. घामाने निथळलेल्या. खाली धावत येतात. आरशात पांढऱ्या साडीतली स्त्री काव्याला दिसते. सीमाला स्वतःच्याच सावलीसोबत आणखी एक आकृती धावताना दिसते. त्या रात्री अनेक अदृश्य शक्ती त्यांना त्रास देतात. घरातून बाहेर पडतात. समोर काव्याचा भाऊ उभा. काव्या त्याच्या खांद्यावर हात ठेवते— त्याला धड नसते. दोघींच्या तोंडातून फेस येऊ लागतो. त्या धावत राहतात… पण जागा बदलत नाही. घर मागे धावत असल्याचा भास. समोर मारुती मंदिर दिसते. पाय जड झालेले. जणू एखादी अदृश्य शक्ती त्यांना रोखत आहे. दोघी मनात हनुमान चालीसा म्हणू लागतात. क्षणात पाय मोकळे होतात. त्या मंदिरात पोहोचतात… आणि तिथेच बेशुद्ध पडतात. सकाळी गावकरी आणि पोलिस त्यांना सापडतात. महिला पोलिस त्यांना शुद्धीवर आणतात. दोन आठवड्यांनी… दोघींना एक अनोळखी संदेश— “मी प्रेमात हरलेला आहे. गळफास घेतला होता. तुमच्या हाकेनं परत आलो आहे. तुम्ही माझ्या प्रेयसी व्हाल…” त्या बाहेर पाहतात—कोणीच नाही. खिडकी बंद करून मागे वळतात… त्यांच्या बेडवर एक मुलगा मान खाली घालून बसलेला असतो…

कथा पुढे सुरू राहील…

इंद्रजित नाझरे यांचे इतर लेखन वाचा:

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची