Loading ...

भुताटकी – भाग १० (भयकथा) इंद्रजित नाझरे

भुताटकी – भाग १० (भयकथा) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद लेखक इंद्रजित नाझरे यांची भुताटकी – भाग १० ही मराठी भयकथा.

भुताटकी – भाग १० (भयकथा) इंद्रजित नाझरे

महाशिवरात्रीच्या दिवशी कुलदैवत श्री काळभैरव यांच्या दर्शनासाठी निघालेल्या नवदांपत्याला सूडाने पेटलेल्या आत्म्याचा भयंकर सामना करावा लागतो...

भुताटकी – भाग १०

इंद्रजित नाझरे (इचलकरंजी, महाराष्ट्र)

या कथेत काय वाचाल

• गौरव आणि वैभवी कुलदैवताच्या दर्शनासाठी निघतात, पण प्रवासात अदृश्य शक्ती त्यांचा पाठलाग करू लागतात. • अपघात, अंधार, कावळ्यांचा हल्ला आणि मृत मुलाच्या प्रेताचे भयावह दर्शन त्यांना हादरवून टाकते. • सूडाने पछाडलेला आरवचा आत्मा वैभवीला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. • मात्र मंदिरातील दिव्य शक्ती आणि श्री काळभैरव यांच्या दंडप्रहाराने त्या आत्म्याला मोक्ष मिळतो आणि अंधार कायमचा नाहीसा होतो.

भुताटकी या मालिकेतील अंतिम भाग


महाशिवरात्रीच्या निमित्ताने गौरव आणि वैभवी आपल्या कुलदैवत श्री काळभैरवनाथ यांच्या दर्शनासाठी नजीकच्या गावाकडे निघाले. नुकताच त्यांचा विवाह झाला होता. नव्या आयुष्याची सुरुवात देवाच्या आशीर्वादाने करावी, या भावनेने दोघे प्रवासाला निघाले. कुलदैवताचे गाव त्यांच्या गावापासून साधारण ३०० किमी अंतरावर होते. गौरव स्वतः गाडी चालवत होता. नवविवाहित जोडपे असल्याने दोघांमध्ये लाजरे, गोड वातावरण होते. गाडीचा गिअर बदलताना गौरवचा हात नकळत वैभवीच्या हाताला स्पर्श करत होता आणि ती लाजून हसत होती. “आपण आधी चांगले मित्र बनू, मग नवरा-बायको,” गौरव म्हणाला. वैभवीने हलकेच मान डोलावली. सुमारे ५० किमी प्रवास केल्यानंतर त्यांनी एका हॉटेलमध्ये चहा-नाश्ता घेतला. पुन्हा प्रवास सुरू झाला. अचानक त्यांच्या गाडीवरून जणू एखादी अदृश्य सावली सरकली. दोघांनी एकमेकांकडे पाहिले — कदाचित भास असेल, असे मानून त्यांनी दुर्लक्ष केले. सायंकाळ झाली होती. अजून १५० किमी प्रवास बाकी होता. म्हणून त्यांनी एका लॉजमध्ये मुक्काम करण्याचे ठरवले. रात्री बेडरूममध्ये गौरव वैभवीशी गप्पा मारत बसला होता. “मी खूप नशीबवान आहे, मला तुझ्यासारखी सुंदर पत्नी मिळाली,” तो म्हणाला. इतक्यात वॉशरूमचा दरवाजा अचानक आपोआप उघडला. गौरव दचकलाच. वैभवी तर वॉशरूममध्ये होती… मग बेडवर त्याच्या शेजारी कोण बसले होते? क्षणात ती आकृती नाहीशी झाली. गौरवच्या अंगावर काटा आला. त्याने काहीच न बोलता ती रात्र काढली. सकाळी त्यांनी पुढचा प्रवास सुरू केला. वैभवी शांतपणे स्मित करत होती. अचानक तिला रस्त्यात एक अक्राळविक्राळ पुरुष उभा दिसला. ती किंचाळली. गौरवने जोरात ब्रेक मारला. गाडी स्लीप झाली आणि अपघात झाला. दोघांनाही दुखापत झाली. रस्ता निर्मनुष्य. फोनला रेंज नव्हती. अचानक आकाश काळवंडले. दुपार असूनही काळोख पसरला. ते मदतीसाठी चालू लागले. मागे कोणीतरी येत असल्याची जाणीव होत होती, पण मागे पाहिल्यावर कोणीच नव्हते. अचानक काळ्या अवकाशातून कावळ्यांचा थवा त्यांच्यावर झेपावला. ते घाबरून धावत सुटले. धावताना वैभवी खाली कोसळली. तिच्या डोक्याला मार लागून रक्त वाहू लागले. गौरवने तिला उचलले. पाऊस सुरू झाला. समोर एक जुनी झोपडी दिसली. तो तिला आत घेऊन गेला. झोपडी ओसाड होती. मागील भिंतीवरून एक मोठा साप खाली उतरत होता — थेट वैभवीच्या दिशेने! पण ती जागी झाली आणि दोघे कसाबसा बाहेर पडले. गौरवने तिच्या जखमेवर कापड बांधले. वैभवी अशक्त झाली होती. तिला तहान लागली. गौरव तिला एका झाडाखाली बसवून पाणी आणायला गेला. काही मिनिटांत तो परत आला. तिने पाणी घेतले आणि त्याच्या खांद्यावर डोके टेकवले. पण अचानक तिला कुबट दुर्गंधीचा वास आला. तिने वर पाहिले… तिच्या शेजारी गौरव नव्हता. एका अपघातात मृत झालेल्या मुलाचे विद्रूप प्रेत तिच्याकडे डोळे वटारून पाहत होते! ती किंचाळत उठली आणि गौरवला शोधू लागली. अचानक गौरव तिच्यासमोर आला. तिने घाबरत सर्व सांगितले. इतक्यात झाडावर हालचाल झाली. वर पाहिले तर तेच प्रेत झाडावर बसून त्यांच्याकडे रोखून पाहत होते. दोघे धावत सुटले. ते प्रेत अक्राळविक्राळ आवाज करत त्यांच्या मागे लागले. काही क्षणातच त्याने झडप घालून गौरवला दूर फेकले आणि वैभवीला पकडले. तेवढ्यात गौरवला समोर झाकलेले श्री काळभैरवांचे मंदिर दिसले. त्याने संपूर्ण ताकद लावून मंदिराचे दरवाजे उघडले. आतून तेजस्वी प्रकाश उसळला. त्या दिव्य प्रकाशकिरणांनी प्रेताच्या पाठीवर प्रहार केला. ते वेदनेने किंचाळले. वैभवी त्याच्या हातातून खाली पडली. मंदिरातील श्री काळभैरवांच्या हातातील दंड जणू सजीव झाला. तो वेगाने प्रेताच्या दिशेने झेपावला आणि एका प्रहारात त्याला भस्मसात केले. क्षणात आकाश उजळले. सूर्यकिरणे पसरली. मंदिरात घंटानाद घुमू लागला. भय नाहीसे झाले. गौरव आणि वैभवीने श्री काळभैरवनाथांचे दर्शन घेतले. मंदिराबाहेर आले तर त्यांची गाडी व्यवस्थित उभी होती — जणू काहीच घडले नव्हते. दोघे समाधानाने परतीच्या प्रवासाला निघाले. ते प्रेत आरवचे होते — ज्याचे वैभवीवर एकतर्फी प्रेम होते. तिच्या लग्नाच्या दिवशी त्याने आत्महत्या केली होती. सूडाने पछाडलेला त्याचा आत्मा अखेर दैवी शक्तीसमोर शांत झाला. श्रद्धेच्या प्रकाशात त्याला मोक्ष मिळाला. भुताटकी – मालिका समाप्त.

इंद्रजित नाझरे यांचे इतर लेखन वाचा:

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची