Loading ...
/* Dont copy */

भुताटकी – भाग ४ (भयकथा) इंद्रजित नाझरे

भुताटकी – भाग ४ (भयकथा) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद लेखक इंद्रजित नाझरे यांची भुताटकी – भाग ४ ही मराठी भयकथा.

भुताटकी – भाग ४ (भयकथा) इंद्रजित नाझरे

घर बदललं तरी अदृश्य भय माणसाचा पाठलाग सोडत नाही, हेच झपाटलेले घर उघड करतं...

भुताटकी – भाग ४

इंद्रजित नाझरे (इचलकरंजी, महाराष्ट्र)


स्वतःचं घर असावं या स्वप्नामागे लागलेला तरुण नकळत एका शापित जागेच्या सावटाखाली येतो. घर बदललं तरी भय पाठ सोडत नाही, कारण काही अदृश्य शक्ती माणसाच्या आयुष्यात घराच्या भिंतींपेक्षा खोलवर शिरतात. भुताटकी – भाग ४ / झपाटलेले घर ही कथा वास्तव आणि भ्रम यांच्या सीमारेषा पुसून टाकणारा थरार उलगडते.

विश्वजीत बोरवणकर आपल्या आई-वडिलांसोबत भाड्याच्या घरात राहत होता. तो त्यांचा एकुलता एक मुलगा.

त्यांचं स्वतःचं घर होतं, पण बँक आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचक अटींमुळे ते विकावं लागलं. आता विश्वजीतचं लग्नाचं वय झालं होतं.

पण लग्नासाठी एक अट ठाम होती— स्वतःचं घर.

म्हणून विश्वजीत आणि त्याचे आई-वडील घर शोधू लागले.

विश्वजीत बँकेत नोकरी करत होता. त्याने होम लोनसाठी अर्जही दाखल केला होता.

योगायोगाने एका खेडेगावातील घर त्यांना पसंत पडलं. कर्जप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ते घर गहाणवट घेण्याचं ठरलं.

मालक—तारदाळकर— गहाणवट देण्यास सुरुवातीला उदासीन होता.

शेवटी कसाबसा तयार झाला. दहा हजार रुपये आगाऊ देऊन व्यवहार सुरू झाला.

विश्वजीत आणि त्याची आई आनंदाने फुलून गेले. घरी येऊन विश्वजीतने वडिलांना बातमी सांगितली.

दिवस सरकत गेले.

पावसाळा सुरू झाला. सगळीकडे पाणीच पाणी.

एका दिवशी विश्वजीत लवकर काम आटोपून त्या घराकडे निघाला. त्या दिवशी मुसळधार पाऊस पडत होता.

घराची चावी शेजारच्या घरात ठेवलेली होती. विश्वजीत तिथे गेला.

दोनदा हाक मारली. कोणीच बाहेर आलं नाही.

तो मोबाईल काढणार इतक्यात—

अचानक एक पंच्याहत्तर वर्षांचा आजोबा त्याच्या समोर उभे राहिले.

विश्वजीत दचकला.

आजोबांनी शांतपणे चावी पुढे केली. विश्वजीतने चावी घेतली.

आजोबा काहीही न बोलता हळूहळू आत निघून गेले.

विश्वजीत गोंधळला. तो गहाणवट घराचं दार उघडून आत गेला.

घरात गडद अंधार होता.

तो किचनमध्ये गेला. नव्या घराची स्वप्नं डोळ्यांसमोर तरळत होती.

बाहेर पावसाचा जोर वाढत होता.

लघुशंकेसाठी तो बाथरूममध्ये गेला. खिडकीजवळ एक काळीकुट्ट पाल— पांढरे डोळे चमकवत सरसर निसटून गेली.

तो पुन्हा किचनमध्ये आला.

तेवढ्यात त्याला जाणवू लागलं— कोणीतरी अगदी त्याच्या पावलांवर पाऊल ठेवत त्याच्या मागे येत आहे.

तो दुर्लक्ष करतो.

बाहेर निघण्यासाठी उंबरठ्यापाशी येतो. पाऊल टाकणार—

तोच त्याला आपल्या मागे पांढऱ्या कपड्यातली बुटकी बाई दिसते.

लांबसडक केस. मोठाले डोळे. एकटक त्याच्याकडे पाहणारी.

विश्वजीत दचकून मागे फिरतो—

मागे कोणीच नसतं.

आता मात्र तो सावध होतो.

पूर्ण आत्मविश्वास गोळा करून तो पुन्हा किचनमध्ये जातो.

“इथे कुणीतरी आहे… माझ्या मागेमागे फिरत आहे...”

तो मोठा श्वास घेतो.

“हर हर महादेव… ॐ नमः शिवाय...”

मंत्र म्हणत तो ताबडतोब घराबाहेर पडतो.

चावी शेजाऱ्याकडे ठेवून तो घरी परततो.

घडलेला प्रकार तो कुणालाही सांगत नाही.

शेवटी त्या घराचा व्यवहार रद्द होतो.

काही दिवसांनी विश्वजीत एका अपार्टमेंटमध्ये फ्लॅट खरेदी करतो.

सहकुटुंब तिथे राहायला जातो.

एका रात्री—

विश्वजीत हॉलमध्ये गाढ झोपलेला असतो. आई-वडील आतल्या खोलीत झोपलेले असतात.

अचानक आई-वडिलांच्या आवाजात कोणीतरी गप्पा मारत असल्याचा आवाज येतो.

तो जागा होतो.

आई-वडिलांच्या खोलीत जातो—

ते शांत झोपलेले.

तो पुन्हा हॉलमध्ये येतो.

आणि—

त्याच्या बिछान्यावर आई-वडील बसलेले.

एकमेकांना टाळ्या देत गप्पा मारत...

हे दृश्य पाहताच विश्वजीतला चक्कर येते.

तो तिथल्यातिथे खाली कोसळतो...

भुताटकी – भाग ४ क्रमशः

इंद्रजित नाझरे यांचे इतर लेखन वाचा:

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची