Loading ...
/* Dont copy */

रॉकेट बॉईज - मराठी लेख (राहुल बोर्डे)

रॉकेट बॉईज (मराठी लेख) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद लेखक राहुल बोर्डे यांचा ‘रॉकेट बॉईज’ हा मराठी लेख.

रॉकेट बॉईज - मराठी लेख (राहुल बोर्डे)

भारतीय चित्रपट सृष्टी हे मनोरंजनाचे एक खुप मोठे साधन आहे...

रॉकेट बॉईज

राहुल बोर्डे (पुणे, महाराष्ट्र)

भारतीय चित्रपट सृष्टी हे मनोरंजनाचे एक खुप मोठे साधन आहे. गेल्या काही वर्षात या मनोरंजनाच्या साधनात OTT प्लॅटफॉर्मने अधिक भर घातली आहे. तासनतास खिळवून ठेवणाऱ्या रोमांचकारी वेब सिरीजने अनेकांना OTT प्लॅटफॉर्मचे अक्षरशः व्यसन लावले आहे. पण राजकारण, गुन्हेगारी जगत, मारधाड, अश्लीलता, कंबरे खालील भाषा या सर्वांचा आता मात्र OTT प्लॅटफॉर्मवर अतिरेक होऊ लागला आहे. या गोष्टीं शिवाय वेब सिरीजचे निर्माण होऊच शकत नाही अशी अनेक प्रेक्षकांची आता धारणा बनत आहे.

दुर्दैवाने वैज्ञानिक किंवा विज्ञानावर आधारित चित्रपट/वेब सिरीज आजही अगदी अभावानेच सापडतात. असे नाही की भारतीय चित्रपट सृष्टीत वैज्ञानिकांवर आधारित चित्रपट किंवा वेब सिरीज निर्माण झाल्या नाही मात्र त्यांची संख्या बोटावर मोजण्या एवढीच आहे. नुकतेच SONY LIV या OTT प्लॅटफॉर्म वर रॉकेट बॉईज ही वेब सिरीज बघण्याचा योग आला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय महान वैज्ञानिकांचे वैयक्तिक आयुष्य आणि वैज्ञानिक प्रयोगावर आधारित ही वेब सिरीज आधारित आहे.

हाडा मांसाचेच शरीर असलेल्या महान वैज्ञानिकांच्या मनातही भावनांचा हलकल्लोळ निर्माण होऊ शकतो याचे फारच उत्तम दर्शन या वेब सिरीज मध्ये घडते. ज्या देशात अगदी पायाभूत सुविधांची वाणवा आहे त्या देशात भविष्याच्या वैज्ञानिक प्रगतीचा वेध घेणारी महागडी स्वप्ने प्रत्यक्षात खरे करून दाखवणाऱ्या डॉक्टर होमी भाभा, विक्रम साराभाई, एपीजे अब्दुल कलाम यांच्या कार्याचे फारच उत्तम दर्शन या वेब सिरीज मध्ये बघायला मिळते. वैयक्तिक आयुष्यातील भावनिक समस्यांना देशाप्रती मनात असलेल्या वैज्ञानिक ध्येयांवर कसे आरूढ न होऊ देणे हे शिकावे ते या महान वैज्ञानिकांकडून.

अणुऊर्जा आणि अणु बॉम्बची निर्मिती हे डॉक्टर होमी भाभा यांचे स्वप्न होते. अवकाश संशोधनात भारताला श्रेष्ठ स्थान प्राप्त करून देणे हे विक्रम साराभाईंचे स्वप्न होते. स्वदेशी रॉकेट निर्मिती हे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे स्वप्न होते. जिथे अन्न, पाणी, वीज सारख्या पायाभूत सुविधा या देशात नाही तिथे इतर संशोधनाचा भारता सारख्या देशाला काय फायदा असा विचार करणारी भोळी जनता त्याकाळी या देशात कोट्यावधीच्या संख्येने होती. मात्र वैज्ञानिक प्रगतीचे सर्व फायदे त्याच पिढीला मिळतील असे जरुरी नसते. एका पिढीने वैज्ञानिक प्रगतीचा एक टप्पा गाठला तर पुढील पिढीने दुसरा टप्पा गाठायचा असतो. सामान्य जनतेला या गोष्टी डॉक्टर होमी भाभा, विक्रम साराभाई यांनी नेमक्या कशाप्रकारे समजून सांगितल्या याचे रॉकेट बॉईज वेब सिरीज मध्ये फार उत्तम प्रकारे सादरीकरण केले आहे.

विशेष म्हणजे अणुऊर्जा, अवकाश संशोधन, रॉकेटची निर्मिती या वैज्ञानिक प्रयोगांमधील तांत्रिक बाबी अतिशय क्लिष्ट असतात. सर्वसामान्य जनतेला या संशोधनाचे फायदे लक्षात येतातच असे नाही. मात्र दिग्दर्शकाने उच्च तंत्रज्ञानातील तांत्रिक बाबीही अगदी साध्या उदाहरणासह योग्य पद्धतीने समजुन सांगितल्या आहेत. चित्रपट/वेब सिरीज निर्मिती करताना फक्त वैज्ञानिक विषय निवडणे पुरेसे नसते. प्रेक्षकांना विषय लक्षात येईल या पद्धतीने विषयाचे सादरीकरण देखील महत्त्वाचे असते. या उत्तम सादरीकरणासाठी रॉकेट बॉईज च्या दिग्दर्शकाला १० पैकी १० मार्क दिले पाहिजे.

भारतीय चित्रपट सृष्टी वैज्ञानिक प्रयोगांवर आधारित विषयांना हात घालत आहे याचे आवर्जुन स्वागत केले पाहिजे. यासाठी प्रेक्षकांचाही अशा वेब सिरीज किंवा चित्रपटांना उत्तम प्रतिसाद मिळणे गरजेचे असते. आपणही ही वेब सिरीज बघण्याचा नक्की प्रयत्न करावा. मुलांमध्ये वैज्ञानिक रुची निर्माण करण्यासाठी शक्य झाले तर त्यांना देखील ही वेब सिरीज अवश्य दाखवावी. मी एक गोष्ट परत नमूद करतो की एका पिढीने केलेल्या संशोधनाचे फायदे पुढील अनेक पिढ्यांना मिळत असतात. डॉक्टर होमी भाभा यांचे संशोधन थांबले असते तर आज देश अण्वस्त्र संपन्न झाला असता का? विक्रम साराभाई यांचे अवकाश संशोधन थांबले असते तर भारत देश मंगळ ग्रहापर्यंत पोहोचला असता का? एपीजे अब्दुल कलाम यांचे रॉकेट आणि मिसाईल विकसित करण्याचे संशोधन थांबले असते तर आज ब्रह्मोस मिसाईलचे पराक्रम भारतीयांना बघायला मिळाले असते का?

राहुल बोर्डे यांचे इतर लेखन वाचा:

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची