Loading ...
/* Dont copy */

गुच्छ फुलांचे निरिच्छ - मराठी कविता (आरती प्रभू)

गुच्छ फुलांचे निरिच्छ - मराठी कविता (आरती प्रभू) - ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी आरती प्रभू यांची गुच्छ फुलांचे निरिच्छ ही लोकप्रिय मराठी कविता.

गुच्छ फुलांचे निरिच्छ - मराठी कविता (आरती प्रभू)

हजार मोरांचेच पिसारे, अंधारच की सगळा...

गुच्छ फुलांचे निरिच्छ

आरती प्रभू (चिंतामणी त्र्यंबक खानोलकर. ज्येष्ठ मराठी कवी आणि लेखक)

आरती प्रभू यांच्या ‘नक्षत्रांचे देणे’ या कवितासंग्रहातून.

हजार मोरांचेच पिसारे: अंधारच की सगळा: अंधारच सहवास तिचा तो एकदाच जो घडला. नुक्तिच उठली नक्षत्रांतुन आळसलेली दृष्टी, अवघड झाला हृदयाइतुका पदर तिचा जो ढळला: पोक्त पिकेसे विसावलेले वारे पदरावरती चाळवले अन् पुन्हा थबकले, झाले कोमट गवती; दिसूं लागले संगमर्मरी पाषाणांतिल स्पंद, मिनिटामिनिटांमधले लोलक हळूच अन् किणकिणती. क्षितिजी उतरे गारगारसा मेघखंड जडशीळ: आयुष्यांतुन पसरे कडवट चव त्याची घननीळ; नव्या जन्मल्या मातीसम अन् जड नेत्रांची पातीं, काचेवर अन् उठे त्वचेच्या हंसांचा स्वरमेळ. काळ्या पोशाखांतिल उल्का झिणझिण तुटली गात्री, त्या मद्याच्या क्षणार्थ आला निरभ्र आशय पात्रीं; गुच्छ फुलांचे निरिच्छ घळले वसनावरुनी काळ्या, पाठमोरिं मग कितीक झाली नक्षत्रे त्या रात्री... हजार मोरांचेच पिसारे अंधारावर आले, वेढुन आले तिच्याच देहा तिच्याच देही मिटले.

आरती प्रभू यांच्या इतर प्रसिद्ध कविता:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची