Loading ...
/* Dont copy */

बासरीचे शेवटचे सूर - मराठी लघुकथा (अभिजीत रणशिंगे)

बासरीचे शेवटचे सूर (मराठी लघुकथा) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद लेखक अभिजीत रणशिंगे यांची बासरीचे शेवटचे सूर ही मराठी लघुकथा.

बासरीचे शेवटचे सूर - मराठी लघुकथा (अभिजीत रणशिंगे)

जेव्हा गंगेच्या लाटांमध्ये हरवतात कृष्णाच्या बासरीचे शेवटचे सूर...

बासरीचे शेवटचे सूर

अभिजीत रणशिंगे (महाराष्ट्र, भारत)

कालच इंद्रप्रस्थाचा महायज्ञ पार पडला होता. सभोवताली सर्वत्र हर्षोल्हासाचा माहोल होता. पांडवांचे साम्राज्य वाढणार, प्रजेवर आनंदाची बरसात होणार आणि कौरव - पांडव एकत्र आले म्हणून पितामह भीष्म व गुरु द्रोणाचार्य अभिमानाने उन्नत झाले होते.

पण त्या मंगलक्षणाच्या दुसऱ्याच दिवशी प्रभातकाळी कृष्णाच्या मनात मात्र एक अनामिक उदासी दाटून आली होती. चिमण्यांचा चिवचिवाटही मनाला सुखावला नाही, गुरांचे हंबरणेही निरस वाटले. काहीतरी अशुभ घडण्याच्या छायेत तो हरवला होता आणि कित्येक वर्षांपूर्वी राधेच्या इच्छेखातर सोडून दिलेली बासरी आज पुन्हा हातात यावी असे त्याला वाटले.

तो गंगेच्या तीरावर एकटा बसून स्वर छेडत होता.

अचानक मागून अर्जुनचा आवाज आला -
“कृष्णा! अरे तू इथे आहेस? पितामहांनी तुझी दोनदा चौकशी केली. सारेजण तुला महालात शोधत आहेत आणि तू मात्र इथे बासरीत गुंतलास!”

कृष्णाने मंद स्मित केले.
“अर्जुना, आज माझी महालात जाण्याची इच्छा नाही. मला या गंगेच्या तीरावर एकांत हवा आहे.”

“पण माधवा, काही चुकीचे झाले का? की कालच्या मयसभेत दुर्योधनाचा अपमान तुला खटकतोय?”

कृष्णाचे डोळे दूरवर नदीच्या प्रवाहात हरवले.
“नाही अर्जुना… तसं काही नाही. फक्त आज मला या बासरीसोबत एकांत हवा आहे.”

अर्जुन दचकला.
“बासरी? पण ही तर तू केव्हाच सोडून दिली होतीस! मग आज ती कुठून आली?”

कृष्णाचा आवाज आता भारावलेला होता—
“ही बासरी कधीच माझ्यापासून दूर नव्हती. मीच तिला दूर सारले होते. पण आज… राधेच्या आठवणींनी ती पुन्हा हातात घेतली.”

“राधेच्या?” अर्जुन आश्चर्यचकित झाला. “गोकुळ सोडल्यानंतर तू कधीच तिचे नाव घेतले नाहीस आणि आज अचानक?”

कृष्णाच्या नजरेत गहिवर होता.
“हो अर्जुना, गोकुळ सोडण्यापूर्वी राधेने माझ्याकडून एक वचन घेतले होते. तिला ठाऊक होते - कृष्ण राधेशिवाय अपूर्ण आहे, तरीही आमचा विवाह कधीच होणार नाही. विवाह दोन जीवांमध्ये होतो; पण मी आणि राधा… आम्ही तर एकच होतो. म्हणून तिने माझ्याकडून फक्त एकच मागणी केली - ‘माझ्या अंतिम क्षणी मला तुझ्या बासरीचे सूर ऐकायला मिळावेत’…”

क्षणभर शांतता दाटली. मग कृष्णाने ती बासरी उचलली. स्वरांच्या अखेरच्या लहरी गंगेच्या काठावर दुमदुमल्या. पुढच्याच क्षणी त्याने ती बासरी नदीच्या प्रवाहात विसर्जित केली.

लाटांमध्ये बासरी हरवली आणि कृष्ण… निःशब्दपणे महालाच्या दिशेने निघून गेला.


टीप: सदर मराठी लघुकथा ही मराठीमाती डॉट कॉम च्या संपादक मंडळाद्वारे आवश्यकतेनुसार संपादित करण्यात आली आहे.


अभिजीत रणशिंगे यांचे इतर लेखन वाचा:

अभिप्राय

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची