Loading ...

वाट पाहतो द्वारकेचा राजा - मराठी कविता (आदर्श कामिरे)

वाट पाहतो द्वारकेचा राजा (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी आदर्श कामिरे यांची वाट पाहतो द्वारकेचा राजा ही मराठी कविता.

वाट पाहतो द्वारकेचा राजा - मराठी कविता (आदर्श कामिरे)

वाट पाहतो पाहतो हा द्वारकेचा राजा, भेटण्या त्यासं निघाल्या ध्वजा...

वाट पाहतो द्वारकेचा राजा

आदर्श कामिरे (महाराष्ट्र, भारत)

वाट पाहतो पाहतो हा द्वारकेचा राजा भेटण्या त्यासं निघाल्या ध्वजा... ॥ धृ ॥ निरागस डोळे त्याचे बोलती फार गाई गीत भक्तांच्या मुक्तीचे सार तोची विठू पाठीराखा आहे आमुचा सखा दिसे सृष्टी सारी त्याच्या नजरेत अबोल विठोबा, दु:ख पुसे शांततेत म्हणे, तोची एक आपूला माझा वाट पाहतो पाहतो हा द्वारकेचा राजा भेटण्या त्यासं निघाल्या ध्वजा... ॥ १ ॥ वारकऱ्यांचे पाय थकणे विसरले संगतीन नामाच्या बोलन्यास गहिवरले असे शक्तिदाता तू, करी दुष्टांचा अंत मित्र म्हणे तुला मी, पंढरी माझे माहेर तुझ्या अस्तित्वाचा झरा शोभे भक्तांच्या मनाला विठ्ठल आहे लोभे उभा दारावरी विठु घेऊनी ध्वजा वाट पाहतो पाहतो हा द्वारकेचा राजा भेटण्या त्यासं निघाल्या ध्वजा... ॥ २ ॥ तुलशी आहे डोईवरी भगवा धरी खांदयावरी डोळे असुसलेले माझे, जाहले कारण रे पंढरी टाळ मृदंगाचा स्वर, नाचे वीठू घरोघर वैष्णवांच्या घोळक्यांमध्ये तू उभा पांडुरंग प्रफुल्लित मन माझे, होई तुझे हे अभंग हरी नामाचा गजर करे मला रे दंग डोळे आसुसले तयाचे करती गाजावाजा वाट पाहतो पाहतो हा द्वारकेचा राजा भेटण्या त्यासं निघाल्या ध्वजा... ॥ ३ ॥ कंबरेवर हाथ तुझे भक्तावर नजर रुक्मिणीची साथ तुला, विठ्ठल नामाचा भजन तुझ्या पंढरीत वास्तव्य तुझे गळ्यात वारकऱ्यांच्या वीठू नावचं आहे गाजे नाही जवळ रे तु माझ्या, होई वीठू तू राजा वाट पाहतो पाहतो हा द्वारकेचा राजा भेटण्या त्यासं निघाल्या ध्वजा... ॥ ४ ॥

आदर्श कामिरे यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची