Loading ...
/* Dont copy */

आधार - मराठी कविता (आरती प्रभू)

आधार - मराठी कविता (आरती प्रभू) - ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी आरती प्रभू यांची आधार ही लोकप्रिय मराठी कविता.

आधार - मराठी कविता (आरती प्रभू)

जोवर फुलांच्या बागा फुलताहेत, पहाडामागे वारा अडत नाही...

आधार

आरती प्रभू (चिंतामणी त्र्यंबक खानोलकर. ज्येष्ठ मराठी कवी आणि लेखक)

आरती प्रभू यांच्या ‘नक्षत्रांचे देणे’ या कवितासंग्रहातून.

जोवर फुलांच्या बागा फुलताहेत, पहाडामागे वारा अडत नाही, शब्दांपोटी सूर्योदयासारखा अर्थ आहे, फळे नित्यनेमाने पिकत आहेत, माणसाला उपकार आणि त्याची निज फेड करतां येत आहे, एखाद्याची महायात्रा पाहून एखादा सहजच नमस्कार करतो आहे तोवर आम्हांला एकमेकांबरोबर अबोला धरण्याचा अधिकार नाही. आम्ही आमच्या पडजिभेइतकेच सर्वानी एकमेकांचे आहोत. कालाचा प्रत्येक क्षण उष्टावतों तरी काल ताजा टवटवीत आहे. ईश्वराने दिलेलें हैं अंग प्रत्येकजण बारा दिवसांच्या अर्भकाइतक्याच हळुवारपणे सर्व तहांनी धूत राहतो, आपापल्या मापाचें पापपुण्य बेतून सगळे आयुष्य कारणी लावतो म्हणून कधीतरीची प्रसन्नताहि मनाची उन्हें करते आणि सारा ताप उन्हांतला पाऊस होऊन टपटपतो. धरेच्या पोटांत पाणी आहे, घशाखाली त्याची तहान आहे, माणसाच्या पोटात आनंद आहे म्हणूनच नेहमी भूक लागते, इंद्रियाची वेल पसरत पसरत झोपेचा गारेगार मोगरा फुलतो. शेतकरी पिकाला जपत असतो पहिलटकरणीसारखा, रात्रंदिवस कायावाचामनाचा पावसाळा करून मातीच्या कणाकणांतून झिरपतो, अशा वेळी आकाशाच्या कोनन् कोन्याचा स्पर्श त्याला झुळकाझुळकांतून होतो, हवेचेही कोनेकोपरे प्रत्यक्ष चाचपतो... दाण्यादाण्यांतील धारोष्ण दुधाची जाग पाखरांच्या पिसापिसांतून जाते, थव्याथव्यांनी आनंद उतरतो, शेतमळा डुलतो, वारा डुलतो, शेताचा पिका पिका दरवळ झुळझुळत्या झऱ्यासारखा शेतकऱ्याच्या मनांतून वाहतो, सुइणीच्या मुखावरील कष्टासारखी रसरसून लखाखते कोयतीची धार. जीवनावर प्रेम करणारे सगळेजण एकमेकांना नमस्कार करीत करीत सुखदुःख वाटतात जिवाभावाने, सर्वांना पोटाशी धरून सर्वांवर स्वतःच्या आयुष्याची सावली धरतात, एखादा अनवाणी चालणारा विरक्त पाहून सांगतात: सर्वांच्या पायतळी जमीन आहे, एखाद्या मेलेल्या मित्राच्या स्मृतीवर हलकेच कधीतरी अमोल क्षणांचा एखादा ताटवा वाहून रात्रभर जागतात, आणि मग कधीतरी झोपेतून उठून स्वतःवरच आनंदाश्रू ढाळतात, स्वतःलाच नमस्कार करतात. सखीने सजणाला दिलेल्या गुलाबाच्या गेंदाप्रमाणे, वचनाप्रमाणे प्रत्येकानेच कधीतरी मन दिलें घेतलेलें असतें; सखी सजणाच्या संकेतस्थलासारखेंच हें आयुष्यहि एकमेकांचेच आहे. या जगण्यांत खोल बुडी मारून आलेला एखादा कोणी सर्वांना पोटाशी धरणारा आणि ते पोटाशी घरले गेलेले सगळे - दोघांनाहि एकमेकांचाच आधार आहे.

आरती प्रभू यांच्या इतर प्रसिद्ध कविता:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची