Loading ...

कळले नाही - मराठी कविता (प्रा. डॉ. विलास डोईफोडे)

कळले नाही (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी प्रा. डॉ. विलास डोईफोडे यांची कळले नाही ही मराठी कविता.

कळले नाही - मराठी कविता (प्रा. डॉ. विलास डोईफोडे)

...की माणूसच देव घडवतो आहे? हे काही कळले नाही!

कळले नाही

प्रा. डॉ. विलास डोईफोडे (सावनेर, नागपूर, महाराष्ट्र)

नवा दिवस उजाडतो, विचार येतात खूप काही माणूस खातो जगण्यासाठी की तो जगतो खाण्यासाठी? - हे काही कळले नाही. बघा दूरचित्रवाणीला, प्रसारणाचा दर्जा नाही कार्यक्रमासाठी जाहिरात की जाहिरातीत फसला कार्यक्रम? - शोधून कुठे सापडत नाही. उस्ताद झाला खोटा, राजाने मैदान पाहिले नाही पैसा आहे खेळाकरीता की ‘खेळ’ आहे सर्व पैशासाठी? - हे कुणी बोलत नाही. शहरामध्ये पाय ठेवला, शुद्ध हवा कुठेच नाही घाण आहे गावात की गावंच वसले घाणीमध्ये? - हे काही समजत नाही. आलटून पालटून सगळं पाहिलं, घोटाळ्याविना बातमी नाही नेता आहे देशाचा की देशच आहे नेत्यांसाठी? - हे काही उमगत नाही. कागदावरच योजना साऱ्या, पिकांना योग्य भाव नाही धान्य जोपसले सडण्यास्तव की ते उगविले मदिरेसाठी? - याचा काही अंदाज नाही. खाजगीत शिकायची ऐपत गेली, सत्र संपले तरी पुस्तक नाही मक्तेदारी उरली मोठ्यांची की शिक्षण आहे सर्वांसाठी? - प्रश्नाचे उत्तर सापडत नाही. व्यथा ही सारी बोलावी कुठे, मंथनास आम्हा सवड नाही यायचे भानावर लुटण्याआधी की सोडावे सर्व नशिबासाठी? - इतकाही विवेक उरला नाही. मंदिरातून मुकुट नेला, तरी घंटा वाजली नाही निसर्गाने निर्मिला माणूस की माणूसच देव घडवतो आहे? - हे काही कळले नाही.

प्रा. डॉ. विलास डोईफोडे यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची