Loading ...

मनाच्या कोपऱ्यात (मराठी कविता)

मनाच्या कोपऱ्यात (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम च्या सभसद कवयित्री अर्चना डुबल यांची मनाच्या कोपऱ्यात ही कविता.

मनाच्या कोपऱ्यात (मराठी कविता)

डोहांनाही आता, डोहाळे लागलेले


मनाच्या कोपऱ्यात (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम च्या सभसद कवयित्री अर्चना डुबल यांची कविता ‘मनाच्या कोपऱ्यात’.



मनाच्या कोपऱ्यात एक
लपलेला दरवाजा असतो
तिथंवर आपण ठरवूनही
कधीच पोहचत नसतो

येते जेव्हा भावनांची
ही भली मोठी विचित्र लाट
तेव्हा होतो सुरु आपला
अंतर्मनात जाण्याचा घाट

नाहीच सापडत तिथं
पोहोचण्याचा सहज रस्ता
आपलं मन, शरीर कितीतरी
जाण्यासाठी खात असतं खस्ता

विचारांचा होतो जेव्हा
असं काही अगणित गुंता
हरवत जातं आपले मन
आपल्याला ही न सांगता

अंतर्मनात झाकून जेव्हा
त्रयस्थपणे आपण पाहतो
तेव्हाच आपल्या चुका
आपण सुधारू लागतो

जगण्याचा अर्थ स्वतःच
स्वतःला जेव्हा कळेल
तेव्हाच मिळालेला जन्म
सार्थक होऊ शकेल

- अर्चना डुबल

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची