Loading ...
/* Dont copy */

माय माझी भोळी (मराठी कविता)

माय माझी भोळी (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी पवन कुसुंदल यांची माय माझी भोळी ही मराठी कविता.

माय माझी भोळी (मराठी कविता)

माय माझी थोडी भोळी, आहे कच्ची हिशोबाला


माय माझी भोळी (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी पवन कुसुंदल यांची कविता ‘माय माझी भोळी’.



माय माझी थोडी भोळी
आहे कच्ची हिशोबाला
घडवण्या माझं भाग्य
देई मात नशिबाला

वस्त्र लेऊन फाटकी
झाकी दशा ती भोगाची
सर नाही कुणा तिची
लढा देई संकटाशी

दैन संपेना का तिचे
उभं आयुष्य लोटलं
आम्हा देण्या सुखी जीवन
तिचं हसणं खुंटलं

राहून उपाशी तापाशी
पोट भरते लेकरांचं
मोठा होऊन फेडलं
वाटे पांग जीवनाचं

हात भाजले पोळले
तिने सर्व काही सोसले
तिचे सर्वस्व पणाला लावून
तुला जिद्दीने पोसले

नको विसरू रे बाळा
तिच्या कष्टाचं कर चीज
सोन्याचे पीक घ्यावया
टाकले रे तिने बीज

यश आले हाती तुझ्या
तिची पुण्याई थोर
तिच्या उपकाराची फेड
संपव यातना कठोर


माय माझी भोळी (मराठी कविता) संबंधी महत्त्वाचे दुवे:


- पवन कुसुंदल

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची