Loading ...
/* Dont copy */

माझी मराठी - मराठी कविता (वि. म. कुलकर्णी)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी वि. म. कुलकर्णी (विनायक महादेव कुलकर्णी) यांची माझी मराठी ही लोकप्रिय मराठी कविता.

माझी मराठी - मराठी कविता (वि. म. कुलकर्णी)

माझ्या मराठीची गोडी, मला वाटते अवीट


माझी मराठी - मराठी कविता (वि. म. कुलकर्णी)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी वि. म. कुलकर्णी (विनायक महादेव कुलकर्णी) यांची माझी मराठी ही लोकप्रिय मराठी कविता.



माझ्या मराठीची गोडी
मला वाटते अवीट
माझ्या मराठीचा छंद
मना नित्य मोहवीत

ज्ञानोबांची, तुकयांची
मुक्तेशांची, जनाईची
माझी मराठी चोखडी
रामदास, शिवाजींची

या रे, या रे अवघे जण
हाक मायमराठीची
बंध खळाळा गळाले
साक्ष भीमेच्या पाण्याची

डफ-तुणतुणे घेऊन
उभी शाहीर मंडळी
मुजऱ्याची मानकरी
वीरांची ही मायबोली

नांगराचा चाले फाळ
अभंगाच्या तालावर
कोवळीक विसावली
पहाटेच्या जात्यावर

नव्या प्राणाची तुतारी
कुणी ऐकवी उठून
मधुघट अपी कुणी
कुणी माला दे बांधुन

लेक लाडका एखादा
गळां घाली वैजयंती
मुक्त प्रीतीचा, क्रांतीचा
कुणी नजराणा देती

हिचे स्वरुप देखणे
हिची चाल तडफेची
हिच्या नेत्री प्रभा दाटे
सात्विकाची, कांचनाची

कृष्णा, गोदा, सिंधुजळ
हिची वाढविती कांती
आचार्यांचे आशिर्वाद
हिच्या मुखी वेद होती

माझ्या मराठीची थोरी
नित्य नवे रुप दावी
अवनत होई माथा
मुखी उमटते ओवी

- वि. म. कुलकर्णी (विनायक महादेव कुलकर्णी)

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची