Loading ...

रंगपंचमी सण (सण आणि उत्सव)

रंगपंचमी सण (सण आणि उत्सव) - होळी मागोमाग येणारा आणि सर्वांना हवा हवासा वाटणारा दुसरा सण म्हणजे रंगपंचमी [Rangpanchami Festival].

रंगपंचमी सण (सण आणि उत्सव)

मानवी जीवनातील एक रंगतदार उत्सव म्हणजे रंगपंचमी


रंगपंचमी सण (सण आणि उत्सव)

(Rangpanchami Festival) होळी मागोमाग येणारा आणि सर्वांना हवाहवासा वाटणारा दुसरा सण म्हणजे रंगपंचमी.



रंगपंचमी हा सण येतो फाल्गुन कृष्णपंचमीला ह्या दिवशी सर्व लोक रंग खेळतात. एकमेकांच्या अंगावर रंग टाकतात. नाना विविध रंगाची उधळण करायची आणि एका आगळ्या वेगळ्याच स्वानंदाच्या रंगांत रंगून जायचे हे साधायच असतं ह्या सणाच्या साजरेपणात.

रंग... खरंच प्रत्येक रंगाला एक अर्थ असतो. प्रत्येक रंगाची एक शिकवण असते. पांढरा रंग शांततेचा, लाल रंग त्यागाचा, हिरवा रंग समृद्धीचा; रंगांच्यामुळेच आपले जीवन हे सुद्धा रंगीन होते. गोकुळात श्रीकृष्णाबरोबर गोप-गोपिकांनी जी रंगपंचमी साजरी केली त्या रंगपंचमीला होता एक रंग भक्तीचा. आपल्या स्वातंत्र्य वीरांनी, क्रांतीकारकांनी, देश भक्तांनी स्वातंत्र्य मिळावं म्हणून आपल्या रक्ताची जी रंगपंचमी केली तिचा लाल रंग होता त्यागाचा समर्पणाचा. सुर्यास्ताला आकाशात नानाविध रंगाची उधळण रविराज करतो ती आकाशीची रंगपंचमी आपलं मन मोहून घेते.

आकाशाचा निळा रंग, शेत शिवाराचा हिरवा रंग, खळखळणाऱ्या पाण्याचा पांढरा रंग, फांदीवर फुलणाऱ्या रंगीबेरंगी फुलाचे रंग, फुलाभोवती गुंजन करणाऱ्या भुंग्याचे रंग, बागेत बागडणाऱ्या चिमुकल्या फुलपाखरांचे रंग... आपल्या अवती भवती ही रंगाची रंगपंचमी नेहमीच फुलत असते. आपले मनं मोहित असते.

रंगपंचमी सणाची शिकवण


मानवी जीवनात जर प्रेम नसेल, आस्था, जिव्हाळा नसेल तर जगणं ही रंगतदार होत नाही. रंगपंचमीचा सण, त्यातले रंग हे आपल्याला बरचं काही सांगून शिकवून जातात. त्या रंगांनी आपण आपलं जीवन चित्र रंगवून घ्यायचं असतं. रंगाची दुनिया जीवनाला जगण्याला एक नवा अर्थ देते.

रंगपंचमी खेळताना, दुसऱ्याला रंग लावत असताना आपल्या त्या कृतीने समोरची व्यक्ती सुखावेल. त्याला आनंद होईल हेच पहायला हवे. नैसर्गिक रंग खेळायला हवेत. नवे बाजारी रासायनिक रंग खेळणे धोकादायक आहेत हे समजून घ्यायला हवं. रासायनिक रंगामुळे डोळे चूरचूरतात. त्वचेची आग होते. कातडी खराब होते. तेव्हा असे रंग न वापरणे हेच योग्य नाही का?

आपण प्रत्येकानेच आपले आवडते छंद, कला, नैपुण्य इ. मध्ये अप्रतिम रंग भरून आपलं जीवन हे रंगदार बनवायला हवं हाच रंगपंचमी ह्या सणामागचा संदेश आहे. भक्तीचा रंग, प्रेमाचा रंग, त्यागाचा रंग एकत्वाचा रंग हे सारे रंग आपणच आपल्या जीवनात भरून घ्यायला हवेत. रंगपंचमीला वैरभाव आकस दूर करणारा बेरंगी जीवनाला रंगीन बनवणारा असा आहे.

“पानी रे पानी तेरा रंग कैसा
जिसमें मिला दो लगे उस जैसा”

ह्या उक्तीप्रमाणे जीवनात रंग भरून ते अधिक मोहक करण्यातच खरा आनंद आहे.



रंगपंचमी सण (सण आणि उत्सव) संबंधी महत्त्वाचे दुवे:


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची